display: inline-block;

Jun 8, 2014

समुद्रासमकविवाचन !

 कविता एकदातरी समुद्रासमोर व्यक्त केली जावी . 
समुद्रासमकविवाचन होवून जाव . 
पुर्णावधानाने . 
पाहावं 
अनुभवावं,
 भिडते का अथांगता  समुद्रासारखी 
लाटांच्या शिस्त बदह्तेत मुक्तपणे  अंगावर येते कि ,
दगडावर आपटून विखर्णाऱ्या  लाटेच्या थेम्बासारखी . 
कि ,त्या हेन्रीला समझ लेल्या पुन्हा परत न येणाऱ्या लाटेसा रखी 
ती तीव्रता जाणवतच नाही . 
समुद्राची डोळ्यांना न दिसणारी खोली आणि 
प्रत्येक त्या सामवून घेतलेल्या जीवांच्या क्षणोक्षणी 
जिवंत राहण्याची  कसब शिकवते कि नाही . 
परतताना तो  जसा शांत होतो तसा शांत करतो कि ,
सुनामीच्या त्याच परतणाऱ्या लाटांसारखा उध्वस्त करून टाकतो . 
*
७\६\२०१४


No comments:

Post a Comment