display: inline-block;

Dec 16, 2011

खुली आंखो से साफ साफ दिखाई देना कभी कभी मुश्कील  बन जाती है |


और अंधेरे मै  सोना चाहो तो,
आंखे बंद करने कि आदत साथ नाही देती |
अंधेरा तो वैसे हि अपने आप मी पुरा होता है |
ये समझने से पहले हि
रोशनी कि चाहत उसे भी उलझन बना देती है | < 

Dec 15, 2011

माणूस ....


"माणसाच्या खऱ्या मुलभूत गरजा ह्या त्याच्या  मानसिकतेवर अवलंबून  असतात " १२/१२/२०११ 

स्वतःला जे

स्वतःला जे जीवनात  करावयाचे आहे ते करण्यासाठी जगयाचे म्हटले तर "संघर्ष "हा वेगळा म्हणून काही उरत नाही,किंवा  वेगळा म्हणून कोणाशी करावा हि लागत नाही < अभिजित १८/१२/२०११ 

प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट !

सामान्य माणसासाठी चित्र म्हणजे काहीतरी महाग ,काही तरी पलीकडले ........
श्रीमंताला चैनी गुंतवणूक ,
संग्रहालयात एक कलेचा  ठेवा म्हणून '
आणि सरकार ला एक जबाबदारी म्हणून, कारण ते सतत बदलत असते ,
(अर्थात अपवाद आहेतही पण ते अपवाद ह्या शब्दा इतकेच मर्यादित असतील ह्याची खात्री )
कलाकार महाग म्हणून स्वतःची कला विकसत नाही करत तर मुग ती एक गुंतवणूक कशी होते हा मुद्दा नक्कीच गंभीर आणि मजेशीर हि असेल,आणि ऐतिहासिक गोष्ठीमध्ये सुद्धा प्रचंड गुंतागुंत असते ,कला हि राष्ट्रीय सम्पती पेक्षा एकतर वैश्विक तरी असते किंवा वैय्यक्तिक तरी असली पाहिजे ,

प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट १८/१२/2011

Nov 7, 2011

निसर्गाबद्दल ठराविक विचार....

निसर्गाबद्दल ठराविक विचार आला कि त्या क्षणी निसर्गाबद्दल खऱ्या असणाऱ्या त्या सर्व शक्यता ज्या अमर्याद आहेत त्या सर्व मागे पडतात आणि उरतो फ़क़्त त्यांच्याबद्दल आपला असणारा दृष्टीकोन आणि सुरु होतो एक संवाद,  

Nov 3, 2011

समजुतीची बीजे हृदयातच जातायत ना ?
ह्याची शंका येउ लागली  ,तेव्हा पासून ते बीज रोवण्याची प्रक्रिया  जरा सावध झाली आहे.
शरीरातल्या संवेदानाचे  काय ? 
आपल्या प्रक्रियेत त्यांचे स्वतःचे कितीतरी नुकसान अगोदरच झाले असते ,
भूकंपातील पडक्या ,उघड्या भिंतीन्सारखे ,
आणि स्वतःला सावरण्याचे प्रयोग मात्र सुरु असतात ,
त्या भिंतीवर चालणार्या मुंगीसारखे . --- 


अभिजित 
    ३ नोव्हेंबर  ११  

Jun 28, 2011

आपले अपूर्णत्व पूर्ण करते ती "आई"
मग ते काही का असेना .. 
११/०३/२०११

"Chitra"

कुठलाही "जीव " निसर्गात  नाव घेवून जन्माला येत नाही ,मग चित्र हे जर एका आंतरिक बीज प्रेरणेतून आले असेल तर त्याचाही शीर्षकाशी काही पूर्ण संबंध उरत नाही ,पण त्याच दुसर्या बाजूने जर का चित्र प्रयोगातून किंवा विचारातून जन्म घेत असेल तर मग त्याचे शीर्षक होणे असते आणि पण तरीही हे दोन्ही प्रकार दर्जात्मक रित्या बरोबरीचे आहेत .कारण "जन्म"होणे अथवा जन्माला घालणे हीच मुळी महत्वाची आणि अवघड प्रक्रिया आहे.२८/०६/२०११

Apr 28, 2011

" पाया "


 पाया जर का मजबूत मिळाला तर मग त्यानंतर ते कृत्रीमपणाने रचण्यात काही अर्थ नसतो.सुरु कराव 
रचले आपोआप जाते आपल्या जाणीवेने आणि आपल्यात असणाऱ्या सहजतेने ,
त्यामुळे माझ्यामते त्याची सहजता टिकून राहते आणि आपली एका अर्थाने कुठल्याही अहंभाव न उरता "वाढ" होते .

२४/०४/२०११ 


Mar 16, 2011

प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या.......


प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या माध्यमालाही मर्यादा असतात ,आणि कधीकधी आकारापेक्षा "शब्द" हे आपल्याला त्या गोष्टीचे "ज्ञान  "लगेच करून देतात .
एका गोष्टीवर मांडलेला विचार नाहीसा होण्याची शक्यता नाही नाकारता येत पण मग ते "विचार" परिपक़्व होण्याचे चिन्ह मानावे "शेवट" नाही.

नेहमीच मनामध्ये

नेहमीच मनामध्ये चालू असणारी विचार प्रक्रिया हि "मूर्त" आणि "अमूर्त " (म्हणजे  माझ्यामते कधी कधी विषयाचे बाह्य सौंदर्य जाणवणारी तर कधी त्यामधील अनेक शक्यतांचा विचार दृष्याद्वारे करायला लावणारी ) असते .त्यावेळेस ते व्यक्त करतानाही आपापल्या "नैतिक आणि अनैतिक मर्यादेमध्ये राहून जाणीवांना दृश्यरूपात अभिव्यक्त करतानाच्या पद्धतीचा ,कालावधीचा  हि तितकाच विचार करणे महत्वाचे आहे .

Jan 19, 2011