display: inline-block;

Feb 11, 2014

11/02/2014

१)
माणूस मेल्यावर पूर्ण होतो .
आपलं अपूर्णत्व घेवून .
आपल्याला भटकत ठेवतो
मुक्त करून .
त्यात आनद सापडला
कि
मी मुक्त आहे म्हणूनच तर
मी हरवलो आहे .
असा ग होतो
आणि तो जाणवला ,मानला ,समजला
कि ,
क्षण शांतता,
स्वतःच सापडण
इथेच ह्यामध्ये.



२)
 मरण समोर दिसते
मनाची अधीरता शिगेला पोहचते.
हृदयाच्या कळा सुरु होतात .
डॉक्टरची वाट आपोआप बागेकडे जाते.
मागे पाहिलं की दिवस दिसतच नाहीत
काही आनंद शेवटात
स्वतःलाच शोधताना दिसतो .
कळा कळ्यांना  शोधू लागतात
पानच फार दिसतात .
हिरवा शांत करतो .
 कळा विरून जातात
अश्रुना वाट मोकळी मिळते



No comments:

Post a Comment