display: inline-block;

Jan 21, 2013

profile picture


बर्याच गोष्टी राहून गेल्या

मी काल बऱ्याच महत्वाच्या गोष्टी बोलावयच्या विचारायच्याच विसरलो  .
बरेच प्रश्न ही राहिले
बलात्कार होत आहेत ना  ...
कारण
बलात्कारच आता तोंडानी करायचा ठरवलाय .
त्यातलेच प्रश्न होते 
भास आहोत का आपण ?
सध्याच्या आपल्या चित्रपटांमध्ये संवादच मला का सापडत नाही ?
का काही चित्र संवादामधून जास्त स्पष्ट होतात?
का कधी कधी व्यक्त होण्याची  प्रक्रियाच  हि खूप लांबवते आपल्यास व्यक्त होण्यास ?
का मूर ची  स्कल्प्चरस पुन्हयांदा आनद  देवून गेली ,
अतिश ने सुचवलेला दनिएल लुइस मला देर  विल बी  ब्लड मध्ये भन्नाट आवडला .

21/01/2013

Simple things stop me to create or react sometimes cause just they are simple as they are .and that time acceptance and patience is the only choice for me . 

Jan 19, 2013

Jan 18, 2013

एक चूक

संध्याकाळ ...
उडणाऱ्या  पक्ष्यांची रांग .
त्यातल्या प्रत्येकाची एक स्वतःची अशी आर्त हाक .
संध्याहाक
असं वाटते आता
त्या घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांना
आकाशाने गिळून तर नाही टाकलं .
हा माझाच मूर्खपणा
त्यांच्या त्या हाकेचा पाठलाग करणं
कधी जमलंचं  नाही मला .
आर्ततेची ती हाक आकाशात विरून कधी जायची ,
कळायचंच नाही ..
खरतरं लक्षच निघून जायचे .
माणसांच्या थव्यात .
मी  आधीच हरवलेलो
आधी  हरवलेलेच दिसणार ......
                                अभिजित १८/०१/२०१३

भास

भास हा  माणसाच्या समोर असणार एक सत्यच
सर्व पाहत असतात ते सत्य जाणण्यासाठी
तरी सर्वांचे निराळे अनुभव .
                                            अभिजित १८/०१/२०१३

Jan 17, 2013

17/01/2013

To simplify things 
Understanding 
Is
The 
Great 
       Responsibility .....

Jan 13, 2013

मी भटकतो......

मी भटकतो .
शोधण्यासाठी नाही,
चकित होण्यासाठी.
चकित होतो ,होण्यासाठी नाही,
सामावण्यासाठी .
सामावत ही नाही पूर्ण,
समजण्यासाठी .
तिथपर्यंतच जोवर पाय राहतात समेवर .


मी भटकतो ,
काहीतरी घेवून काहीतरी होवून ,
जोडण्यासाठी .
तुट तेही ,
मनाच्या समाधानासाठी .


क्षणाच्या सोबत बसलेलो असतो ,
झोपलेलो ,
मेलेलोही असतो.
जिवंत आहे कशास हे जाणण्यासाठी ,
हेवा वाटतो
कधीतरी इतरांचा ,
माझ्या मलाच पडलेल्या '
प्रश्नांच्या उत्तरांसाठी.
ठीक आहे ..


मी भटकतो , ते
सापडलही उत्तर  .
पण ते जगण्यास पुरेस के नाही ,
हे काळत नाही .

मी भटकतो
एकच खर आनंदी
राहण्यासाठी ..
मी लिहिलेही हे अशाचसाठी ,
काहीतरी ओझं कमी करण्यासाठी
............................................
अभिजित १३ जानेवारी २०१३

Jan 7, 2013

so you make your face a mask
a mask that hide your face
a face that hide's the pain
a pain that eats your hurt
a heart that nobody knows

भूक

भूक लागते ,
पण
अन्न कुठेतरी साठवावास
वाटत .
भूक लागते , आणि
अन्न खावंसं हि वाटत नाही .
भूक लागते,
अन्न ,खाल्लं हि जाते ,
भूक शमते ,
विचार
वास्तव विसरून कल्पनेशी
खेळू लागतात ...
                        
अभिजित ७ जानेवारी २०१३