18/9/2016 |
माणूस आणि निसर्ग आणि त्याच्याशी निगडित विचारप्रकीयेने माझ्यात सतत एक कलात्मक जाणीव आणि त्यासंबधातून जाणवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे किंबहुना जास्त प्रश्नच आणि त्यांची स्वतः द्वारे उत्तरे मिळवण्यास सतत एक दिशा उघडी करून दिली आहे . मग ती त्या संबधी असलेल्या माझ्या वाचनातून , संवादातून, पाहण्या तसेच अनुभवण्यामधून असेल . ह्याच प्रक्रियेमध्ये धामणस्करांची मला भावलेली विचारप्रक्रिया आणि ती कवितेद्वारे व्यक्त होण्याची लय ह्यांची ओळख माझ्या जाणिवांच्या सतत जवळ असलेली जाणीव जेव्हा मी अर्कासोबत माझी चित्रे काढण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याचे माझ्या मनात असणारे त्यांचे अस्तित्व त्यांचे स्वतःचे असे एक स्थान पक्के करून विसावल्याची अनुभितीचं :) झाल्याचे जाणवले . तेव्हापासूनच त्यांना भेटून त्यांना स्वतःची चित्रे दाखवण्याबद्दल मनात प्रवास सुरु झाला .
खरंतर कुठलीही व्यक्ती एक कलाकार म्हणून आवडीची झाल्यास त्याच्या अति खाजगी आयुष्यातील तपशिलांपेक्षा त्याची त्याच्या कामामधील विचारप्रक्रिया आवडल्याची ती जाणीव असते , आणि स्वतंत्रपणे एखादे काम आवडणे हे त्या कामाशी आपले अनुभवांमधून निर्माण झालेले त्याचे एक स्वतंत्र असे स्थान म्हणून आपल्याशी एक खास अशी ओळख असते .
धामणस्करांची मला हि प्रक्रिया भावली .
त्यानुसार वर्षा दिड वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि त्यातच त्यांना झालेल्या हल्लीच्या अपघातानंतर एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि त्या अस्वस्तथेपेक्षाही त्यांना भेटण्याच्या ओढुत्सुक्ततेने एक दिवस ठरवून चैतन्यला फोन करून भेटण्याबद्दल कळवलं .
सुरु असलेल्या पावसाव्यतिरिक्त बाकी सर्व स्थिर होते . पण चित्रांची सुरक्षा हि माझ्याकरिता सर्वात महत्वाची अशी बाब होती , तरी सकाळी पाच पर्यंत मनात सुरु असलेल्या द्वंदासोबत पोर्टफोलिओ आणि ठरवलेल्या प्रमाणे त्यांना मला माझ्या विचारप्रक्रियेतून पूर्ण झालेलं एखादे चित्र फ्रेम न करता आणि त्यांच्यासोबत चा एक फोटो :) मला महत्वाचे होते . सकाळी सुद्धा तो सुरूच होता पण मी संयमाने एका छोट्या प्रकाशाची वाट बघत होतो आणि त्याचा हा फसवा मूड माहित असूनही तो मिळताच दुपारी निघालो कदाचित अशा व्यक्तीला असे भेटणेच माझ्यातील त्यासंबंधी उत्सुकता वाढवत गेलं :)
त्यांना भेटल्यावर काय बोलायचे ? कसे बोलायचे ? ह्या गोष्टी माझ्याकरता फारसे महत्वाचे असे नव्हते किंबहुना माझी हि चित्र माझ्यावर हे दडपण येऊ देत नाहीत आणि मला सहज भेटीचा अनुभव जास्त महत्वाचा होता त्यामुळे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामध्ये आणि त्यांना त्याबद्दल कुठलाही पूर्वकल्पना न देता होणारी हि भेट म्हणजे माझ्यासाठी माझीच जबाबदारी होती .
मी शून्य होऊन बसमध्ये बसलो खरा चित्रांनीही माझ्यासोबत केलेला हा स्वतंत्र प्रवास होता कारण अशी हि पहिलिचं वेळ होती जेव्हा माझ्याकडून त्यांचे वेगळे लगेज घेण्यात आले .
पूर्ण शून्य होऊन प्रवासाला सुरवात झाली खरी पण मनात त्यांच्या भेटीअगोदर त्यांचा माझ्या मनामधील शोध किंबहुना त्याची मुळे शोधण्याची जाणीव लिहून शोधावी असे वाटले . आणि लिहू लागलो .
चांगले - वाईट असे वर्गीकरण करण्यापेक्षा काही अनुभव असे असतात जे स्वतःला जसे फांदीवर बसलेला पक्षी आकाशात झेप घेण्यासाठी जेव्हा सरसावतो त्यावेळेस फांदीची वर खाली होणारी कंपने हि आपल्यात कुठेतरी एक महत्वाकांक्षा , विचार स्वप्ने निर्माण करतात तर काही अनुभव हे त्याच क्षणी त्या उभ्या असलेल्या झाडाची मुळे खोलवर जात आपल्यामध्ये आपल्याच विचारगर्भाकडे जाणाऱ्या नासाचा शोध घेण्यास उद्युक्त करत असतात .
खरंतर या दोन्ही एकमेकास पूरक असलेल्या क्रियांचा परिणाम माणसाच्या त्याच्या जडणघडणीतील एक महत्वाचा असा प्रवास समजून देऊन त्याचे व्यक्तिमत्व अधोरेखित करत असतात परंतु ह्या दोन्ही जाणिवांपैकी कुठलीतरी एक जाणीव हि अनुभव घेण्याची एक जाणीव मनात निर्माण करून आपले स्थान पक्के करत असते .
मला माझ्या ह्या दोन्ही जाणिवांमध्ये दुसऱ्या जाणीवेने प्रवास करण्यास स्वतःच्या अनुभवानी आणि सोबत निसर्गाने मनात निर्माण केलेल्या ओढीने प्रवृत्त केले असले तरी त्याच जाणिवेने पहिल्या जाणिवेची जबाबदारी आणि त्याद्वारे पूर्णत्वास पोहचण्यास लागणाऱ्या क्षमतेची ओळख करून दिली आणि देत आहे .
शून्य होऊन "धामणस्करांकडे जाताना" अशा रीतीने वहीत केले ली ह्याची शेवट
हि एका अनामिक आणि विस्मयचकीत करणाऱ्या त्यांच्याच तोंडून ऐकलेल्या मी निघता निघत च्या आवडत्या निसर्गकवी बद्दल विचारले असता विचारलेल्या त्यांनी करून दाखवलेले नलेश पाटील ह्यांच्या अविर्भावात नलेश पाटीलां यां च्याच काही ओळी म्हणून दाखवल्या त्याचबरोबर बोरकर, यशवंत पाटील , किरण येळी , सुरेश भट अशांसारख्या कवींच्या कवितेच्या काही ओळी म्हणवून दाखवताना ते माझेही आजोबाच वाटू लागले आणि निघत निघता नवीन प्रकाशित होणा रा त्यांचा कविता संग्रह घ्यायला मी स्वतः पुन्हा येण्याचे निम्मित मागून त्यांनी तुकारामाच्या शब्दाचे सामर्थ्य हे मला मीच लिहिलेल्या बसमधील संपूर्ण लिखाणाच्या सारामध्ये जाणवून दिले आणि भिजून आलो :)
"सिंचन करीता मुळ |
वृक्ष ओलांवे सकळ।।
त्यांना दिलेले दिवस/ रात्र (DAY/ NIGHT) हे माझे चित्र मी गेरूने रंगव ले ल्या माउंटिंग मध्ये |