display: inline-block;

Jun 28, 2011

आपले अपूर्णत्व पूर्ण करते ती "आई"
मग ते काही का असेना .. 
११/०३/२०११

"Chitra"

कुठलाही "जीव " निसर्गात  नाव घेवून जन्माला येत नाही ,मग चित्र हे जर एका आंतरिक बीज प्रेरणेतून आले असेल तर त्याचाही शीर्षकाशी काही पूर्ण संबंध उरत नाही ,पण त्याच दुसर्या बाजूने जर का चित्र प्रयोगातून किंवा विचारातून जन्म घेत असेल तर मग त्याचे शीर्षक होणे असते आणि पण तरीही हे दोन्ही प्रकार दर्जात्मक रित्या बरोबरीचे आहेत .कारण "जन्म"होणे अथवा जन्माला घालणे हीच मुळी महत्वाची आणि अवघड प्रक्रिया आहे.२८/०६/२०११

Apr 28, 2011

" पाया "


 पाया जर का मजबूत मिळाला तर मग त्यानंतर ते कृत्रीमपणाने रचण्यात काही अर्थ नसतो.सुरु कराव 
रचले आपोआप जाते आपल्या जाणीवेने आणि आपल्यात असणाऱ्या सहजतेने ,
त्यामुळे माझ्यामते त्याची सहजता टिकून राहते आणि आपली एका अर्थाने कुठल्याही अहंभाव न उरता "वाढ" होते .

२४/०४/२०११ 


Mar 16, 2011

प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या.......


प्रत्येक जाणीव व्यक्त करणाऱ्या माध्यमालाही मर्यादा असतात ,आणि कधीकधी आकारापेक्षा "शब्द" हे आपल्याला त्या गोष्टीचे "ज्ञान  "लगेच करून देतात .
एका गोष्टीवर मांडलेला विचार नाहीसा होण्याची शक्यता नाही नाकारता येत पण मग ते "विचार" परिपक़्व होण्याचे चिन्ह मानावे "शेवट" नाही.

नेहमीच मनामध्ये

नेहमीच मनामध्ये चालू असणारी विचार प्रक्रिया हि "मूर्त" आणि "अमूर्त " (म्हणजे  माझ्यामते कधी कधी विषयाचे बाह्य सौंदर्य जाणवणारी तर कधी त्यामधील अनेक शक्यतांचा विचार दृष्याद्वारे करायला लावणारी ) असते .त्यावेळेस ते व्यक्त करतानाही आपापल्या "नैतिक आणि अनैतिक मर्यादेमध्ये राहून जाणीवांना दृश्यरूपात अभिव्यक्त करतानाच्या पद्धतीचा ,कालावधीचा  हि तितकाच विचार करणे महत्वाचे आहे .

Jan 19, 2011