display: inline-block;

Mar 4, 2013

४ मार्च २०१३

खूप अस्ताव्यस्तपणा आहे ...
माणसाच्या मनाला काही अर्थ आहे का?
माहिती असूनही प्रवास मरणाकडे जात असताना
माणसाची ओढ प्रत्येक क्षण
जगण्याकडे आकर्षित झालेला दिसते  .
माणसे माणसांशी वागतात ,बोलतात,
त्यांचे संपर्क कधी वाढतात तर कधी ते स्थिर राहतात आहेत तिथे .
कधी असून नसल्यागत ..
जाणिवांच्या संपर्कात एक नात तयार होऊ पाहत
कसंही लांबच ,दूरच, वाढउ  असंहि वाटणारं किंवा आहे त्या ठिकाणीच स्थिर रहाव अस वाटणार,
ताणली ही जातात काही त्यात अवास्तव पण
ते तडे ही एका कच्च्या रस्त्यांसारखे आपल्या वाटेचे असतात .
ज्यावरून आपण इथपर्यंत आलो असतो .
फ़क़्त त्यावरून आता पुन्हा चालायचं नसत इतकच .
तरीही एका आर्त हाकेसाठी मनाचा एक कोपरा उघडा असतोच
आणि त्या कोपऱ्यात अस वाटत  आपले संपूर्ण अस्तित्व आहे.
हे दिवसाचे चोवीस तास ,प्रहर सर्व आडव येत ,
असं वाटत अक्ख आयुष्य सलग का नसत?
हे दिवस ,रात्र मनावर होणाऱ्या  परिणामांना नाचवत असतात .
का?
ते प्रभुत्व करत असतात आपल्यावर .
माहित नाही कधी पिऊन टाकलं विष ,
का माहित नव्हत
तिला आयुष्य फ़क़्त मेल्यावरच संपत नसत ,
का माहित नव्हत तिला ते शरीरा बाहेरही भिनत जात 
आपल्याच्या आयुष्यात
ही
का माहित नव्हत
तिला सुगंध जरी  असला तरी
सुगंधाही कोणाची गरज असू शकते .
कि तिला सुटकाच करायची होती स्वतःची ,
कि तिच्या नजरेला ती तडा हि दरीत रुपांतर झाली .
कि वाटत होत तिला ती दरी ओलांडूनही
ती सामना नाही करू शकणार नजरेचा .
का माहित नव्हत तिला ती नजरेआड झाल्यावर ,
तिथे तिला शोधत ताट कळणारा तिथून
नंतर कधीच ,
मागे फिरू शकणार नाही
ती खंत घेऊन .
............................................................

                                                              अभिजित ४ मार्च २०१३

No comments:

Post a Comment