display: inline-block;

Mar 4, 2013

४ मार्च २०१३ (२)

वाटलं  फिरायला  जाऊ या रस्त्यावर जरा मोकळं वाटेल,
तर दिसला
उड्डाणपुला वरील होर्डिंग्ज च्या मागे एक अस्ताव्यस्त झालेला माणूस
काही वेश्या आणि त्यांच्या आजूबाजूला घुटमळणारी गिऱ्हाईक
संध्याकाळचा अख्खा लोंढा होताच घराकडे परतणारा  ,
चूकच केली बाहेर जाऊन ,
खरतर खरतर स्वतःमध्येच जायला पाहिजे होत.
कुठेतरी शांत बसून ,
आपल्यासारखीच माणसच शोधत बसतो आपण ,
रस्त्यांवर
मागे एकदा 
 चाप्लीन पाहून  हस हस हसलो ,
आणि एकदा वाचलं त्याच आत्मचरित्र
तर बघितलं त्याच दुःख सापडत का ते चित्रपटात
छे हरलो साफ ,
अशी का माणसं नाहीत हि  रस्त्यावरची होत माझ्यासाठी
...............................................................
माझं हसू हि मीच शोधाव आणि लोकांचं हि .
माझं दुःख फ़क़्त मलाच दिसावं आणि लोकांचं हि 



No comments:

Post a Comment