display: inline-block;

Jun 27, 2012

पाळीव  माणसाने लिहिलेली कविता .
----------------------------------------
----------------------------------
-------------------------
------------------------------
--------------------
------------
------------
------------------------------
-----------------------------
-------------------------
-----------------------
-------------------------
----------
--------------------
-------
----------------
-------------
-----------आदेशावरून   .

-------     
 पाळीव माणूस

    

Jun 18, 2012

उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा

उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा बघायला मिळणे हा एक आनंद असतो ,
तसाच आनंद अगोदर एकटा पक्षी दिसल्यावरही व्हायचा ,
पण .
एके दिवशी जेव्हा जाणवलं  कि ,
जर तो पक्षी आपले घरटे शोधत असेल तर , जर तो आपले साथीदार शोधत असेल तर ...
तेव्हापासून जेव्हा जेव्हा असा पक्षी दिसतो तेव्हा आपणही त्यासोबत असाव असे वाटते .
पण,
उडण्याच स्वातंत्र्य त्याच्या इतके आपल्याकडे नसते आणि त्याच्या इतका  उडण्यासाठी लागणारा  एकटे पणाही ---------18 जून 2012  अभिजित 

Jun 11, 2012

Fabric Creation and tea time

Tea time


Fabric exploration

May 16, 2012

दो घूंट पानी ,
प्यास बुझा नहीं सकती 
जब तक  जिन्दा है 
आदमी ,
दो घूंट बांटने  से 
प्यास  कम  जरूर होती है 
जब तक  जिन्दा है 
आदमी .- अभिजित 

May 9, 2012

 माझी तीन  माकडे....... 
भूतकाळ  जो आता आपले डोळे झाकून आहे .
वर्तमान काळ  जो काही ऐकत  नाही .
भविष्यकाळ  जो आताच  काही बोलायला  तयार नाही. 

Jan 21, 2012

माझे प्रत्येक चित्र

माझे प्रत्येक  चित्र खुल असावं,
त्याच स्वतःची एक योग्य जागा असावी,
न बदलणारी ,
ह्यापलीकडे एका  चित्राला तरी काय हवं असतं?
स्वप्नांन्च्या  राज्यात जाण्यासाठी लागणारी जादुई चटई होण्याअगोदरच,
आईच्या मृत्युनंतर माझे  सर्व अश्रू स्वतःचे मानणारी,मला सावरणारी माझी उशी,
सकाळी उठण्याचे बळ देणारी माझी उशी
स्वतः बराच काही सोसले हिने माझ्यासाठी ,
अशी हि माझी सुद्धा फाटकी उशी ही तर माझ्या आईच्या दुखाची साठवण घेउन श्रीमंत झालेली,
हिच्या शिवाय  दुसर्या कोणासमोर आता आईसाठी अश्रू येतहि नाहीत ......२१ जानेवारी २०१२ २:३८ रात्र 

Add caption

Dec 16, 2011

खुली आंखो से साफ साफ दिखाई देना कभी कभी मुश्कील  बन जाती है |


और अंधेरे मै  सोना चाहो तो,
आंखे बंद करने कि आदत साथ नाही देती |
अंधेरा तो वैसे हि अपने आप मी पुरा होता है |
ये समझने से पहले हि
रोशनी कि चाहत उसे भी उलझन बना देती है | < 

Dec 15, 2011

माणूस ....


"माणसाच्या खऱ्या मुलभूत गरजा ह्या त्याच्या  मानसिकतेवर अवलंबून  असतात " १२/१२/२०११ 

स्वतःला जे

स्वतःला जे जीवनात  करावयाचे आहे ते करण्यासाठी जगयाचे म्हटले तर "संघर्ष "हा वेगळा म्हणून काही उरत नाही,किंवा  वेगळा म्हणून कोणाशी करावा हि लागत नाही < अभिजित १८/१२/२०११ 

प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट !

सामान्य माणसासाठी चित्र म्हणजे काहीतरी महाग ,काही तरी पलीकडले ........
श्रीमंताला चैनी गुंतवणूक ,
संग्रहालयात एक कलेचा  ठेवा म्हणून '
आणि सरकार ला एक जबाबदारी म्हणून, कारण ते सतत बदलत असते ,
(अर्थात अपवाद आहेतही पण ते अपवाद ह्या शब्दा इतकेच मर्यादित असतील ह्याची खात्री )
कलाकार महाग म्हणून स्वतःची कला विकसत नाही करत तर मुग ती एक गुंतवणूक कशी होते हा मुद्दा नक्कीच गंभीर आणि मजेशीर हि असेल,आणि ऐतिहासिक गोष्ठीमध्ये सुद्धा प्रचंड गुंतागुंत असते ,कला हि राष्ट्रीय सम्पती पेक्षा एकतर वैश्विक तरी असते किंवा वैय्यक्तिक तरी असली पाहिजे ,

प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट १८/१२/2011

Nov 7, 2011

निसर्गाबद्दल ठराविक विचार....

निसर्गाबद्दल ठराविक विचार आला कि त्या क्षणी निसर्गाबद्दल खऱ्या असणाऱ्या त्या सर्व शक्यता ज्या अमर्याद आहेत त्या सर्व मागे पडतात आणि उरतो फ़क़्त त्यांच्याबद्दल आपला असणारा दृष्टीकोन आणि सुरु होतो एक संवाद,  

Nov 3, 2011

समजुतीची बीजे हृदयातच जातायत ना ?
ह्याची शंका येउ लागली  ,तेव्हा पासून ते बीज रोवण्याची प्रक्रिया  जरा सावध झाली आहे.
शरीरातल्या संवेदानाचे  काय ? 
आपल्या प्रक्रियेत त्यांचे स्वतःचे कितीतरी नुकसान अगोदरच झाले असते ,
भूकंपातील पडक्या ,उघड्या भिंतीन्सारखे ,
आणि स्वतःला सावरण्याचे प्रयोग मात्र सुरु असतात ,
त्या भिंतीवर चालणार्या मुंगीसारखे . --- 


अभिजित 
    ३ नोव्हेंबर  ११  

Jun 28, 2011

आपले अपूर्णत्व पूर्ण करते ती "आई"
मग ते काही का असेना .. 
११/०३/२०११

"Chitra"

कुठलाही "जीव " निसर्गात  नाव घेवून जन्माला येत नाही ,मग चित्र हे जर एका आंतरिक बीज प्रेरणेतून आले असेल तर त्याचाही शीर्षकाशी काही पूर्ण संबंध उरत नाही ,पण त्याच दुसर्या बाजूने जर का चित्र प्रयोगातून किंवा विचारातून जन्म घेत असेल तर मग त्याचे शीर्षक होणे असते आणि पण तरीही हे दोन्ही प्रकार दर्जात्मक रित्या बरोबरीचे आहेत .कारण "जन्म"होणे अथवा जन्माला घालणे हीच मुळी महत्वाची आणि अवघड प्रक्रिया आहे.२८/०६/२०११

Apr 28, 2011

" पाया "


 पाया जर का मजबूत मिळाला तर मग त्यानंतर ते कृत्रीमपणाने रचण्यात काही अर्थ नसतो.सुरु कराव 
रचले आपोआप जाते आपल्या जाणीवेने आणि आपल्यात असणाऱ्या सहजतेने ,
त्यामुळे माझ्यामते त्याची सहजता टिकून राहते आणि आपली एका अर्थाने कुठल्याही अहंभाव न उरता "वाढ" होते .

२४/०४/२०११