My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
Mar 28, 2013
Mar 20, 2013
Mar 16, 2013
चिड
काय झाल का बलात्काराच मनोरंजन करून?
झाली ती खपली उघडून ?
नावांशी खेळत बसतात साले ,
टीवी आणि वेफर
रस्ता आणि रमणीय स्थळे
आकर्षित करणारे सोन्याचे भाव
आणि सकाळचा विनोद ठरणारे
कुपोषित मृत्यू,
फासावर चढलेला शेतकरी
आणि दौर्यावर आलेला अधिकारी
सारखाच ह्यांना
वाटत ज्यांनी गुलामी बघितली
त्यांच्यातच स्वाभिमान असेल शिल्लक
थडग्यात
आता संवेदनाच संपल्या पाहिजेत
शापित चवीच्या .
रणांगण पुन्हा झाल पाहिजे .
ह्यांच्याशीच
१६ मार्च २०१३
ती सोडून गेली तेव्हा .
नाही पाऊस पडत होता.
नाही काही संपायला आलेलं ,
आतून प्रचंड रागावलेलो त्या तुटल्या क्षणाला मानायला
श्वास तिचे संपलेले .
उद्ध्वस्त मी.
तिला मी अजूनही सोडू नाही शकलो .
आणि तिला वाटलं तिने स्वतःला मुक्त केल.
Mar 13, 2013
Mar 12, 2013
१२ मार्च २०१३
तिने त्याला थोडस रागावूनच विचारलं
तू इतका तीरसट पणे का वागतोस माझ्याशी ?
भेटल्यापासून नावही नाही घेतलस माझं तू .
का असं ?
त्याने तिच्याकडे पाहिलं
आणि क्षणाने तिला विचारलं
तू ह्या वाळवंटात अत्तर लावून आली आहेसं ?
तिला पुन्हा थोड अवघडल्यासारखं झालं
तिच्या प्रश्नार्थक नजरेकडे त्याने लक्ष न देता आपल बोलण चालू ठेवलं .
लहानपणापासून मला इतकच समजल आहे कि
माझ्यामध्ये दडलेल्या मी ने मला बरीच नाव दिली .
आणि त्या सर्व नावांनी मला स्वतःची एक ओळख दिली .
ती मला माझ्या आईवडिलांनी दिलेल्या नावापेक्षा नेहमीच उपयोगी पडत गेली .
मी आरशात उभ राहून बराच वेळ माझ्या दिलेल्या नावांशी खेळत बसायचो आणि स्वतःला पाहायचो हि तसं,
पण आई वडिलांनी दिलेले नावाची मला कधीच मदत नाही व्हायची.
फ़क़्त वर्तमानपत्रात भविष्य बघण्याखेरीज .
आणि जेव्हा मी ह्या डॉक्टरी पेशात येवून समाजसेवेत दाखल झालो .
तेव्हा माझ्या हातून बरा होणारा प्रत्येक जण मला जो शुभेच्छा द्यायचा .
त्याच त्याचं एक नाव देवून जायचा, त्यावेळेस मिळणार समाधान अनुभवण्यासाठी माझ्याकडे काही शिल्लकच नसायचं
कारण त्यांनी जे सोसल ते सोसण्याच धैर्य असण हेच मुळी आपल्या कल्पनातीत गोष्ट आहे .
ती त्याच्याकडे पाह्त असते तिचे डोळे थोडेसे ओले पाहून तो हि मूळ मुद्यावर येतो.
आणि तिला सांगतो .
ह्या माझ्या कामा दरम्यान माझे बरेच मित्र झालेत अगदी जवळचे असे वाटणारे ,
पण आता ते सर्व गेले आणि माझ्याकडे फ़क़्त त्यांची नावेच राहिली आहेत.आणि ती नावे मला सतत आठवणीत ठेवावी लागतात.
तुलाही माहित आहे कि तू उद्या जाणार .आणि मला माझ काम तर पुढे नेल्याशिवाय दुसरा कुठला हि रस्ता दिसत नाही .
ते मला नेलेच पाहिजे .

Mar 11, 2013
Mar 10, 2013
रविवार १०मार्च २०१३
आशीर्वादांशी आता वाद होतात मनात
हे असतात तरी कोठे ?
पाठीवर,डोक्यावर कि कंपनांत.
हे असतात तरी कोठे ?
पाठीवर,डोक्यावर कि कंपनांत.
आशीर्वादांशी हा शीर वाद
सुरु राहतो .
मनात .
एकाकी अवेळी .
...................
सुरु राहतो .
मनात .
एकाकी अवेळी .
...................
ग्रहणात संपले दिव्यातले तेल
आणि पाहत बसलो
अंधाराच्या कडे वरील प्रकाश .
शोधत राहिलो मी
वेदांतील विश्वास माझ्यात
.............................
वेद न जाणता ही
पक्षी मात्र ,
उडत होते.
आत्मविश्वासाने .........
आशीर्वादांशिवाय
इतकं साधं .
................................
पक्षी मात्र होऊन जातो .
