display: inline-block;

Dec 23, 2012

वाळूही जिवंत ठेवते

हातातून वाळू निसटत असते
खरतर समुद्रावर आलेलो असतो .
दूरवरचा अस्त पाहायला ,
पण जवळच्या  जाणीवा 
ह्या वाळूतच सापडत जातात ,
रंग भिडत जातात पण
वाळूचं  निसटण आत कुठेतरी जाणवून देते  .
त्या खर्या शब्द,भावनांचे स्पर्श
तासांचे क्षण होतात ह्यातच
आणि 
संध्याकाळ हि आठवणीसाठी असते .
हि जाणीव पुन्हा  करून देतो ,
अस्ताचा अंधार....



आणि हाच अस्ताचा अंधार 
दुसरीकडे कुठेतरी
पहाट करत आहे
हि जाणीव जोपर्यंत असेल ,
तो पर्यंत त्या वाळूचा स्पर्शही .
                                         अभिजित २३ डिसेंबर 

No comments:

Post a Comment