display: inline-block;

Oct 8, 2016

आज म्हणजे ७ /१०/२०१६ दोन संभाषण वजा मुलाखती ....



 Lunch time from the railway door heading towards Nehru center 

आज  म्हणजे ७ /१०/२०१६ दोन   संभाषण वजा मुलाखती खरंतर चित्रकारांचे मनोगत (आं तरहेतू)व्यक्त  करताना   ऐकायला आणि पहायला मिळाले वेगवेगळे  करण्याचे कारण  असे कि  ज्यांचे सुरवातीला  ठरले होते ते म्हणजे  श्री . प्रभाकर कोलते  हे काही महत्वाच्या कारणांमुळे  प्रत्यक्ष  उपस्थित  नव्हते  म्हणून  त्यांनी त्यांच्या मनोगतिक  मुलाखतीचे  मनमोकळे पणे  रेकॉर्डिंग आमच्यासाठी केले होते  ... त्यामुळे खरंतर त्यांचे नसणे हे त्यांचे त्यांच्या चित्रप्रक्रियेबद्दल  मनोगत ऐकताना ते जे सांगण्याचा म्हणजे जसं  चित्र ज्याप्रमाणे त्यांना पूर्णत्वाच्या दिशेने संकेत देत असते ते  त्याप्रमाणे त्यांचे  तिथे प्रत्यक्ष  नसणे  हे त्यांचे असणे असावे का? ह्याचा मला  मनात कुतूहलयुक्त सांकेतिक विचार एक  देत होते .

आणि दुसरे होते ते श्री दिलीप रानडे सरांची  ते श्री . प्रभाकर कोलते ह्यांच्या व्हिडीओ विझ्युअल ला उपस्थित असलेले पाहिले , त्यामुळे  आधीच्या  अनुभवाने शंका  निर्माण केली होती  निवळली  . आणि अर्ध्या  तासाच्या ब्रेक नंतर ते पूर्णपणे अनुभवायला मिळणार  उत्सुकता निर्माण झाली . खरंतर  रानडे  सरांना  मी म्युझिअम मधील नॅचरल हिस्टरी सेक्शन मधील म्युरल  प्रेझर्वेशन  च्या कामामुळे  एक संवेदनशील  कलाकार म्हणून  ओळखतो त्या.नंतर मी त्यांची कॅटलॉग आणि पुस्तकांमधून  चित्र, आणि स्कल्पचर पहिले  त्या मुळे  एक कि  त्यांची  त्यामागील विचारप्रक्रियेचि  उत्सुकता कुठेतरी  मनात होती किंबहुना त्यांच्या  सर्व कामांपेक्षा माझ्याकडे असणाऱ्या  श्री . सुधीर पटवर्धन ह्यांनी क्युरेट  केलेल्या  " विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला Expanding horizons  ह्या पुस्तकवजा   कॅटलॉग मधील  काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," ह्या बद्दल  उत्सुकता  रुजून  कुठेतरी होती .  मी काफका  वाचले नाही किंबहुना वाचेन  कि नाही हयाबद्दल  माहित नाही पण मध्ये मध्ये वाचनात येणारे कोट्स आणि एक फिलॉसॉफिकल लेखक म्हणोन  वेगळे स्थान  प्राप्त केलेला लेखक अशी थोटकी माहिती असली तरी त्याच्यासोबत येणारे metaphor  सारखा जड  शब्द  हि त्याच्याबदल्लची  जाणीव कुठेतरी स्वतःसाठी वेळ मागत   होती  .
  श्री . दिपक कन्नल आणि  श्री . दिलीप रानडे 


 कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल अशी जाणीव निर्माण झाली होती . अट्टहास नव्हता
चित्रामुळे निर्माण झालेली  उत्सुकता कुठेतरी रुजून हरवली होती .
  रानडे सरांसारख्या व्यक्तींचे public ally चित्रप्रवासाबद्दल सहजी  व्यक्त  होताना त्या  कुतूहल मिश्रित प्रश्नाचे  मिळालेले मला उत्तर हे अनपेक्षित असण्यापेक्षा  त्यांच्या  कलाप्रक्रियेच्या  प्रवासामधून असल्याने ते संयमित स्पष्टीकरणाद्वारे  सहज  असे होते.
 खरतर त्यांच्या बोलण्याने माझ्या  त्या रुजलेल्या प्रश्नाची अधोरेषा पुसून काढणारे होते .
 हे मला जाणवले . आणि निघालो



" विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला
 Expanding horizons  
ह्या पुस्तकवजा  कॅटलॉग मधील  
श्री . दिलीप रानडे  
यांचे काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," २०१३


No comments:

Post a Comment