display: inline-block;

Apr 21, 2017

काही गोष्टीना निरंतर वेळ द्यावा आणि काहींसाठी उडी घ्यावी .


 काही गोष्टीना निरंतर वेळ द्यावा आणि काहींसाठी उडी घ्यावी . 
माणूस म्हणून घडण्यासाठी  हे पर्याय असतात 
असेच पर्याय असतात . आणि  हेच आपण करत असतो .
सहज मिळणे हा ह्या कुठेतरी दोंघांचा अर्क 
 परंतु  .........कारणामुळे ,
बरेच उपप्रकार परिस्तिथी नुसार पडत असतात . 
हेही खरे . 
कारणांमागेच कधी  कधी  तो व्यक्ति पूर्ण असतो . 
 प्रत्येक मरण हा कुठेतरी खून असतो. 
 कि कुठेतरी डार्विन कमी पडतोय परिस्तिथिनुसार ?
 शेवटचं उत्तर हे काही हे आपल्या आवाक्यात  कधीही नसतेच . 
पण ,
जगणं हृदय राहावं 
मेंदू बरेच पुनर्जन्म घेत असतो
घेऊ द्यावं . 
असा अभिव्यक्त करत असल्याचा हट्ट नाही का करावं . 
जे आहे ते देण्याचा प्रयत्न करावा अथवा अभ्यास म्हणावा 
काय हरकत .








कलेची अभिव्यक्ती

कलेची अभिव्यक्ती  .........
                              दैनंदिन "जगणं "
ह्यातील तफावत त्यातील अंतर एक कलाकार म्हणून सतत जाणिवेत असते . आणि त्याहीपेक्षा त्यामधील अंतर कसे कमी होईल , ते प्रयत्नाने कसे कमी करता येईल ह्याच्याशी सतत  विचार, प्रयत्न सुरू असतो ,स्वतःमधील संवेदनशीलता , संयम, जोपासण्याच्या प्रयत्नात  सर्वांगीण क्षमतेची सतत एक  प्रयत्न सुरू असतो  निर्मिती करण्यास   वेळेची   लय , सातत्य आणि तोल ह्यांमधील तफावत सांभाळणे .हे एक आपसूकच ध्येय बनून जाते. आणि ते अभिव्यक्ती ही  एक संगीता मधील  बारकावे दर्शवणाऱ्या एक्विलायझर  प्रमाणे  आपल्या संपूर्ण सवेंदनशीलतेचे एक आलेख म्हणून  दृष्यात  परिवर्तित  होत असते .  

Apr 19, 2017

" पाणी हे सहज ~

"  पाणी  हे  सहज ~  आ ~ र~ सा . "



 ˙

देव देहावा . दै ह वि स र्जा वा ...................... !

देव 
    देहावा .  
दै  
ह 
     वि
    र्जा
             वा 


Apr 15, 2017

in search of "उद्द्विग्न ता "

