display: inline-block;

Jan 4, 2015

हम्पी

मित्राने ओक्टोबरच्या सुमारास फोन केला आणि सांगितलं डिसेंबर च्या शेवटच्या वीक ला हम्पी पहायचं ठरवतोय  मी तडक हो तर दिला . हम्पी म्हणजे  त्यावेळची विजयनगर साम्र्ज्याची राजधानी
पण, माझ शेवटच्या दिवसापर्यंत काही ठीक  दिसेना . जायचं तर होतच पण क्ला एन्ट चे पेमेंट बाकी होते .तरी शेवटी निघालोच , ठरवलंच होत तसं फ़क़्त जायचं तिकीट बुकिंग करायचं बाकी सर्व काही जसं होईल तसं, कारण एकच ....सर्व नीट कुठल्याही  बुकिंग च्या हिशोबाने अडलं  नाही पाहिजे . पाहता आल पाहिजे  बस्स मनसोक्त .....आम्ही २३ डिसेंबर २०१४ मुंबई तो होस्पेट(नागलापुरी) व्हाया सोलापूर जायचे ठरवलं .
सोलापूर ला रात्र काढून मग सकाळच्या ट्रेन ने आम्ही म्हजे मी, मयुरेश आणि अतिश  असे तिघे त्यात मयुरेश आणि मी ह्याची  पहिलीच वेळ अतिश आणि मी अगोदरही एकत्र फिरलो आहोत . असो,
खरतर मला हे लिखाण एक travel  blog  सारख न लिहिता उत्स्फूर्त पणे माझ्या अनुभ वांशी निगडीत लिहिण जास्त  महत्वाच आहे ,कारण वडिलांच्या निधनानंतर माझ हे दीड वर्षानंतरच पहिलाच आउट डोर त्यामुळे बरच काही माझ्यात असणारं नसणार ,मला नव्याने स्वतःला इतरांसोबत जुळवून घेताना जाणवणारे बदल, थोडस आर्थिक दडपण , त्याही पेक्षा असणारी  उत्सुकता ,  प्रचंड उत्सुकता आणि असणाऱ्या जबादारीची जाणीव धरून  मस्ती जोडून आम्ही जे पाहणार होतो, त्यामागचा थोडा इतिहास आणि त्याचा वर्तमानाशी मिळणारा दुआ पण अट्टाहास  नाही ते सर्व मिळवण्याचा , कारण आम्ही सर्व बरचसं टिपण्यासाठी,पाहण्यासाठी, आणि त्या सर्वांसोबतच जितका नवीन ऑक्सिजन घेता  येयील तितका घेणार होतो .
 निदान मलातरी तेच हव होत
 २४  ला सकाळी होस्पेट साठी सोलापुर वरून जे बसलो होतो ते संध्याकाळी वेळेत पोहोचलो ,थंडी मात्र नाममात्रच वाटत होती . तितकाच एक सावज शोधणारा पटकन आम्ही उतरत असतानाच चढला आणि नंतर त्यानेच आम्हाला  नाही नाही म्हणत असता आमच्या सोयीनुसार अगदी हव तस फक्त झोपेपुरता एक  मच्छरदाणी वाला बिछानाच मावेल असा  एक हम्पी गावातल घरवजा पिंजरा च  मिळवून दिला  ,
आणि मग आम्ही फेरफटका मारायला निघून गेलो 
 हम्पीची ओळख असणारं विरुपाक्ष मंदिराला सांज भेट म्हणावी तशी देवून आलो तर तिथेच मंदिराचा हत्ती सर्वांच पैसे  घेवून"च" आशीर्वादाने मनोरंजन  करत होत . मयूरेशला  आवडतात  हत्ती तो भारी खुश झाला . (इथे मयुरेशनेच  टिपलेला हत्त्ती टाकावा असा विचा र आहे   बघू विचारतो त्याला )

आम्हीसुद्धा  मोठाल आणि कृष्णादेव राय  राजाच्या  कालखंडात भर पडलेले विरुपाक्ष मंदिर  जे व्यवस्थित जून आणि नव (बरच  रेस्टोरेशन चे काम सुद्धा चालू आहे)  यांचा समतोल सांभाळत होत त्या  मंदिरातील छतावरील पेंटीग  म्युरल्स पाहताच पूर्ण सहलच सार्थकी लागल्यासारखं झालं असा मला लगेच जाणवलं  त्यावरील विषयही  कृष्णावतार,सुर्य, राजाच्या दैनदिन घडामोडीवर आधारित अशी आहेत  .  



