मी भटकतो .
शोधण्यासाठी नाही,
चकित होण्यासाठी.
चकित होतो ,होण्यासाठी नाही,
सामावण्यासाठी .
सामावत ही नाही पूर्ण,
समजण्यासाठी .
तिथपर्यंतच जोवर पाय राहतात समेवर .
मी भटकतो ,
काहीतरी घेवून काहीतरी होवून ,
जोडण्यासाठी .
तुट तेही ,
मनाच्या समाधानासाठी .
क्षणाच्या सोबत बसलेलो असतो ,
झोपलेलो ,
मेलेलोही असतो.
जिवंत आहे कशास हे जाणण्यासाठी ,
हेवा वाटतो
कधीतरी इतरांचा ,
माझ्या मलाच पडलेल्या '
प्रश्नांच्या उत्तरांसाठी.
ठीक आहे ..
मी भटकतो , ते
सापडलही उत्तर .
पण ते जगण्यास पुरेस के नाही ,
हे काळत नाही .
मी भटकतो
एकच खर आनंदी
राहण्यासाठी ..
मी लिहिलेही हे अशाचसाठी ,
काहीतरी ओझं कमी करण्यासाठी
............................................
अभिजित १३ जानेवारी २०१३
No comments:
Post a Comment