display: inline-block;

Dec 31, 2012

हर दर्द की पहचान नहीं होती


दर्द न हो तो तनहाई भी बोर हो जाती है
ये सब वो तनहा इंसान है  जो चल पड़े
अपने ही दर्द मै अपनों लिए ,
के कुछ पल अगर राहत मिले  रास्तो पर तो हम भी
खुशिया लायेंगे
इस धरती पर
......................
.....................
.....................
वो तो सो गयी,
दर्द तो जिंदा है अबतक
दवा के इंतज़ार मै ..
.......................... अभिजित्स  31स्ट  2012

Dec 23, 2012

वाळूही जिवंत ठेवते

हातातून वाळू निसटत असते
खरतर समुद्रावर आलेलो असतो .
दूरवरचा अस्त पाहायला ,
पण जवळच्या  जाणीवा 
ह्या वाळूतच सापडत जातात ,
रंग भिडत जातात पण
वाळूचं  निसटण आत कुठेतरी जाणवून देते  .
त्या खर्या शब्द,भावनांचे स्पर्श
तासांचे क्षण होतात ह्यातच
आणि 
संध्याकाळ हि आठवणीसाठी असते .
हि जाणीव पुन्हा  करून देतो ,
अस्ताचा अंधार....



आणि हाच अस्ताचा अंधार 
दुसरीकडे कुठेतरी
पहाट करत आहे
हि जाणीव जोपर्यंत असेल ,
तो पर्यंत त्या वाळूचा स्पर्शही .
                                         अभिजित २३ डिसेंबर 

Dec 5, 2012

स्वतःला समजून घेताना .

कधी कधी मी बघतो ,वाचतो,शोषतोसुद्धा माझ्या नकळत
नकळत,
अनुभव हे असेच असतात का हा प्रश्न पडतो तेव्हा,
अटी तटीच्या प्रसंगी कस लागतो जेव्हा त्यांचा,
त्या प्रसंगातून बाहेर आल्यावर खरतर  सुटल्यावरच
कळत ,
ते सांडले होते आत कुठेतरी एकावर एक कसेतरी..
ओळीने लावायला वेळ हि नाही मिळाला इतके भराभर आले असतील
अभिजित २०१२

Oct 24, 2012

War is not people's Voice ,It's a system's Choice !

Oct 17, 2012

"सफर "

दो दायरो के बीच का फासला हे ये जिंदगी  ।
हमारे अपने अपने होने से रहे ।
भीड बढती ही  गयी ।
इन्ही दो दायरो में  भी कही अन्गीनात मोड आये ,
आते रहेंगे ।
ये सभी,एहसास हें  जिने का,मजा भी हे इन ,
दायरो के बीच फसे  रहने का ।
जुलम तो सिर्फ वक़्त करता है ।
उसे दवा भी ,
जिस्म तो वही ठिकाना है ।
जहा वो समाया रहता  है ।
...................................
............................
 आज वो छुट रही ही राहे,
जिन्हे  कदम कदम चाहा ,कूछ  नयी समा रही है ,

जुदा तो सब होना है ।
हमसे हमारी परछाई भी ।

.............................. अभिजित २०१२

Oct 12, 2012

आठवणींचे रांजण

मुंबईच्या धावपळीच्या कि धक्काधाक्कीच्या ते माहित नाही दिनांक १६ ओक्टोम्बर ला कसातरी मी एकदाचा पोहोचलो , माझ रिझर्वेषन   तिकीट बरोबर वैटींग लिस्ट वर १ वर येवून अडकल्च  ... पण पोहोचलो ....
गाडीतून पाय कुडाळ फलाटावर  वर पडताच  सर्व क्षीण नाहीसा झाला आणि डोळ्यासमोर सर्व काही शांत झाल
  ...

आता अचानक झालेल्या बदलांचे अनुभव घेणे हे काही जाणीवपूर्वक नसत ,पण ह्या जाणिवांच रुपांतर अखेर
अनुभवताच होत हे हि तितकच खर ,
आता हे अनुभव लिखित स्वरुपात येतात जेव्हा प्रकाशाला जास्त वेळ पाहिल्यावर कस थोडा  वेळ डोळ्यांसमोर अंधारी येते .तसा हा परतीचा प्रवास माझ्यासाठी....
 मस्तपैकी  गणपतीच्या पहिल्याच दिवशी सकाळी कोणाची उठवण्यासाठी हाक येण्या अगोदरच मोर आपल्या  कूजनाने मला उठवायचे .मग छानपैकी चहा घेवून बाहेर पायरीवर बसून गडबडीत असणारे फुलपाखरू  पाहून आपल्या त्या अवस्थेबद्दल  गर्वित व्हायचे  ;)  मग अचानक लक्ष गेल ते आमच्या माडांच्या झाडाखालून तुरुतुरु  पळणार मुंगूस .ते हि  माझ्याकडेच बघत होत ..
दुपारी मला त्या मुंगुसाच्या  सकाळी पाळण्याचे कारण हि भेटले जेव्हा मी आमच्या घराकडे येणाऱ्या छोट्या वाटेवर च अगदी मी खालून आता उचलीन कि काय इतक्या अंतरावर असणारा एक साप पहिला मस्तपैकी वादळाने आडव्या केलेल्या गवतावर पहुडला होता तो  कुठे काही गडबड नाही सर्व काही निसर्गात .
एकट्याचा  माझा  आवडता उद्योग तो म्हणजे धरणाच्या पायऱ्यावर बसून 'फिश पेडीक्युर" ते हि फक्त काही चुरमुरे किंवा शेव टाकताच ...:)
आमची सर्व छोटी मंडळी घरासमोरच बांधलेल्या मंदिरात दर सोमवारी शंकराची आरती करतात मी तिथे जातो कारण मोबाईल  फोने ची रेंज  हे तिथे मिळते म्हणूनही . :)
पण अचानक दुसऱ्या  दिवसापासून कोकणाने आपला खरा रुद्र अवतार दाखवायला सुरु केला तो नंतर अगदी गणपती च्या शेवटच्या दिवसात दिवसभर असणारा सूर्याचा लक्ख प्रकाश पण दुप्पार झाली कि जो की ढगांचा "गडगडाट  "सुरु व्हायचा ...घर अगदी मुळा पासून हादरवून टाकणारे आवाज ते त्यात मी वेड्यासारखा एकदा दारावर बसून आमच्या हलणाऱ्या माडां कडे पाहत बसलो होतो आणि विचार करत होतो कि जर ते माड घरावर पडले तर आपण घरच्यान्सकट  कसा पळ  काढायचा इतक्यातच ती वीजजजजज आमच्या अंगणात असणाऱ्या  लोखन्डीने पारई ने आपल्यावर घेतली  आणि त्याच वेळेला माझी ताई  जी मला सावध करायला आलेली तिने त्या विजेमुळे मी  टुणकन  मारलेली उडी पाहून हसायलाच लागली आणि त्यानंतर मीही  स्वतःच्या जिवंत असण्यावर ..
                                                                                                                                          