वेदांशिवायही
आणि माणूस मात्र आशीर्वाद
घेवूनही माणूस होण्यासाठी
झगडत असलेला
.... अभिजित २०१३
आणि माणूस मात्र आशीर्वाद
घेवूनही माणूस होण्यासाठी
झगडत असलेला
.... अभिजित २०१३
Mar 5, 2013
कन्फेशन (अपराध स्वीकृति )
ते येतात ...................... ते जातात
मध्ये बसतात काहीतरी विचार करत ,
शांत असतो मी त्यावेळी ,
वाटलं तर चहा विचारतो ,
पाणी मात्र नेहमी पितात .
स्वतः हून
मध्ये बसतात काहीतरी विचार करत ,
शांत असतो मी त्यावेळी ,
वाटलं तर चहा विचारतो ,
पाणी मात्र नेहमी पितात .
स्वतः हून
...............
...............
...............
...............
...............
त्यांना कळत असेल
मी जिवंत आहे
मला कळत ते
इतकच.
आता कधी कधी माझ्याही तोंडून येतेच .
आयुष्याबद्दल खंत करत बसलेल्यांना
जिवंत आहेस ना म्म बस
...............
...............
...............
...............
त्यांना कळत असेल
मी जिवंत आहे
मला कळत ते
इतकच.
आता कधी कधी माझ्याही तोंडून येतेच .
आयुष्याबद्दल खंत करत बसलेल्यांना
जिवंत आहेस ना म्म बस
------------ ५ मार्च २०१३
Mar 4, 2013
४ मार्च २०१३ (३)
अचानक भाषांतर होऊ लागलं
आणि भावनांशी गुंता वाढत चालला ,
शब्दाचे अवघडलेपण ,त्यांच्या मर्यादा वाढू लागल्या
वाटलं अशीच एक ओळ रिकामी सोडली तर ,
समजतील का लोक ?
मला काय म्हणायचं आहे ते .
बसतील का त्या रिकाम्या ओळीच्या वेळी
दिलासेचा हात खांद्यावर ठेवून मित्रासारखा
कोणी आलिंगन देईल का प्रियकर समजून
उभे राहतील का शांत शेजाऱ्या सारखे
आपल्या घरातीलच माणूस गेल्यासारखे
चालेल एखाद्या शिकारी सारखे सुद्धा
आपला सावज टिपायला बसलेले .
..................................................... अभिजित ४ मार्च २०१३

४ मार्च २०१३ (२)
वाटलं फिरायला जाऊ या रस्त्यावर जरा मोकळं वाटेल,
तर दिसला
उड्डाणपुला वरील होर्डिंग्ज च्या मागे एक अस्ताव्यस्त झालेला माणूस
काही वेश्या आणि त्यांच्या आजूबाजूला घुटमळणारी गिऱ्हाईक
संध्याकाळचा अख्खा लोंढा होताच घराकडे परतणारा ,
चूकच केली बाहेर जाऊन ,
खरतर खरतर स्वतःमध्येच जायला पाहिजे होत.
कुठेतरी शांत बसून ,
आपल्यासारखीच माणसच शोधत बसतो आपण ,
रस्त्यांवर
मागे एकदा
चाप्लीन पाहून हस हस हसलो ,
आणि एकदा वाचलं त्याच आत्मचरित्र
तर बघितलं त्याच दुःख सापडत का ते चित्रपटात
छे हरलो साफ ,
अशी का माणसं नाहीत हि रस्त्यावरची होत माझ्यासाठी
...............................................................
माझं हसू हि मीच शोधाव आणि लोकांचं हि .
माझं दुःख फ़क़्त मलाच दिसावं आणि लोकांचं हि
४ मार्च २०१३
खूप अस्ताव्यस्तपणा आहे ...
माणसाच्या मनाला काही अर्थ आहे का?
माहिती असूनही प्रवास मरणाकडे जात असताना
माणसाची ओढ प्रत्येक क्षण
जगण्याकडे आकर्षित झालेला दिसते .
माणसे माणसांशी वागतात ,बोलतात,
त्यांचे संपर्क कधी वाढतात तर कधी ते स्थिर राहतात आहेत तिथे .
कधी असून नसल्यागत ..
जाणिवांच्या संपर्कात एक नात तयार होऊ पाहत
कसंही लांबच ,दूरच, वाढउ असंहि वाटणारं किंवा आहे त्या ठिकाणीच स्थिर रहाव अस वाटणार,
ताणली ही जातात काही त्यात अवास्तव पण
ते तडे ही एका कच्च्या रस्त्यांसारखे आपल्या वाटेचे असतात .
ज्यावरून आपण इथपर्यंत आलो असतो .
फ़क़्त त्यावरून आता पुन्हा चालायचं नसत इतकच .
तरीही एका आर्त हाकेसाठी मनाचा एक कोपरा उघडा असतोच
आणि त्या कोपऱ्यात अस वाटत आपले संपूर्ण अस्तित्व आहे.
हे दिवसाचे चोवीस तास ,प्रहर सर्व आडव येत ,
असं वाटत अक्ख आयुष्य सलग का नसत?
