display: inline-block;

Mar 4, 2013

४ मार्च २०१३ (३)

अचानक भाषांतर होऊ लागलं
आणि भावनांशी गुंता वाढत चालला ,
शब्दाचे अवघडलेपण ,त्यांच्या मर्यादा वाढू लागल्या
वाटलं अशीच एक ओळ रिकामी सोडली तर ,

समजतील का लोक ?
मला काय म्हणायचं आहे ते .
बसतील का त्या रिकाम्या ओळीच्या वेळी
दिलासेचा हात खांद्यावर ठेवून  मित्रासारखा

कोणी आलिंगन देईल का प्रियकर समजून

उभे राहतील का शांत शेजाऱ्या सारखे 
आपल्या घरातीलच माणूस गेल्यासारखे

चालेल एखाद्या शिकारी सारखे सुद्धा
आपला सावज टिपायला बसलेले .

..................................................... अभिजित ४ मार्च २०१३

No comments:

Post a Comment