display: inline-block;

Mar 12, 2015

कला स्वत्व

कला स्वत्व 
कलेचे अस्तित्व आणि स्वतःचे स्वत्व हे दोन वेगवेगळे विषय असले आणि त्या एकत्र याव्यात किंवा नाही , किंवा त्या परस्परसं  बधी  बाबी असल्या तरी त्यांचा संबंध हा बऱ्याच प्रकारे , मार्गाने जोडता येउ शकतो , परंतु त्यामधील जो काळ नावाचा सापेक्ष आहे तो नेहमीच अबाधित असतो आणि आहे .  म्हणजे काळ  हा त्या दोन्ही प्रक्रियांना एकत्र आणणारा महत्वाचा  दुवा  त्याचा परिणाम हा कलास्व्त्व  , 
कला आणि स्व- तत्व ह्याचा परिणाम हा त्या काळाच्या क्षणा क्षणाला बदलत हि असतो आणि आहे .पण ह्या सर्व बौद्धिक गुंतागुंतींमध्ये क्रिया हि एक निवड अशी आहे जी त्या सर्वाना एका ठराविक प्रक्रियेचा भाग बनवते . 
तर प्रक्रिया ही कलेचे आणि स्वत्वाचे अस्तित्व बनते 
आणि पुन्हा त्या प्रक्रियेचा काळाशी अस्तित्वासाठी स्वतःचा प्रवास सुरु होतो . 
मी तिथेच स्वतःची कला स्वतःहून वेगळी झालेली पाहत असतानाच शिकत  असतो , 
आणि तिथेच असण मला माझ्या  स्वत्वातून अस्तित्वाकडे होणाऱ्या  बदलांचा परिणाम हा कलाकार म्हणून कलाकार असण्याच तत्व देत असत . 

                                                                                                 दिनांक १२ एका आणखी कटिंग चहा सोबत .


No comments:

Post a Comment