display: inline-block;

May 28, 2015

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -
"अभिजात" सत्यजित  रे यांची चित्रसंपदा (चिदानंद दासगुप्ताhttp://en.wikipedia.org/wiki/Chidananda_Dasgupta अनुवाद सुधीर नांदगावकर) खूप छोट पुस्तक पण अतिशय आशयपूर्ण आणि मह त्वाचे पुस्तक सत्यजित रे यांच्या समकालीन चिदानंद दासगुप्ता यांचे  कुठलीही तडजोड न करता  सत्यजित  रे यांच्या कामाचा आणि त्यातील विविध पैलूंचा  वेध घेतलेले सुंदर पुस्तक 
खरतर ह्या दोन शब्दांच्या आधाराने स्वतःचे परीक्षण करण्याचे ठरवले त्याच वेळेस स्वतःच्या प्रचंड मर्यादा जाणवू लागल्या 

अविष्कार आणि अभिव्यक्ती ज्या माध्यमांद्वारे मी करत आलो त्यात त्यांचा एकमेकांशी समन्वय कसा होत आला आणि ते  माझ्या अनुभवांद्वारे  कसे घडत गेले यांचा पाठपुरावा करावा अस वाटलं .  पण ह्या गोष्टी जरी मी आता लिहित असलो तरी ह्यांचा विचार माझ्यात सतत उद्दीपित होत होता एकमेकांसोबत आणि तो वेगळा करण माझ्य्साठी तसे  सहजशक्य नाही , कारण स्वतःचे कितीही म्हटलं तरी परखड परीक्षण करणे हे शक्य नाही , तसे कठीणच . बरेच संघर्ष होऊ लागतात स्वतःशीच , त्यामध्ये स्वतःशीच परीक्षण , निरीक्षण करणं तसं कठीणच होऊन बसतं , मग त्याचा सुवर्णमध्य म्हणजे त्या सर्व गोष्टीच प्रवाहीपण प्रामाणिकपणे जपणे आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू जोखणे.
तसेच  त्या प्रसृत होऊ देऊन त्यांच्यात असणार्या नैसर्गिकपणाने ते  उत्क्रांत होऊ देणे . त्याची जाणीव राहणे , खरतर माझ्या मनात हल्ली हे पुस्तक वाचल्यापासून माझ्या कलेचा भारीत्य संस्कृतीशी समन्वय कसा साधावा ह्याचा विचार  रुजत आहे . पण  त्याचवेळेस माझ्यामधील एक विचित्र असा गुंता माझ्यासमोर येतो . आणि तो थोडासा ह्या विचाराच्या अगतिक पणाला मारक  ठरतो तो म्हणजे "सहजता" पण हि सहजता कालाविष्कारादरम्यान  मिळवण्यापेक्षा तो  बर्याच वेगवेगळ्या क्षणी स्वतः मध्ये जाणवतो . त्या वेळी मन एका विशिष्ट क्रियाशीलतेच्या पातळीवर "conscious " असणे आणि त्याची जाण  कुठल्याही तडजोडीशिवाय स्विकारून  विचार आणि क्रियेच्या प्रक्रियेशी पूर्णपणे एकजूट होणे , तसेच तिला आतून मान्यता मिळणे आणि ह्या सर्व गोष्टी त्या एका क्षणात होत असतात आपल्यामध्ये  तसेच हा क्षण आपण साधला हे कामातून अट्टाहासाने  दाखवण्यापेक्षा तो अशाप्रकारे त्या प्रक्रियेचा भाग व्हावा कि त्याचे वेगळेपण दिसुन न येत तो त्या सर्व प्रक्रियेचाच भाग म्हणून परावर्तीत व्हावा . 
असा विचार सध्या सुरु आहे . 
खरी कसोटी असते ती अविष्कार होत असल्या  प्रसंगी घेतल्या जाणार्या  निर्णयांची  . त्याची साधने,माध्यमे   ह्यांची निवड  संवेदनशील असण्यासोबतच ते त्या ठिकाणी कसे अपरिहार्य असू शकेल हे हि  जास्त महत्वाचे होऊन जाते , माझा सर्व  प्रयास हा सह्जतेशी सलग्न असावा हा माझा नेहमीच प्रयत्न असतो . माझ्या प्रक्रियेचे मूळ प्रवाहात जरी असले तरी त्याचा प्रभाव , त्याचे परिणाम  हे बरेच गुंतागुंतीचे आहेत आणि ते तसे असण्यामागे  मानसिक आणि शारीरिक  जडण घडण आहे , आणि ह्यात आता आपल्या संस्कृतीचा समन्वय कसा साधावा तोही अपरिहार्य पणे ह्या जाणीवेच्या शोधात शांत आहे मी अट्टाहास नाही कुठला . 
नाद…  नादी नादी .
 समोर बीभत्स बीज . 
मनाच्या अट्टाहासाचे ,
संगम, संगत 
परावलंबी 
संपले ,
थिजले सर्व 
श्वासावाचुनी जिवंत . 

