display: inline-block;

May 22, 2015

एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?

प्रिय ,
एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?
दोन समान्तर रेषां चा प्रवास काहीसा विरसपणा  कडे झुकणारा जाणवतोय . पण ह्या विरस पणा पुढील  खूप महत्वाची पायरी सुद्धा  मला जाणवतेय ह्या क्षणी  खरतर तेही तुला सांगावस वाटते .  ह्या विरस पणा ला  लागुनच  एकमेकांकडे तटस्थ पणे बघण्याचा अमर्यादित दृष्टीकोन देण्याच सामर्थ्य हे त्यामध्येच दडलेलं मला जाणवलं, ज्याने एक आशा जागृत राहते आपल्यामधील समांतर प्रवासात   .
जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्य"प्राणी" स्वतंत्रपणे विकसित होत असतो , त्याला ठराविक मर्यादेनंतर कोणीच इतर मनुष्य प्राणी  कारणीभूत उरत नाही .
शोध हा सतत सुरु असतो आणि त्या शोधाची प्रेरणा हि कुठेही असू शकते . परंतु , शोधाचे आपल्या आर्थिक , मानसिक, आणि वास्तवाशी  संबध असणे आणि आपल्या मनात त्या शोधाशी नात जोडणारे  बांडगुळ उगवणे ह्यातली तफावत फार संवेदनशील वळणावर संघर्ष करीत असते आपल्या  अहंशी.

विचार रुजण्यास लागलेला काळ आणि तो प्रत्यक्षात येई पर्यंतचा  क्षण त्याची परिपक्वता निश्चित करते आपल्यामधील सहजतेची  .

ते क्षमता ठेवते मला ,
मृत्युच्या अलीकडील पायरीवर बसून पाय बुडवून बसवण्याची ,
बसल्या जागी जरी मीच असलो , तरी 
माझ्यातील मीपण नाहीस करून 
प्रतीबिम्बाशी  नवीन ओळख करू देण्याची ,
माझा मीच उरत नाही तर आपल्या जुळणाऱ्या  मतांचं 
कसलं  ओझं ?
जिथे संपते सर्व .    

No comments:

Post a Comment