चित्रासंदर्भात "विचार" करतो तेव्हा त्यातील अभिव्यक्तीच्या जाणीवाबद्दल प्रथम विचार येतो.
कि ती कुठून येते ?
मग त्यसाठी मागे वळून पाहताना काही आठवणी ,प्रसंग हे जसेच्या तसे आठवतात आणि त्या दृश्य रुपात बघताना त्याला एक वास्तव आधार मिळतो,चित्रारुपाने ,पण जाणीवेच्या या आविष्कारामधून आताच्या माझ्या चीत्रांबाद्दल्च्या विचारांना काही आधार मिळतो का? आणि तरीही त्या नैसर्गिक पद्धतीने कशा व्यक्त करता येतील ह्यावर माझे चित्र अवलंबून असते .
अशा ह्या प्रकारे माझे चित्राबद्दल प्रयोग सुरु असतात त्यामुळे कधी कधी मला चित्रा एकाच तंत्राने करणे जमते पण ,त्या तंत्रामधून जेव्हा एका तंत्राचा "जन्म" होत आहे असे जाणवते ,त्या वेळेस ते "जाणीवपूर्वक" हाताळणे मला महत्वाचे वाटते .ते मला "चित्रदृश्य्पेक्षाही" महत्वाचे वाटते. ते अनियमित आणि अनिश्चितहि असेल.पण त्याचे सतत नियमन करून त्यातून एक लयबद्ध आणि जाणीवा व्यक्त करणारे दृश्य निर्माण होण्याची प्रक्रियाच मुळात वैशिष्ट्यापूर्ण आहे,आणि अशा प्रक्रियेत प्रत्येक कला -विश्काराच्या मार्गाने स्वतालाही घडविण्यासाठी थोडी चालना मिळते.
पण जर चित्राच्या निर्मितीची प्रक्रिया हि जर एका विशिष्ट तंत्रापुर्ताच मर्यादित असेल तर त्या कलेलाही मर्यादा येतात आणि एक सृजनप्रक्रिया थांबते .असे मला नेहमी वाटते.
No comments:
Post a Comment