तल्लूर ल एन यांचे "the melting men " हे हल्लीचे मला सहज पणे आवडलेले एक काम ,
त्यासमोर मी उभा ते न्याहळत आणि त्याचवेळी माझा मित्र माझ त्याबद्दलचे माझे एप्रिसिअशन ऐकत असताना अचानक प्रश्न विचारू लागतो . की
काय आहे यात एवढ ?,
का ह्या कामासाठी हेच माध्यम योग्य ?
मला तर नाही वाटतआणि तसं इतकं भिडत हि नाही
ठीकच आहे
तो कुत्सितपणे आपले हसू लपवून ते पाहत राहतो नंतर मी निर्विकारपणे ते स्कल्प्चर माझ्या पुढे फुटत
,आणि तेही अनपेक्षितपणे स्फोट व्हावा तसे फुटतं .
जमीन रक्ताशिवाय बम्बाळ होते
आणि मग, मी विचारतो त्याला
कशासाठी होते ते ?
आणि
आता काय?
काय राहिलं ?
.................................................. .................................................. ……………….
ज्ञान हे प्रश्नांच्या उत्तराने मिळत नाही तर ,ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रक्रियेमधून आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नांमधील आपल्या बदलांमधून प्रतिबिंबित होत राहते - ------ ४ मे २०१५
No comments:
Post a Comment