कोकणातील घरे आणि त्यामधील निरव , थंड कौलारू शांतता खासकरून मध्यान्हाच्या वेळी जाणवणारी अशी ....... ती भरभरून तृप्ती देते .
जी शांतता कदाचित मंदिरांमध्ये सुद्धा अचानक होणाऱ्या घंटानादाने दुभंगली जाते . त्यापेक्षा कितीतरी सखोल ,खरतर प्रगाढ अशी शांतता घरात अनुभवायला मिळते . त्या शांततेत अविचल (Motionless) हि अवस्था काय असते ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही ,किंबहुना ………
ती जाणीव संपूर्ण शरीराचे अस्तित्व व्यापून टाकते , आणि त्यामधून बाहेर आल्यावरसुद्धा जे वातावरण (झाडे , गावातील जेष्ठ माणसे ,विहीर, दाणे टिपणाऱ्या कोंबड्या, ताईच्या नारळाच्या झाडाखाली ठेवलेली मोडलेली खुर्ची ) असते त्यामधील त्याचे पडसाद दिसल्याशिवाय राहत नाही . ४\२\२०१६
No comments:
Post a Comment