display: inline-block;

Feb 13, 2017

नेहमीपेक्षा बऱ्याच संख्येने दर्दीं सोबत गर्दी.......

नेहमीपेक्षा बऱ्याच संख्येने  दर्दीं  सोबत गर्दी आर्ट गॅलरी  मध्ये काळा घोडा उत्सवानिमित्ताने जमली  होती  . चारही बाजू नुसती सळसळ आणि बाहेर उडणारे साबणाचे फुगे .
जहांगीरच्या  भिंतीवरील एका भागात माणसाने माणसाशी चालवलेल्या क्रूरतेचा जिवंत क्षण .
खरंतर थोडी हळहळ वाटत होती अगोदर कॅमेऱ्याचे कार्ड पूर्ण भरले असल्याचे पण ,
त्या मृत माणुसकीचे जिवंत छायाचित्रित केलेले क्षण सुद्धा " सेल्फी" मध्ये कन्व्हर्ट होत असल्याचे पाहून
असं कसं  होऊ शकते ?
मी माझ्या कॅमेऱ्याचे च खरतर आभार मानले . 

पेंटिंग्स पाहायची हि वेळ नव्हती .
v
v
v
v
बाहेरच आलो .
( )
v
जलद फेरफटका मारून .

खरतर,मी आलो हि होतो जास्त करून माझ्या मित्राला भेटण्याच्या ओढीने  पण, नाही झाली .
मग, लांबच लांब रंग पहिली /././././././././././ काय काय बघू ? काळा कलेसोबत जिवंत सळसळणाऱ्या मुली , मुले, जोडपी सर्वत्र  एकत्र होते . मध्येच विचार आला असं घोळक्यात हरवणं पण किती मस्त आणि मजेशीर . नवीन नवीन लगेच जाणवू लागते सर्व आणि मला मग museum बाहेर बसलेला एक जडीबुटीवाला दिसला . बोलत होता कोणा बरोबरतरी मी पण बसलो त्याच्या शेजारी आणि तो जाताच बाबाला विचारलं
 " हे सर्व कुठून जमवलं ? " त्याने जवळ जवळ सर्व राज्यांची  नवे घेतली मग त्याने मला माझे ठिकाण विचारून पायधुनी पासून ---------विरार, बोईसर पर्यंत त्याच्या ओळखीच्या दुकानांची नावे दिली . 
मला काई त्यात इंटरेस्ट नव्हता आणि थोडा वेळ जमेल तितके सर्व पाहून निरोप घेतला आणि
मग पाय (नग्मा )NGMA  कडे वळले .
 काळा उत्सवाची झिंग इतकी होती कि लोकं (नग्मा ) NGMA  मध्ये लागलेले प्रदर्शन पण त्याचाच एक भाग समजून SECURITY  वाल्यांची त्रेधातिरपीट उडवत होते . मी तिकीट काढलं आणि आत गेलो तर समोर सर कोणासोबत तरी documentation सारखं काम करत होते . 
मी मात्र चित्र पाहायला सुरुवात केली आणि समजलं काही कॅनव्हास प्रिंटेड पण आहेत नीट लक्ष द्यायला हवं . पाहू पाहू लागलो-.
 कृत्रिम उजेड पण मस्त आणि गर्दी पण शांत होती त्यामुळे जरा बरं वाटलं .
आत्ता वेळ  माझा होता पूर्णपणे . 

:)

No comments:

Post a Comment