display: inline-block;

Mar 10, 2013

रविवार १०मार्च २०१३

आशीर्वादांशी आता वाद होतात मनात
हे असतात तरी कोठे ?
पाठीवर,डोक्यावर कि कंपनांत.
 आशीर्वादांशी  हा शीर वाद
सुरु  राहतो .
मनात .
एकाकी अवेळी .
...................

ग्रहणात संपले दिव्यातले तेल
आणि पाहत बसलो
अंधाराच्या कडे वरील  प्रकाश .
शोधत राहिलो मी 
वेदांतील विश्वास माझ्यात
.............................
वेद न जाणता ही
 पक्षी मात्र ,
उडत होते.
           आत्मविश्वासाने .........
आशीर्वादांशिवाय
इतकं साधं .
................................

पक्षी मात्र होऊन जातो .
वेदांशिवायही
आणि माणूस मात्र आशीर्वाद 
घेवूनही  माणूस होण्यासाठी
झगडत असलेला
                                              ....                       अभिजित २०१३

No comments:

Post a Comment