display: inline-block;

May 9, 2013

"--------------"

Tears drinking moths self

ओल्या झालेल्या पंखांचे उडणे कठीण होऊन जाते.
श्वास ओले झाले कि डोळे बंद होऊ लागतात. 
कृष्ण विवराचा शोध संपतो,
आणि समोर असणारे सर्वच अनोळखी होऊ लागते. 
किंबहुना आपलं असणंच संपून जाते  
आणि त्या नसण्याशी एकरूप हि होता येत नाही.
श्वासांचा वेदनांशी संपर्क राहतो फ़क़्त ,
आणि 
गुन्हा घडत असतो आपल्याकडून, 
त्या सर्व वेदनांना जिवंत ठेवण्याचा. 
काही पाखरं येतात अश्रू प्यायला,
पण 
त्या मरणात येणाऱ्या या सुखाचा अधिकारहि  
त्या श्वासांचा राहत नाही.
जिवन आणि मरण ह्यामधील श्वासांसोबत 
आपलं असणंहि आपलं राहत नाही.
----------------------९ मे २०१३  





  





No comments:

Post a Comment