in search of  "उद्द्विग्न ता  "
i am contagious by many experiences......... 
but, when i think about this particular Marathi  :* word .
the word gives me the sub -conscious sense of
 <<<<<<<<vibrations>>>>>>
keeps me aware  not to misunderstand with its dictionary meanings .
it derives
me into  the center of all  emotions 
movements keep beside.
भिंगरी सारखे  भिरभिर फिरत असतात . 
मग, जाणिवेत येते कि ,
उद्द्विग्नतेला reaction  नाही तर ,
गहनता आहे . 
ज्याचा विचार दृष्यपरिणामात  होणे किंवा मिळणे वा  करणे 
अनुचित. 
म्हणून चित्रापेक्षा  शब्द निवडणे हे माझी मर्यादा 
पण ,
त्याचे dictonaryt  असणारे  अर्थ जसे ,
चीड,उदास ,बैचेन  हे जितके reactive , हायपर reactive  emotions आहेत . 
आणि जर समजलं तर तिथेही उद्द्विग्नता हा भाव आहे , जो सहज विलग करता येणे शक्य नाही 
किंबहुना ( हा शब्द मला आवडतो  :*)  
अनुचितच . 
म्हणूनच कदाचित त्यातील क्षणभंगुरता मला जाणवली. कारण त्याच्या  सोबतच reation शी संलग्न असलेले भाव हे express झालेले/ होत असतात . 
म्हणून मग वरील reactions हे  उद्विग्नतेचे विविध अंग असे जर मी समजले 
उद्द्विग्नता हे मर्म . 
भावभावनेशी निगडित  गुंता जो वर्गवारी न करता येण्याजोगा 
किंबहुना ,
अनुचितच असल्याचे जेव्हा जाणिवेत येते तेव्हा त्या मर्माचा विविधांगाने विचार करणे. 
हि माझी मर्यादा . 
पण, ते मर्म 
हे काही शोधाचा परिणाम नाही तर ते 
असतेच .
 शाश्वत?
अनुभव+ भाव 
=
 अनुभाव हि जाणीव 
आपले/ माझे  आणि त्या वेळेचे  
क्षणभंगुर
 मि

    न. 
 शब्दां मधील  थोडं virtual  अंतर  वाढवून  
  ती
  तो
 अनुभाव  
ताणत राहणं 
हा माझा 
अहंभाव 
:)


Apr 13, 2017

"भारतीय संस्कृती " ह्या जाणिवेमागे खपल्या चढवून वागणारे फेसबुक लाईक.......

 "भारतीय संस्कृती " ह्या जाणिवेमागे खपल्या चढवून वागणारे  फेसबुक लाईक  मध्ये अडकून  आणि गुंतवून ठेवलेले , बसलेले  अडथळे इतके खोलवर समाजात पसरले आहेत .
कि  साधे ऍप्रिसिएशन म्हणूनही 

गानसरस्वती  किशोरी आमोणकर  

ह्यांच्या  

"हयातीत "
"हि आपली  भारतीय संस्कृती" 
  ^^^^^^^^^ 
ह्या तीव्रतेने
 त्यांच्या गायनाची एकही क्लिप माझ्या रनिंग वॉल वर  नाही .  
थोडी निसटती  आठवण ओळख - कधीतरी मयुरेश नामक मित्राकडून झाली असावी पण ,इतकी कि  खरंतर तिला अंतर आहे जाणीव म्हणून शब्दात रूपांतर करण्यास पण ,
असो .. पण त्याच्या आवाजात त्याला सुरांचा गंध असल्याचे आपण ऐकू  शकतो.
 त्याही अगोदर  थोटकी माहिती वर्तमानपत्र  , नेट  अशा माध्यमांमधून झाली असल्याची जाणीव आहे .. कदाचित तो क्षण टिपायला मीच  कमी पडलो असेनही .........
 पं . कुमार गंधर्व , पं .  भीमसेन  जोशी  काहीप्रमाणात ऐकले , माहितीपटातून पाहिलेही . पण , जेव्हा मला कुठेतरी समजले कि त्या संपूर्ण गायनाची प्रक्रिया हि कुठेतरी त्या दिग्गजांच्याहि स्वतःच्या शोधाची एक समांतररित्या रित्या एक सुरु असलेली प्रक्रीया असते . तेव्हा, त्यामधील त्यांनी गाठलेल्या दिव्यत्वाची जाणीव जाणवूनही माझा ^ त्यांच्यामधील रुचि थोडी कमी झाली . 
कारण ,माझा स्वतःचा व्यावहारिक गुंतागुंत आणि स्वतःचा चित्रप्रवास, प्रक्रिया  ह्यामधील स्वत्व शोधणे आणि त्यामधील झगडा 
^ हा वर्तमानाशी होता आणि आहे .
असेलही . 
असच ,आणखी एक म्हणजे श्री . विजय तेंडुलकर  हे मराठीमधील  मानांकित लेखक . त्यांची काही पुस्तके, नाटकं  ^ वाचण्यापाह्ण्यात हि आली पण , 
त्यांचे " कन्यादान " नाटक पाहिले 
खूप खूप  आवडले  ....... 
 श्री तेंडुलकर हे एक व्यक्ती म्हणून त्यांचे लेखनामागील स्वत्व जेव्हा मला जाणवले किंबहुना त्यांच्या कदाचित पाहिलेल्या मुलाखतीमधून  जाणण्यासही मिळाले.  
^ तेव्हा
 त्यांना न भेटता आल्याची हळहळ  सतत मनात असते . 
  असेलही . 
 ते स्वत्व माझ्या बौद्धिक कौशल्या चा परीघ विस्तारत 
 जाणिवेत आहे . 

