display: inline-block;

Apr 5, 2015

सेल्फ "ए" स्केप

असे खूप प्रसंग ,गोष्टी आहेत
 ज्यांचा मी लगेच एकतर  तर्क लावून 
अथवा ,
हृदयाने विचार करून ,
 निर्णय नाही घेऊ शकत .
 तिथे फक्त मी वेळ घेऊ शकतो .
अक्षरशः वेळ वाया 
घालवू शकतो ,
स्वतःचा 
कधी कधी दुसर्यांचा हि 
अर्धवट हि राहू शकतो . 
आणि सर्व काही यथोचितच आहे . अस न समजता.  
समजून घेण्याचा प्रयत्न न करता 
पुढे जावू शकतो . 
किंवा, आहे  तिथेच काहीतरी 
पूर्णपणे मला स्वतःला आरसा दिसेल .
तो दिसतोच .
आणि तो असतोच,
जसा असतो. तसाच ,
स्वतःच्या मर्यादा . 
स्वतःबद्दल समोरच्याचा काय ग्रह होईल .
ह्याचा किंचितही विचार न करता, करता  शांत बसू शकतो . 
तसा ह्यातून मला काही फरक पडतो ,नाही पडत अस काही दाखवण्यापेक्षा . 
आणि,
आपण आहो तसे आहोत 
अस प्रामाणिकपणे स्वतःची समजूत न घालत बसता .
 एक अनिच्छित फ्लो असतो.  
त्यासोबत स्वतःचा काही आत्मसात केलेला मार्ग ,
 त्या दोघांची सांगड घालत 
जे आहे त्याची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न मात्र सतत सुरु असतो .






No comments:

Post a Comment