सुकत चाललेल्या वीर्याचा वास जेव्हा आठवणींचे तळ गाठतो . त्यावेळेस त्याच्या स्वतःमधील माझ्या अस्तित्वाची जाणीव जाळून टाकते आशा, अपेक्षांचा बराच हिस्सा ,
मी माझ्या हिश्शयाचा तेवढा उरतो
सुका .... आणि
स्वतःला समजावत राहतो
धामणस्करांच्या कवितेतील ओळी ....
गळून पडलेली रंगीबेरंगी फुले ,
ती पूरती विवर्ण झाल्याखेरीज
मातीही त्यांना सामावून घेत नाही.
No comments:
Post a Comment