" त्यांचे  सामान्य माणूस आणि त्याच्या दैनंदिन  आयुश्यानुभवातून नैसर्गिकपणे भिनणारी संघर्षवृत्ती ह्याबद्दल असणारी आणि ती समजून घेऊन त्याबद्दल येणारी आत्मीयता आणि  आदरयुक्त जाणीव  "
 हि त्यांच्या ग्रीक  राजासदृश्य  गोऱ्या  चेहऱ्यावरील भारदस्त  दरारा 
पण ,  
त्यास तोंड न देता त्यांच्या  त्यांना वाटणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल  असणाऱ्या जाणिवेस 
माझ्या मनात रुजवत 
^ वर 
  न भेटता येण्याची खंत सतत
^ वर  राहते . 

सद्य परिस्थितीत . 
भारतीय / पाश्चात्य असा वरवर फरक करू पाहणारे तोंडघाशी पडतील . 
जेव्हा त्या भेदाच्या असलेल्या मुळ शोधण्याची गरज पडेल .  
मला हा  भेद आवडत नाही . 
भेदाने वरचढ चढू पाहणारी  संस्कृती 
आपली संस्कृती  
एकाधिकारी  आहे का? 
कि सर्वाना सामावून  विनम्रतेने व्यापून समृद्ध करणारी आहे?
ह्यात वाद/ प्रतिवाद 
प्रतिवाद 
मला  काही त्यात रुची नाही 


किंबहुना माझा तो मार्ग नाही. 
 माझा प्रेरणास्थान 
"निसर्ग "
आणि 
ह्या तत्त्वावरच 
भारतीय संस्कृतीची मुळे खणून काढण्यापेक्षा पाश्चात्यांनी येऊन रोवलेले हे virtual  रोप  त्याची मुळे खोलवर आधीच गेलेली असताना ते तोडण्यापेक्षा त्यातूनच हे आव्हान आता माझ्यासोबत आहे . 
ह्याचा कोण आनंद  :)


गानसरस्वती किशोरी आमोणकर 


ह्यांच्या गायकीतला भाव 
हाच 
"भारतीय संस्कृती" 
कारण ,
आता माझ्या आईची सोबत . 

शेवटी  राहून  जे टिकेल 

ह्या मानसिकतेपेक्षा .. 
 जे वटवृक्षासारखं वाढतं राहिलं 
ज्याच्या छायेखाली आपण वाढत आहोत . 
त्याचे एक पान साधं शेअर करता येत नाहि आलंय मला 
अभिमानाने ? 
ह्याची खंत मला जशी इतरांबाबतीत होते तशी आपल्याबाबतीत आता न होत असल्याची 
थोडी खंत .. 



    लॉरी बेकर , टागोर , क्ली , फ्रिदा , andy goldsworthy , jane goodall , अजिंठा / एलोरा , भारतीय लघुचित्र आणि ते  कलाकार , सत्यजित रे   , मूळ वारली ,
इ..  असे बरंच   आवडतात मला 

का?  