 
विरुपाक्ष मंदिरातील छत 



भित्तिचित्र .
.सामान ठेवून आम्ही दुसर्या दिवासापासून  फिरण्यासाठी सायकल भाड्याने घेतल्या आणि छानपैकी गावातल्याच एका अण्णाच्या घरवजा हॉटेल मध्ये जिथे मोमो पासून, बनाना लस्सी, अमेरिकन ब्रेक फास्ट पर्यंत सर्व मिळत. 

असल्या टिकाणी व्यवस्थित ताव मारला
दुसर्या दिवसापासून उत्सुकता थोडी कमी झाली होती .
कारण आम्ही आता हम्पीचेच चेच झालो होतो ना  . :) 

क्रमशः
………………………

आज गुढीपाडवा च्या आदला दिवस
दोन महिने झाले खरतर आणि कामाच्या धावपळीत आणि मिळवण्याच्या गडबडीत लिहिता आल नाही जे सुचलं ते हि त्या धावपळीच्या  वैतागा मध्ये आपण आत्ता ह्या क्षणी हम्पित सायकल चालवत
 असतो तर इथपर्यंत . …
 श वास (श्वास) आणि मृत्यू ह्यांचा संबंध आपण जिवंत असेपर्यंतच आणि असे तर बर्याचदा आपण स्वतः स्वतःमध्ये बर्याच क्षणी स्वतःमध्ये जिवंत आणि मृत पाहत असतो…
असो,
तर ,आम्ही जवळच्या स्थळांपासून सुरुवात केली आणि काही स्थळ आम्ही स्वतःच त्यातल्या   सौंदर्यातून टिपायला सुरुवात केली .त्यत  सर्वप्रथम सकाळी आमच्या राहत्या घराच्या छतावरून पहाटेच एक लांडोर समोर असणार्या मोठ्या शिळेवर सावध पावलं टाकत बागडताना दिसला,
 माकडे, चाफ्याचे  झाड,  मोठाले शिळे , त्याच्या  रचण्याच्या विविध पद्धती, वासुदेव सदृश्य  बाबा,
"सोडाना" स्कल्प्चर स

 (हा शब्द आम्ही कामक्रीडा कोरलेल्या ज्या उत्थीत मुर्त्या आहेत त्यांना वापरायचो.) त्यावेळेस वापरण्यात येणाऱ्या   शिळां तोडण्याच्या प्रक्रियेतील खुणा ,

 भग्नावशेशान्मधून भेटणारा छाया प्रकाशाचा खेळ ,आणि बर्याच पुराण कथेंचे उत्थीत  कोरीव काम , बिंब-प्रतिबिंब  असं पाहत, टिपत होतो . जवळजवळ सर्व महत्वाचे शिल्प काम (मुख्यत्वे द्राविडी अन) आणि हिंदू आणि इस्लामिक स्थाप्त्य्कालेचे मिश्रण असे  हे अखंड कोरीव काम आहे आणि मंदिरांच्या उभारणीमध्ये कळस हा  विटा ( आणि मुलाम्याने 




केला असून बाकीचा भाग हा दगडी कोरीव आहे आणि मुख्यत्वे  त्यामध्ये पुराणकथांचा समावेश आहे
प्रत्येक महत्वाच्या मंदिरांसमोर  त्यावेळच्या ऐश्वर्याला शोभेसे मोठी बाजारपेठ तसेच पुष्करणी

अच्युतराया मंदिर बाजारपेठ आणि पुष्करणी 

 आणि जागोजागी असणारे हनुमान, नंदी ह्यांची शिल्पे , शिलालेख, गवतावरील दव आणि कोळ्यांच्या जाळा नि झालेले सुंदर दागिने . 
तर आम्ही हे असं सर्व आमच्या वेगाने पाहत, टिपत होतो. 




क्रमशः




                            

No comments:

Post a Comment