संध्याकाळ ...
उडणाऱ्या पक्ष्यांची रांग .
त्यातल्या प्रत्येकाची एक स्वतःची अशी आर्त हाक .
संध्याहाक
असं वाटते आता
त्या घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांना
आकाशाने गिळून तर नाही टाकलं .
हा माझाच मूर्खपणा
त्यांच्या त्या हाकेचा पाठलाग करणं
कधी जमलंचं नाही मला .
आर्ततेची ती हाक आकाशात विरून कधी जायची ,
कळायचंच नाही ..
खरतरं लक्षच निघून जायचे .
माणसांच्या थव्यात .
मी आधीच हरवलेलो
आधी हरवलेलेच दिसणार ......
अभिजित १८/०१/२०१३
उडणाऱ्या पक्ष्यांची रांग .
त्यातल्या प्रत्येकाची एक स्वतःची अशी आर्त हाक .
संध्याहाक
असं वाटते आता
त्या घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांना
आकाशाने गिळून तर नाही टाकलं .
हा माझाच मूर्खपणा
त्यांच्या त्या हाकेचा पाठलाग करणं
कधी जमलंचं नाही मला .
आर्ततेची ती हाक आकाशात विरून कधी जायची ,
कळायचंच नाही ..
खरतरं लक्षच निघून जायचे .
माणसांच्या थव्यात .
मी आधीच हरवलेलो
आधी हरवलेलेच दिसणार ......
अभिजित १८/०१/२०१३
No comments:
Post a Comment