display: inline-block;

Aug 9, 2015

It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change. ----Charles Darwin

माझी कला करण्याकडे /करण्यापलीकडे  माझा भर असतो तो त्यात  प्रवाही राहण्याचा   तसेच त्यासाठी  मी वापरत असलेल्या माध्यमांच्या कक्षा विषयांसोबत त्या अनुरूप  रुंदावण्याचा प्रयत्न माझ्यासाठी महत्वाचा असतो . 
सुरुवातीपासून ते आतापर्यंत जो काही प्रवास आहे तो चित्रकले पासून कला  ह्या जाणिवेपर्यंत होण्यास बरीच माध्यमे ,तसेच माझ्या दैनंदिन जीवनात घडलेल्या , घडणाऱ्या बदलांचा समावेश असला तरी ह्या सर्व प्रक्रियेतला स्वतः मधील प्रामाणिक  अद्वितीय पणा (uniqueness  ) पिंजून कायम ठेवण्याकरिता किंवा प्रसृत होण्याकरिता सहजज्ञानाची जाणीव (intuition) विकसित  होण्याच्या  क्रियेशी शारीरिक आणि मानसिक द्रुष्ट्या  सुसंगत राहणे . माध्यमांचा specifically  अंतर्भाव कसा होईल ह्याचा  विचार करता करता स्वतःची लय अभ्यासकाच्या पातळीवर  विकसित करणे आणि  वेळ आणि शक्ती यांचा समन्वय होताच  ती क्रिया करत राहणे . 
पूर्ण -अपूर्ण ह्या गोष्टी तशा प्रायोगिक तसेच त्याला अध्यात्मिक  आणि वास्तववादी विचारांदरम्यान स्वतःला व्यक्त कण्याचा एक प्रकारे अभ्यासच  माझ्या कलेद्वारे मी करण्याचा प्रयत्न करत असतो . 
ह्या सर्व प्रक्रियेसाठी लागणारा अनुभव मी मुख्यत्वे करून visual  दृश्य पातळीवर घेण्यास  भरअसतो . कारण  मला असे वाटते  कि कुठलाही लिखाण हे ठराविक निष्कर्षांवर आधारित असते आणि त्यामुळे तिथे स्वतःहून अनुभव मिळण्याचा संभव हा एका विशिष्ट पद्धतीने  रचला , बांधला गेला असतो . मला मर्यादा दिसतात तिथे मग , किंबहुना एक धोक्याची पातळीसुद्धा तयार होते अनामिक  ,कि आपण त्या लिखाणाद्वारे मिळणारा बोध हा अनुसरण करण्याची (उदाहरणार्थ - van gogh  हि वृत्ती)  त्याच्या चित्रकलेतील प्रगतीचे मला कौतुक आहे परंतु त्यासोबत समांतर असणार्या जीवनशैलीमध्ये   प्रक्टीकॅली  जे केले त्यात  तो बरच काही त्याच्या पत्रांद्वारे सांगतो जे    त्याच्या चित्रांपेक्षा मौल्यवान आहे . ( उदा.  त्याचे चर्च च्या विरोधात  जावून खाण  कामगारांमध्ये जाणे )परंतु, त्याच्या त्या महत्वाच्या गोष्टींपेक्षा त्याची स्वैर जीवनशैली (जी त्याच्या काही चित्र विनाकारण  प्रसिद्ध करत राहते माझ्यासमोर )  वाचून  तो बराच " "कु"प्रसिद्ध झाला आणि    असे माझे मत  ,, अर्थात त्याच्या  मानसिक अस्वस्थपणा मधून  घडून गेलेल्या प्रसंगाव्यातिरिक्त  घडलेल्या आणि लिहिलेल्या  visual  मध्ये माझ्याशी  होणारा संवाद हा निरपेक्ष , बहुआयामी असण्याचा संभव जास्त असतो . आणि तो  भिडण्याचा हि .  तो बऱ्याच स्तरांवर होत असतो आणि तो मला एका अभ्यासाला प्रवृत्त करतो . पण त्याच्या शैलीद्वारे तो  मर्यादितहि आहे  . 
हा प्रकार visual च्या बाबतीत paul klee  सोबत जास्त अभ्यासाच्या दृष्टीने जास्त केंद्रित असतो . 
असो . (klee  आणि gogh  हि नावे  नुसती उदाहरण म्हणून )
माझ्या अभ्यास प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा बदल हा मी माझ्या सुरवातीचा जर विचार केला तर तो  डार्विनच्या बदल स्वीकारण्याचा सिद्धांत माझ्या वाचनात आला तेव्हापासून , कारण माझ्या कामामध्ये आणि एकूणच प्रक्रियेमध्ये इतर सर्व आजूबाजूच्या गुंतागुंतीमधून एक दिशा देणारे ठरले. खरतर हा बदल वाचल्या वाचल्या न होता तो कुठेतरी  भिनत होता स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक घडामोडीनपासून   मिळणाऱ्या अनुभवांमध्ये 

It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change.
 ह्या एका वाक्याने आतूनच जगण्याचे एक बळ मिळते आणि ते कालातीत सत्य  मला ह्या एका वाक्याने माझे मार्ग  चित्रकले कडून कलेकडे विस्तारित होत  गेले .
लय ,निसर्गातील वास्तव,भावना,संवेदना(emotions ), संकल्पना (ideas ) , माणसं ह्यांच्यापासून मला  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कलेसाठी प्रोत्साहन मिळते . तसच ज्या ठाम जाणिवेची  एक भावना आणि निश्चिती मला माझ्या क्रियेसाठी प्रोत्साहन देतो तो  म्हणजे माझा अवकाश , माझा space  .ज्यामधून मला एक अलिप्तता जपण्याचे आणि  ठेवण्याचेहि  एक भान मिळत गेले.  स्वतःची कला जोपासण्यासाठी  मला माझ्या चाळीमधल्या वास्तव्यात माझ्यामध्ये त्याची जाण विकसित करतान काही अंशी संगीताचीहि  महत्वपूर्ण साथ मिळाली .





माझ्यासाठी एक   चांगला कलावंत हा कधीही  आपल्या सर्व अवगत असलेल्या कलेच्या  प्रक्रीयेपुढे  जावून  निखळ  दृश्य  संवाद न साधता  एक स्व तंत्रा  च्या  दिशेने विचार  आणि  क्रिया करण्यास प्रवृत्त करत असतो . . 






No comments:

Post a Comment