display: inline-block;

Oct 17, 2015

"इतकि (की )वर्ष जे चालले होते ते भरून काढायला /यायला वेळ तर लागणारच " . . . . . . . . . . . . 17/10/2015

"इतकि (की ) वर्ष जे चालले होते ते भरून काढायला /यायला वेळ तर लागणारच " . . . . . . . . . . . . 
ह्या मानसिक स्थितीवर  संवांद / विवाद येवून थांबतो . . मला हि मानसिकता गोत्यात आणते आणि कीवही येते जराशी आम्हा दोघांची  . कारण ह्या प्रश्नाला तसं ठोस उत्तर कोणाकडेही मिळणार नाही . ज्यांचे राज्य आहे त्यांच्याकडेही . 
पण, मला हे उत्तर कधीच सुचणार नाही कोणाला द्यायला कारण माझा आंधळेपणाने स्वतःवरही विश्वास  नाही  आणि आजच्या युगात सर्वांनाच संधी मिळते ,  even  गुन्हेगार हि उत्सवात सुट्टी घेवून बाहेर येवू शकतो मर्यादेपर्यंत ,
 माणसाच्या मनाचा थेट संवाद हा विचारांशी होतो आणि कृतीचा परिस्थितीसोबत . इतक मला उमगलं आहे आणि तेच किंबहुना माझ्या कामाचेही एक म्हत्वाचे सुत्र आहे . आपला कितीही तंतोतंत वाटणारा / जाणवणारा  विचार हा खऱ्या परिस्तिथीपासून वेगळा'च' असतो .
 विश्वास ,
 अपेक्षा ,
  स्वप्न , 
आले कि डोळे डुलकी घेतात मध्ये मध्ये आणि त्यातच बरच रक्त वाहून जाते पुलाखालून  कळतही नाही  
 इतकि वर्ष जे चालले होते ते भरून काढयला वेळ तर लागणारच ह्या मानसिकतेमध्ये . एक पप्रकारचा anesthetic विचार वाटतो आहे हा मला . खूप  tension  जाणवते . आणि सहानभूती सुद्धा ,
पुन्हा नव्याने संयम  जागृत करू पाहणाऱ्या सर्व  मानसिकतेचे . 
workflow  मध्ये स्वतःचे विशिष्ट अस्तित्व "मुद्दामून" निर्माण करण्याचा अट्टाहास हे आजच्या जगाचे सूत्र सर्वत्रच lead  करत आहे (अगदी नकळत माझ्यातही) , त्यात काही तसे इतके वावगे नाही पण , त्यासोबत येणारा इतरांचे अस्तित्व नाकारण ह्या  माज वृतीला  अंत नाही    अंधानुकरण म्हणतो आणि मी  वेगळा होतो , पण ह्या संघर्षात ह्या माज  वृतीला माझ्यात न येण्यासाठी मी परिस्थितीचा आधार घेतो ,
 स्वतःमधील बदल समजण्यासाठी .
 डार्विन ने म्हटल्याप्रमाणे  (पण त्याच  आधारावर नाही)  कारण असे बरेच details  असतात,
 जे स्वतःच्या मना ला असणाऱ्या परिस्थिथित हि  कृतीसोबत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात 
अपूर्ण बरच राहते ह्यात . 
पूर्ण अस काय असते?


पूर्ण हा वेळ , काळ 'असतो .
जो निघून गेलेला असतो
क्षणोक्षणी
तो
एक
 अनंत प्रवाही .
सापेक्ष/निरपेक्ष
बिंदू
जाणीव ,



17/10\2015



No comments:

Post a Comment