display: inline-block;

Feb 22, 2016

"अमलताश "

अमलताश

कै . प्रकाश नारायण संत …
कवियत्री इंदिरा संत ह्यांची आई , तसे मला नावावरून ह्या व्यक्ती नावा पर्यंतच  माहिती होते .आता राई इतकी भर पडली इतकच . जरा , नाखुशीनेच वाचनालयातून हे  पुस्तक आणले गेले कारण खरतर आत्मचरित्रात्मक पुस्तकांविषयी माझ्या मनात एक निश्चित स्पष्टता नाही आहे , आणि खरखर म्हणजे इरावती कर्वे ह्यांचे "परिपूर्ती" वाचल्यावर मला युगांत हवे होते , परंतु माझ्याआधीच ते अगोदर कोणीतरी घेवून गेले होते त्यामुळे निराशाच झाली त्यामुळे वाचनालयात बरीच पुस्तकांची उलथापालथ केल्यानंतर "अमलताश" हे सुप्रिया दीक्षित ह्यांचे पुस्तकच घेवून जावे हे ठरवले . असे मी का ठरवले ह्यामागे माझी माझे स्वतःचे स्वतःविषयी असणारे नियम तपासून पाहण्याची एक वृत्ती सतत मागे असते . आणि की होईल जास्तीत जास्त नाही आवडले तर दुसर्या दिवशी पुन्हा "युगांत आले असेल का य्हाची चोकशी कार्याला म्हणून पुस्तक परत  करून आलो असतो असे माझे बर्याच वेळा झाले आहे आणि बरीच चांगली पुस्तके मला भेटत गेली ,
प्रकाश नारायण संत ह्यांच्या लेखनाबद्दल मला आमच्या माणिक madam  नि काही वर्षापूर्वी सांगितल्याचे आठवले .
खरतर मी कोणी एखादे पुस्तक सुचवल्यावर वाचणाऱ्या तला नाही recommendation म्हणून वाचण्यापेक्षा स्वतःचे पुस्तक तास-दीड तास कधी कधी पंधरा मिनिटे सर्व कपाटे पाहत पाहत निवड करण्याबद्दल मी आग्रही असतो . आणि मनापासून असे कि स्वतः पुस्तक शोधून वाणाची आवड वाढवण्यात माझा स्वतःचा आनंद मला सापडतो . ह… म्हणून कोणी सुचवलेले पुस्तक अथवा लेखक माझ्यासाठी महत्वाचे नाही असे नाही तो योग जर तसा जुळून आला तर माझ्या मनात सुचवणाऱ्या बद्दलचा आदर मात्र वाढतो त्याचाही आनंद वेगळाच .
तर अस हे "अमलताश" मला माझ्या हल्लीच्या मानसिक तणावाच्या काळात एक नकळत एक सकारात्मक आणि जीवनाविषयी जीवनाबद्दलच्या विचारांचे असणारे एक आनंद देवून गेले .

अमलताश - सुप्रिया दीक्षित

माझ्या छोट्या ताईला वाचण्याबद्दल मला आग्रही मताचे करून गेले . …… २१/२/२०१६

Feb 5, 2016

कोकणातील घरे आणि ....

कोकणातील घरे  आणि त्यामधील निरव , थंड कौलारू शांतता  खासकरून  मध्यान्हाच्या वेळी जाणवणारी अशी ....... ती  भरभरून तृप्ती देते .
जी शांतता कदाचित मंदिरांमध्ये सुद्धा अचानक होणाऱ्या  घंटानादाने दुभंगली जाते . त्यापेक्षा कितीतरी सखोल ,खरतर प्रगाढ अशी शांतता घरात अनुभवायला मिळते . त्या शांततेत अविचल (Motionless)  हि अवस्था काय असते ह्याची  जाणीव झाल्याशिवाय राहत नाही ,किंबहुना ……… 
ती जाणीव संपूर्ण  शरीराचे अस्तित्व व्यापून टाकते , आणि त्यामधून बाहेर आल्यावरसुद्धा जे वातावरण (झाडे , गावातील जेष्ठ  माणसे ,विहीर, दाणे  टिपणाऱ्या कोंबड्या, ताईच्या नारळाच्या झाडाखाली ठेवलेली मोडलेली खुर्ची  )  असते त्यामधील त्याचे पडसाद दिसल्याशिवाय राहत नाही . ४\२\२०१६


Feb 1, 2016

" श्वासोच्छ......वास " Breathing

" श्वासोच्छ …… वास "
Breathing

१/२/२०१६