display: inline-block;

Jun 3, 2015

कुठल्याही क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या कलाकाराच्या अनुभवांतून आलेल्या शब्दांवर आपण कलाकार म्हणून.....


कुठल्याही क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या कलाकाराच्या अनुभवांतून आलेल्या शब्दांवर आपण कलाकार म्हणून आपल्या मतांद्वारे भाष्य करतो आणि मुख्यत्वे जेव्हा त्याचा टोन हा नकारार्थी असतो त्यावेळेस प्रत्यक्ष  प्रयोगाद्वारे मिळालेल्या  अनुभवातून  केलेले लेखन हे आपल्याला जाणवणाऱ्या बर्याच  सकारात्मक शक्यता कमीसुद्धा करू शकते किंबहुना ते सर्व बारकावे त्या प्रक्रियेसोबत लागू करणे कधी कधी अनावश्यक आणि प्रक्रीयेचा  गुंता वाढवणारे  होऊ शकते हे कुठेतरी आपण विसरतो . 
विचारांमध्ये असणारी स्पष्टता प्रायोगिक प्रतलावर बरेच बदलही घडवते किंवा बदल करण्यास भाग पाडते . ह्याची त्याबद्दल आपल्यामध्ये भिनलेली जाणीवच आपला एखादा बदल किंवा बर्याचवेळा तो गैरसमज  आणि आपला अहं काबूत ठेवण्यास कारणीभूत ठरते आणि प्रत्यक्ष कृतिचे आपल्यामधून जाणवणारे त्याबद्दलचे महत्व अधोरेखित करते . 
विचारांद्वारे जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपल्याला बरेच बारकावे नमूद करणे सहजशक्य असते परंतु प्रायोगिक अनुभवांद्वारे आलेली स्पष्टता  त्यातील बारकावे हे आपल्या कलेचे पूर्णत्व जपणारे असते . आणि एका ठरविक पातळीवर आपले अपूर्णत्व अधोरेखित करणारे असते . 
"त्यातील अपवादात्मक उदाहरणांमध्ये माझ्या लेखी सत्यजित रे येतात. हे त्यांच्यावरील मूळ बंगाली चिदानंद दासगुप्ता यांचे मराठी सुधीर नांदगावकर अनुवादित "अभिजात" या पुस्तकाद्वारे  तसेच त्यांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या काही चित्रपटांद्वारे मला जाणवू लागले .) खरतर हा पूर्ण विचार प्रसृत करण्यामागे ह्या पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे . तसेच ह्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्द्यावरून मित्रासोबत झालेल्या संभाषणातून ह्याचे बीज पेरले गेले मनात  ३\६\२०१५ 

No comments:

Post a Comment