हे दिवस ,रात्र मनावर होणाऱ्या परिणामांना नाचवत असतात .
का?
ते प्रभुत्व करत असतात आपल्यावर .
माहित नाही कधी पिऊन टाकलं विष ,
का माहित नव्हत तिला आयुष्य फ़क़्त मेल्यावरच संपत नसत ,
का माहित नव्हत तिला ते शरीरा बाहेरही भिनत जात
आपल्याच्या आयुष्यातही
का माहित नव्हत तिला सुगंध जरी असला तरी
सुगंधाही कोणाची गरज असू शकते .
कि तिला सुटकाच करायची होती स्वतःची ,
कि तिच्या नजरेला ती तडा हि दरीत रुपांतर झाली .
कि वाटत होत तिला ती दरी ओलांडूनही
ती सामना नाही करू शकणार नजरेचा .
का माहित नव्हत तिला ती नजरेआड झाल्यावर ,
तिथे तिला शोधत ताट कळणारा तिथून
नंतर कधीच ,
मागे फिरू शकणार नाही ती खंत घेऊन .
............................................................
अभिजित ४ मार्च २०१३

Mar 2, 2013
Mar 1, 2013
१ मार्च २०१३
बऱ्याच दिवसांनी कि वर्षांनी काहीच आठवत नाही शेवटच वाचन कधी केलं कदाचित परवाच केलही असेल .पण आठवणीत नाही ,
काय फरक पडतो त्यांनी ?
स्वतःच आणि इतरांचं अस्तित्व मान्य करण्यासाठी . आपल्या स्वतःला पूर्ण कल्पना असते आपल्यात असणाऱ्या कमकुवतपणा ची आणि आपण पूर्णपणे एक पाऊल अंधारात असतो आपल्या सामर्थ्यपणापासून .तो नेहमी चकित करणारा असतो .अशी कुठली गोष्ट अनुभवास आली कि आपल्यात पुढची जाणीव निर्माण होते.आणि अशी गोष्टच वारंवार होत नसल्याने त्याचं आकर्षण आपल्यात निर्माण होत असत आणि त्यामुळे आपण समृद्ध होता होता आपण अधोगत हि होत असतो , फक्त तो आपल्या इगोमध्ये परावर्तीत होत असतो.
थोडं हलवणार ,हेलावणार आणि वर सांगितलं न तस आपल्यातल अपराधत्व आपल्या समोर ठेवणार . मनाच्या लैंगिक पणाला निरोध लावण्याचं काम हे प्रभावी लेखनच करू शकत (ह्यामध्ये कुठेही इतर गोष्टीचं सामर्थ्य कमी करण्याच कुठलही कारण नाही फक्त इथे तो लिहिला नाही कारण लेखन ह्या विषयावर इथे लिहायचं आहे इतकंच म्हणूनच )
आजूबाजूच्या वास्तव घटना आणि त्यासोबत त्याच्याशी मिळतेजुळते संदर्भ असणार्या भूतकाळातील परिस्थितीच एखाद पुस्तक वाचताना ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत जातात . फरक कुठे करता येत नाही आणि
प्राणी हा मानवाचा जिव्हाळ्याचा विषय असतो . प्राण्यात माणुसकी सापडली नाही तरी त्यावर माणसाने जनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही ......
त्यामुळे एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून विचार करण्यापेक्षा माणूस म्हणून विचार करण्याने त्या दोन्ही नात्यात जितका मानवीपणा कसा येऊ शकतो ह्याचाच विचार होतोय .........
पुरुष स्त्री ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी आणि एकमेकांव्यतिरिक्त काहीतरी संबंध असेल किंबहुना आहे आणि ते समजण्यात कुठेतरी कमी पडत असू त्यामुळेच तर हा अपराधी पणा आहे ना ?
आणि ह्या गोष्टींचा सर्वात नाजूक क्षण सापडत असेल तर तो कदाचित त्यांच्या स्पर्श सहवासात........
विश्वास हि केवढी मोठी गोष्ट असू शकते ह्याच जाणीव त्यावेळी होत असेल .
माणूस जन्मतःच छोट्यामोठ्या ध्येयात गुंतला जातो,आणि त्याच्या गरजा ह्या मानसिक होऊन जातात .आणि ज्यावेळी मन आणि बुद्धीच्या निर्णय क्षमतेचा क्रम बदलतो तेव्हा गोंधळाचा क्षण निर्माण होतो .
हा क्रम माणसाच्या नात्यात सतत कुठल्याना कुठल्या क्रमाने गरजेचा असतो आणि तो असतोच क्रम बदलला कि माणूस बदलतो .
तो मान्य न करण्याचा अपराधीपणाही मग माझ व्यक्तिमत्व ठरवत जातं जे फ़क़्त माझं मलाच माहिती असत .
१ मार्च २०१३
धन्यवाद तस्लिमा नसरीन तुमच्या "उधाण वारा" ह्या पुस्तकाबद्दल

Subscribe to:
Posts (Atom)