Sep 4, 2012

"डिप्रेशन "

 आता काही असले तरी ,ते असल्याविना जे आहे ते हि महत्वाचे .
जेव्हा सर्व पणाला लागते तेव्हा एका क्षणाला ते संपलेले हि परके वाटू लागते .
निराश मनाच्या पोकळीला कुठलाही देह नसल्याचे जाणवते तेव्हा त्यावेळेस राग , लोभ, पैसा ,स्वप्नांपासून हरवला जातो मी ,
हवसे असे काही नाही राहत ,
डोळे मिटून येणारी झोपहि कुठेतरी हरवून सोडून देते .
आपले सर्वच आपले नसते हे जेव्हा प्रकर्षाने जाणवते तेव्हा असलेल्यांपासून हि लांब जातो ,
मग एकच प्रश्न उरतो ,
मी आहे तरी कशाला इथे ? --------- अभिजित २०१२

From "Hearth"



Jun 27, 2012

पाळीव  माणसाने लिहिलेली कविता .
----------------------------------------
----------------------------------
-------------------------
------------------------------
--------------------
------------
------------
------------------------------
-----------------------------
-------------------------
-----------------------
-------------------------
----------
--------------------
-------
----------------
-------------
-----------आदेशावरून   .

-------     
 पाळीव माणूस

    

Jun 18, 2012

उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा

उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा बघायला मिळणे हा एक आनंद असतो ,
तसाच आनंद अगोदर एकटा पक्षी दिसल्यावरही व्हायचा ,
पण .
एके दिवशी जेव्हा जाणवलं  कि ,
जर तो पक्षी आपले घरटे शोधत असेल तर , जर तो आपले साथीदार शोधत असेल तर ...
तेव्हापासून जेव्हा जेव्हा असा पक्षी दिसतो तेव्हा आपणही त्यासोबत असाव असे वाटते .
पण,
उडण्याच स्वातंत्र्य त्याच्या इतके आपल्याकडे नसते आणि त्याच्या इतका  उडण्यासाठी लागणारा  एकटे पणाही ---------18 जून 2012  अभिजित 

Jun 11, 2012

Fabric Creation and tea time

Tea time


Fabric exploration

May 16, 2012

दो घूंट पानी ,
प्यास बुझा नहीं सकती 
जब तक  जिन्दा है 
आदमी ,
दो घूंट बांटने  से 
प्यास  कम  जरूर होती है 
जब तक  जिन्दा है 
आदमी .- अभिजित 

May 9, 2012

 माझी तीन  माकडे....... 
भूतकाळ  जो आता आपले डोळे झाकून आहे .
वर्तमान काळ  जो काही ऐकत  नाही .
भविष्यकाळ  जो आताच  काही बोलायला  तयार नाही. 

Jan 21, 2012

माझे प्रत्येक चित्र

माझे प्रत्येक  चित्र खुल असावं,
त्याच स्वतःची एक योग्य जागा असावी,
न बदलणारी ,
ह्यापलीकडे एका  चित्राला तरी काय हवं असतं?
स्वप्नांन्च्या  राज्यात जाण्यासाठी लागणारी जादुई चटई होण्याअगोदरच,
आईच्या मृत्युनंतर माझे  सर्व अश्रू स्वतःचे मानणारी,मला सावरणारी माझी उशी,
सकाळी उठण्याचे बळ देणारी माझी उशी
स्वतः बराच काही सोसले हिने माझ्यासाठी ,
अशी हि माझी सुद्धा फाटकी उशी ही तर माझ्या आईच्या दुखाची साठवण घेउन श्रीमंत झालेली,
हिच्या शिवाय  दुसर्या कोणासमोर आता आईसाठी अश्रू येतहि नाहीत ......२१ जानेवारी २०१२ २:३८ रात्र 

Add caption