May 22, 2015

माझा कावळा , माझा सूर्य , माझी फुलं .


माझा कावळा , माझा सूर्य , माझी फुलं 
flower dye, pigment , gum Arabic ,

एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?

प्रिय ,
एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?
दोन समान्तर रेषां चा प्रवास काहीसा विरसपणा  कडे झुकणारा जाणवतोय . पण ह्या विरस पणा पुढील  खूप महत्वाची पायरी सुद्धा  मला जाणवतेय ह्या क्षणी  खरतर तेही तुला सांगावस वाटते .  ह्या विरस पणा ला  लागुनच  एकमेकांकडे तटस्थ पणे बघण्याचा अमर्यादित दृष्टीकोन देण्याच सामर्थ्य हे त्यामध्येच दडलेलं मला जाणवलं, ज्याने एक आशा जागृत राहते आपल्यामधील समांतर प्रवासात   .
जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्य"प्राणी" स्वतंत्रपणे विकसित होत असतो , त्याला ठराविक मर्यादेनंतर कोणीच इतर मनुष्य प्राणी  कारणीभूत उरत नाही .
शोध हा सतत सुरु असतो आणि त्या शोधाची प्रेरणा हि कुठेही असू शकते . परंतु , शोधाचे आपल्या आर्थिक , मानसिक, आणि वास्तवाशी  संबध असणे आणि आपल्या मनात त्या शोधाशी नात जोडणारे  बांडगुळ उगवणे ह्यातली तफावत फार संवेदनशील वळणावर संघर्ष करीत असते आपल्या  अहंशी.

विचार रुजण्यास लागलेला काळ आणि तो प्रत्यक्षात येई पर्यंतचा  क्षण त्याची परिपक्वता निश्चित करते आपल्यामधील सहजतेची  .

ते क्षमता ठेवते मला ,
मृत्युच्या अलीकडील पायरीवर बसून पाय बुडवून बसवण्याची ,
बसल्या जागी जरी मीच असलो , तरी 
माझ्यातील मीपण नाहीस करून 
प्रतीबिम्बाशी  नवीन ओळख करू देण्याची ,
माझा मीच उरत नाही तर आपल्या जुळणाऱ्या  मतांचं 
कसलं  ओझं ?
जिथे संपते सर्व .    

May 4, 2015

Untitled


Untitled
Water, Flower Dye And pigments 

The Visual and the Ego "दृश्य आणि अहंकार"

तल्लूर ल एन यांचे  "the melting men " हे हल्लीचे मला सहज पणे आवडलेले  एक काम ,
त्यासमोर मी उभा ते न्याहळत आणि त्याचवेळी माझा  मित्र माझ त्याबद्दलचे  माझे एप्रिसिअशन ऐकत असताना अचानक प्रश्न विचारू लागतो . की
 काय आहे यात एवढ ?,
का ह्या कामासाठी हेच माध्यम योग्य ?
                                      मला तर नाही वाटतआणि तसं  इतकं  भिडत  हि नाही 
ठीकच आहे 
तो  कुत्सितपणे आपले हसू लपवून ते पाहत राहतो नंतर मी निर्विकारपणे  ते स्कल्प्चर  माझ्या पुढे फुटत 
 ,आणि तेही अनपेक्षितपणे स्फोट व्हावा तसे फुटतं .
                                                  जमीन रक्ताशिवाय बम्बाळ  होते 
आणि  मग, मी विचारतो त्याला 
कशासाठी होते ते ?
                     
                         आणि 

                                    आता काय? 

                                                 काय राहिलं ?

.................................................. .................................................. ………………. 
ज्ञान हे प्रश्नांच्या उत्तराने  मिळत नाही तर ,ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रक्रियेमधून आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नांमधील आपल्या बदलांमधून प्रतिबिंबित होत राहते -  ------ ४ मे २०१५