display: inline-block;

Aug 2, 2018

प्रयत्न करणे ..............

प्रयत्न करणे आणि  चुकांची जाण होऊन पुन्हा नवीन  होण्याच्या  प्रयत्नांतीत  आन्दोत्सुक्ता हा प्रवास होणे इथे खारीची दुडदुड :)




Feb 27, 2018

संवेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो ............

सं

वेदना निखळपणे अनुभवत त्याचे रूपांतर करत मनमोकळं राहणे हा अनुभवाचाच प्रत्यक्ष भाग असतो . पण ,  ह्या अशा  अलंकारात व्यक्त होण्यामागील प्रक्रियेच्या जडणघडणीमध्ये  मातीच्या  ......  नवीन स्पर्शाचा आनंद मनात त्या प्रक्रियेची  पुन्हा अशी निश्चित उत्सुकता तेवत ठेवतो .  
माझ्या जन्मस्थळापासून ( वेंगुर्ला ) तासाभराच्या अंतरावर राहणाऱ्या ताई कडे  आलो आणि  खरतर आलो होतो बऱ्याच दिवसांपासून बरं वाटत नव्हतं . काही दिवस गेले  स्थिर वाटण्यात आणि नंतर सहज साराच्या शाळेत ताईच्या साक्षीने ;) एक चित्रकलेचा  उपलब्ध रंगातून  छोटा हत्ती  ;) वर्ग घेण्याचे ठरवले . वर्ग घेतला अगदी  कोलाहल प्रतिसाद मिळाला :) मग , त्यावरून दुसऱ्या दिवशी आसपासच्या आणि घरात  असलेल्या रंगांच्या पर्यायांमधून सहजपणे रंग मिळवून हि चित्राची आवड जोपासता येऊ शकते . चित्र जमू शकते . तेही झालं ...  मजा आली, मुलांनी आपल्या शक्यता सिद्ध केल्या
माझे तिथे असणे  त्यांनी अस्त :) करून टाकले पण, त्याचसोबत एक विचार आकार घेऊ लागला होता . 


क्षणांचे समज - गैर करतात स्वतःला  खरतर स्वतःपासून आणि हळू हळू इतरांपासूनही . शब्द निघून गेलेले असतात  तोंडातून म्हटलं "तुझ्यापेक्षा  मला हि वही महत्वाची " आणि  क्षणाचे ते पडसाद  गडद होत जातात . तुटताना .......  सुटताना ........ जाणवत राहत सर्व . 
मग पुन्हा निसर्ग पाठवतो एक 
 भुंगा 
क्षणाला संपूर्ण भंग करण्याचे  . संपूर्ण शरीर मनाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांचा पंखांच्या इवलुश्या सनसनाटी   <<<<<>>>>>  वेगात असतं . 
तो क्षण असतो पुन्हा  होण्याचा 

 


Jan 27, 2018

Postpone

post पोन चार दिवस  १५-१६-१७-१८