शेवटचे जगताना बाबा ....alive at his last moment father |
मा झ्या जन्माचे दूसरे साक्षीदार
आपल्या मरणाचे असावे आपण पहिले
पडून राहिलेल्या देहाला मरताना बघणे ,
तेही आपल्या बापास .
दिसताहेत खुणा श्वासाच्या .
पाहतोय यातना
फ़क़्त मरणासाठी .
पाऊलखुणा हि आता उमटणार नाहीत .
आहे फ़क़्त देह समोर .
माझाही झाला देह .
२)
माझे बाबा जगात आहेत .
मी थांबलोय मरणासाठी .
मेंदू निकामी झालाय त्यांचा .
कधी मी एकट्यात त्यांचा हात
हातात घेतो .
तर कधी गुदगुल्याही करतो .
वाटल तर फ़क़्त पाहतो .
त्यांच्या श्वासात
स्वतःच आपलेपण .
त्यांनी मात्र तरीही जपला
जातानाही स्वतःचे
स्वपण …….
No comments:
Post a Comment