display: inline-block;

Dec 31, 2012

हर दर्द की पहचान नहीं होती


दर्द न हो तो तनहाई भी बोर हो जाती है
ये सब वो तनहा इंसान है  जो चल पड़े
अपने ही दर्द मै अपनों लिए ,
के कुछ पल अगर राहत मिले  रास्तो पर तो हम भी
खुशिया लायेंगे
इस धरती पर
......................
.....................
.....................
वो तो सो गयी,
दर्द तो जिंदा है अबतक
दवा के इंतज़ार मै ..
.......................... अभिजित्स  31स्ट  2012

Dec 23, 2012

वाळूही जिवंत ठेवते

हातातून वाळू निसटत असते
खरतर समुद्रावर आलेलो असतो .
दूरवरचा अस्त पाहायला ,
पण जवळच्या  जाणीवा 
ह्या वाळूतच सापडत जातात ,
रंग भिडत जातात पण
वाळूचं  निसटण आत कुठेतरी जाणवून देते  .
त्या खर्या शब्द,भावनांचे स्पर्श
तासांचे क्षण होतात ह्यातच
आणि 
संध्याकाळ हि आठवणीसाठी असते .
हि जाणीव पुन्हा  करून देतो ,
अस्ताचा अंधार....



आणि हाच अस्ताचा अंधार 
दुसरीकडे कुठेतरी
पहाट करत आहे
हि जाणीव जोपर्यंत असेल ,
तो पर्यंत त्या वाळूचा स्पर्शही .
                                         अभिजित २३ डिसेंबर 

Dec 5, 2012

स्वतःला समजून घेताना .

कधी कधी मी बघतो ,वाचतो,शोषतोसुद्धा माझ्या नकळत
नकळत,
अनुभव हे असेच असतात का हा प्रश्न पडतो तेव्हा,
अटी तटीच्या प्रसंगी कस लागतो जेव्हा त्यांचा,
त्या प्रसंगातून बाहेर आल्यावर खरतर  सुटल्यावरच
कळत ,
ते सांडले होते आत कुठेतरी एकावर एक कसेतरी..
ओळीने लावायला वेळ हि नाही मिळाला इतके भराभर आले असतील
अभिजित २०१२