 आणि,नवीन आलेला प्रत्येक movie सुद्धा  पाहायचा असतो मला . 
 अर्ध्यावर सोडून जावा लागला तरीही .. 
तार्कोव्हस्की , बर्गमन , चॅप्लिन , स्पीलबर्ग  
सर्व सर्व आवडतात . 
कारण, माझ्या जाणिवेत ह्यांनी त्यांच्या संस्कृतीशी नाळ जोडणारी आणि त्यातील बारकावे  दाखवत राहून  केलेली कामे हि त्या सर्वात राहूनच केली असतात ,  
त्याच्या  लेव्हल्स वेगळ्या असतीलही पण,
 त्यात कुठल्याही संस्कृतीला कमी लेखून ते काम नसते . 
कारण , त्यांत एक साम्य नक्कीच आहे. 

" भाव "


 गानसरस्वती  किशोरी आमोणकर 

ह्यां
कुठेतरी एक ग्लोबल परिणाम दाखवून देण्याचे सामर्थ्य 

आता मला गानसरस्वती  किशोरी आमोणकर ह्यांच्याबद्दल मुखत्वे इतकी तीव्रता का जाणवली ?
कारण,  माझ्या चित्रकलेतील भावविश्वाशी 
गानसरस्वती  किशोरी आमोणकरांचा . 
विचारध्यास    
ह्याशी 
भावबंध जुळण्याचे 
vibrations .
हा भारतीय संस्कृती चा 
गाभा

ह्याबाबतीत 
  (पॉली ) च्या  चित्रांसंबंधीत माझ्या जाणिवेत महत्वाची बाब आणि त्याबद्दलची ओढ 
ह्याचा एक  तीव्र धागा  म्हणजे ,
 che...............
 चित्र हे  त्याने निश्चित केलेल्या पृष्ठभागावर स्वतःचे अबाधित्व स्वतः प्रवास करीत असते . आणि त्या प्रक्रियेतील  
त्याचा नम्रपणा , त्याची ऋजुता स्पष्ट करीत घडवणारा/ घडणारा 
 ठामपणा . 

  सुरांमागील भाव , सुरांचा  भाव ,   भावार्थ  
जे शब्दांमधील  किंवा शब्दसही व्यापून उरतील अशा गाभ्यापर्यंत जाणारा आणि 
प्रेक्षकांस त्या व्याप्ती चा अनुभव करून देण्याचा  आत्मविश्वास . 
त्याची विविध आवर्तने , पोत ह्यांद्वारे उमलणारा भावार्थ . 
जो तितकाच विनम्र 
पण ,
ठाम 

पुन्हा  

गानसरस्वती किशोरी आमोणकर 

हा इशाराही द्यायला विसरत नाहीत

जो मला स्पर्श करून गेला 
किंबहुना ह्यास सहज सिद्ध हि करता येऊ शकेल गरज पडल्यास 
तो म्हणजे पाश्चात्य लोकांच्या चिवटपणाबद्दल 
जर का त्यांना ह्या स्वरभाषेतला हा गाभा समजला तर तो मिळवल्याशिवाय 
( जो कोणाची खरतर मालकी नाही) 
ते राहणार नाहीत . ( हे  आव्हानच माझ्याकरिता आता खरतर नाहीच )
हे असे  . . . . . . . . . .  
उद्या  माझ्या ताईचा  वाढदिवस  खरतर बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती असल्यामुळे 
 (त्यांना मनापासून वंदन )
हा एकमेव  वाढदिवस माझ्या  लक्षात असतो  . 
अजरामरच आहे माझी ताई 
असो ......... :) 
 (वाचल्यास काही चूक असेल तर क्षमस्व )
   


Apr 10, 2017

आजचा वर्तमानपत्र पहिला आणि

आजचा वर्तमानपत्र पहिला  आणि
एक सहज विचार आला . 
काल काही
इतर


लं

ना
    ही ? 

निसर्ग

निसर्ग हा परिपूर्णतेचा आपल्या मनातील अस्थिरतेस  हव्यासेस स्थैर्यता प्राप्त करुवून देणारा परिमाण .