बऱ्याच दिवसांनी कि वर्षांनी काहीच आठवत नाही शेवटच वाचन कधी केलं कदाचित परवाच केलही असेल .पण आठवणीत नाही ,
काय फरक पडतो त्यांनी ?
स्वतःच आणि इतरांचं अस्तित्व मान्य करण्यासाठी . आपल्या स्वतःला पूर्ण कल्पना असते आपल्यात असणाऱ्या कमकुवतपणा ची आणि आपण पूर्णपणे एक पाऊल अंधारात असतो आपल्या सामर्थ्यपणापासून .तो नेहमी चकित करणारा असतो .अशी कुठली गोष्ट अनुभवास आली कि आपल्यात पुढची जाणीव निर्माण होते.आणि अशी गोष्टच वारंवार होत नसल्याने त्याचं आकर्षण आपल्यात निर्माण होत असत आणि त्यामुळे आपण समृद्ध होता होता आपण अधोगत हि होत असतो , फक्त तो आपल्या इगोमध्ये परावर्तीत होत असतो.
थोडं हलवणार ,हेलावणार आणि वर सांगितलं न तस आपल्यातल अपराधत्व आपल्या समोर ठेवणार . मनाच्या लैंगिक पणाला निरोध लावण्याचं काम हे प्रभावी लेखनच करू शकत (ह्यामध्ये कुठेही इतर गोष्टीचं सामर्थ्य कमी करण्याच कुठलही कारण नाही फक्त इथे तो लिहिला नाही कारण लेखन ह्या विषयावर इथे लिहायचं आहे इतकंच म्हणूनच )
आजूबाजूच्या वास्तव घटना आणि त्यासोबत त्याच्याशी मिळतेजुळते संदर्भ असणार्या भूतकाळातील परिस्थितीच एखाद पुस्तक वाचताना ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत जातात . फरक कुठे करता येत नाही आणि
प्राणी हा मानवाचा जिव्हाळ्याचा विषय असतो . प्राण्यात माणुसकी सापडली नाही तरी त्यावर माणसाने जनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही ......
त्यामुळे एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून विचार करण्यापेक्षा माणूस म्हणून विचार करण्याने त्या दोन्ही नात्यात जितका मानवीपणा कसा येऊ शकतो ह्याचाच विचार होतोय .........
पुरुष स्त्री ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी आणि एकमेकांव्यतिरिक्त काहीतरी संबंध असेल किंबहुना आहे आणि ते समजण्यात कुठेतरी कमी पडत असू त्यामुळेच तर हा अपराधी पणा आहे ना ?
आणि ह्या गोष्टींचा सर्वात नाजूक क्षण सापडत असेल तर तो कदाचित त्यांच्या स्पर्श सहवासात........
विश्वास हि केवढी मोठी गोष्ट असू शकते ह्याच जाणीव त्यावेळी होत असेल .
माणूस जन्मतःच छोट्यामोठ्या ध्येयात गुंतला जातो,आणि त्याच्या गरजा ह्या मानसिक होऊन जातात .आणि ज्यावेळी मन आणि बुद्धीच्या निर्णय क्षमतेचा क्रम बदलतो तेव्हा गोंधळाचा क्षण निर्माण होतो .
हा क्रम माणसाच्या नात्यात सतत कुठल्याना कुठल्या क्रमाने गरजेचा असतो आणि तो असतोच क्रम बदलला कि माणूस बदलतो .
तो मान्य न करण्याचा अपराधीपणाही मग माझ व्यक्तिमत्व ठरवत जातं जे फ़क़्त माझं मलाच माहिती असत .
१ मार्च २०१३
धन्यवाद तस्लिमा नसरीन तुमच्या "उधाण वारा" ह्या पुस्तकाबद्दल

No comments:
Post a Comment