display: inline-block;

Dec 30, 2015

जितक्या वेळा मी कलेचा सहजतेने ............... ३०/१२/२०१५

जितक्या वेळा मी कलेचा सहजतेने विचार करून पूर्ण विचारातच पूर्ण झालेले जाणीव करतो 
.तितकाच त्याच्या प्रात्यक्षिकाचा माझा (न होणारा) प्रयत्न गुंतागुंतीचा जाणवू लागतो .
हे कदाचित विचाराने प्रगल्भ आणि कृतीने शुन्य असे काहीसे निष्क्रिय भासू लागते . आणि सहजतेचा मग मी दुसरा पर्यायाने सोपा परंतु कृतीने आणि त्याच्या
विकसित करता येणाऱ्या शक्यतांचा असा न संपणारा मार्ग निवडतो.
सुरु करतो
आणि पूर्ण होणे आता ह्या होण्यातच माझा असा सहभाग जवळजवळ निघून जातो.
कलेतून काही सांगणे , दाखवणे, व्यक्त करणे ह्यापेक्षा किंवा ह्याव्यतिरिक्त तिथे ती असणे माझ्यासाठी महत्वाचे होऊन जाते मला म्हणून .
सहजप्रेरणा हा माझ्यासाठी माझ्या स्वतःचा म्हणून कलेच्या जाणीवे पासून ते व्यक्त होण्यापर्यंत  एकमेव असा महत्वाचा किंबहुना माझ्या सोबत  संपूर्ण वातावरणाची जाणीव स्वतः मध्ये तेवत ठेवण्याचा एकप्रकारे प्रयोगच असतो .
आणि ह्या सर्व प्रयोगांत मी बराच वेळा बहुतान्व्शी अपूर्णच राहतो .
आणि इतके समजत गेले कि ,
अपूर्ण ता  हे काही पूर्ण होण्यासाठी लागणारा एक विस्तार नाही .
पूर्णता हि एका प्रक्रियेचा 
अपूर्ण राहण्या  इतकाच समज ,
 साध्य असते.
  ३०/१२/२०१५  

 

No comments:

Post a Comment