display: inline-block;

कलेबद्दल !





"आपल्याला  परिपूर्ण चित्र काढायचे आहे? सोपं आहे ,आपण स्वतः परिपूर्ण व्हायचं ,
आणि सहजपणे चित्र काढायचं"
अर्थात इथेही मर्यादा म्हणून बऱ्याच शक्यता  त्यांच्या त्याच्या अंगभूत सामर्थ्य घेऊन आपल्यामार्फत  व्यक्त होत असतात . 



माझ्या घडणीची महत्वाची वर्षे चाळीत गेली , त्यामुळे तिथे कलेसाठी लागणारी "एकांतता"?  मिळणे 

मुश्कील आणि तिथे पहिल्यापासूनच पेंटिंगसाठी  लागणारे "आधुनिक" साहित्य हवे तसे कधीच 
मिळाले नाही.अशा वेळेस स्वतःच स्वतःचे माध्यम
निर्माण करून काम करायची सवय लागली आणि हळूहळू तिचे महत्व वाटायला लागले
नैसर्गिकपणावर  भर वाढायला लागला. 
१२\०४\२०१०

चित्रासंदर्भात "विचार" करतो तेव्हा त्यातील अभिव्यक्तीच्या जाणीवाबद्दल प्रथम विचार येतो.
कि ती कुठून येते ?
मग त्यसाठी मागे वळून पाहताना काही आठवणी ,प्रसंग हे जसेच्या तसे आठवतात आणि त्या
 दृश्य रुपात बघताना त्याला एक वास्तव आधार मिळतो,चित्ररुपाने,पण जाणीवेच्या या 
आविष्कारामधून आताच्या माझ्या चीत्रांबाद्दल्च्या विचारांना काही आधार मिळतो का? आणि 
तरीही त्या नैसर्गिक पद्धतीने कशा व्यक्त करता येतील ह्यावर माझे चित्र अवलंबून असते .
अशा ह्या प्रकारे माझेचित्राबद्दल प्रयोग सुरु असतात त्यामुळे कधी कधी मला चित्रा एकाच 
तंत्राने करणे जमते पण ,त्या तंत्रामधून जेव्हा एका तंत्राचा "जन्म" होत आहे असे जाणवते
त्या वेळेस ते "जाणीवपूर्वक" हाताळणे मला महत्वाचे वाटते .ते मला "चित्रदृश्य्पेक्षाही" 
महत्वाचे  वाटते. ते अनियमित आणि अनिश्चितहि असेल.पण त्याचे सतत नियमन करून
 त्यातून एक लयबद्ध आणि जाणीवा व्यक्त करणारे दृश्य निर्माण होण्याची प्रक्रियाच मुळात वैशिष्ट्यापूर्ण आहे,आणि अशा प्रक्रियेत प्रत्येक कला -विश्काराच्या मार्गाने स्वतालाही 
घडविण्यासाठी थोडी चालना मिळते.
पण जर चित्राच्या निर्मितीची प्रक्रिया हि जर एका विशिष्ट  तंत्रापुर्ताच मर्यादित असेल तर त्या
कलेलाही मर्यादा येतात आणि एक सृजनप्रक्रिया थांबते .

"सृजन्प्रक्रिया" हि ज्ञान मिळवण्याचे सर्वात स्वतंत्र मार्ग  .
प्रत्येक ज्ञान हे सर्वत्र वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध झाले असले तरी  त्या ज्ञानाची गरज
आपल्या मधून येणे हे जास्त महत्वाचे आणि त्या गोष्टी अनुभवाने क्रमाक्रमाने होणे म्हणजे

ज्ञान!
"ज्ञान"म्हणजे"माहिती" हा समज न  होता  ती  एक  जगण्यासोबत होणार्या    जाणिवांची विशीष्ट
क्रमाने चढणारी पायरी आहे उदा: फूल - फुलाचे "उमलणे" हे त्या फुलाला सुंदरता प्राप्त 
करून देते आणि उमलणे हि एक क्रिया आहे  .तसच कलेचे,ज्ञानाचे...  
१२\०४\२०१०

आपण आपल्या तंत्रामध्ये योग्य तितके पारंगत असतो परंतू तीच मुल्ये आपल्या दैनंदिन
जीवनामध्ये देखील त्यांच्या  त्यांच्या मर्यादेनुसार कमी अधिक प्रमाणात तितकीच लागू
पडतात ह्यांचा अनायासे विसर पडतो.खरंतर  आपल्यामध्ये निर्माण झालेली आपली 
कलेबद्दलची जाणीव आपल्यात पूर्णपणे उतरली आहे कि नाही ह्याबद्दलची जाणीव लगेच समजते 
ज्यावेळेस आपण इतरांमध्ये असतो बस फ़क़्त त्याबद्दल जरासे भान असल पाहिजे आणि 
स्वतःला अलिप्त राहून बघण्याचा सराव हवा !
 २४\०६\२०१०

No comments:

Post a Comment