display: inline-block;

Oct 15, 2016

Abstract and Misconception

 stump tissues and husk of my dead aloe Vera and gum Arabic , white binder on
 non transparent plastic sheet 


Tried to find my way out, i made some ways to felt "yes" I was unaware simultaneously I build the walls -

 Abstract
Detail of Abstract


after i felt this should be a big work but then i realized the process about these specific work is now died in me with answer and my awareness about goal now even if i decide to go with thought and its essence  which i got from these i need to to give time to emerge this specific thought in my mind . but even if i work with contradictory process is something always have magic to experience wonder with its
versatility. 

Oct 8, 2016

आज म्हणजे ७ /१०/२०१६ दोन संभाषण वजा मुलाखती ....



 Lunch time from the railway door heading towards Nehru center 

आज  म्हणजे ७ /१०/२०१६ दोन   संभाषण वजा मुलाखती खरंतर चित्रकारांचे मनोगत (आं तरहेतू)व्यक्त  करताना   ऐकायला आणि पहायला मिळाले वेगवेगळे  करण्याचे कारण  असे कि  ज्यांचे सुरवातीला  ठरले होते ते म्हणजे  श्री . प्रभाकर कोलते  हे काही महत्वाच्या कारणांमुळे  प्रत्यक्ष  उपस्थित  नव्हते  म्हणून  त्यांनी त्यांच्या मनोगतिक  मुलाखतीचे  मनमोकळे पणे  रेकॉर्डिंग आमच्यासाठी केले होते  ... त्यामुळे खरंतर त्यांचे नसणे हे त्यांचे त्यांच्या चित्रप्रक्रियेबद्दल  मनोगत ऐकताना ते जे सांगण्याचा म्हणजे जसं  चित्र ज्याप्रमाणे त्यांना पूर्णत्वाच्या दिशेने संकेत देत असते ते  त्याप्रमाणे त्यांचे  तिथे प्रत्यक्ष  नसणे  हे त्यांचे असणे असावे का? ह्याचा मला  मनात कुतूहलयुक्त सांकेतिक विचार एक  देत होते .

आणि दुसरे होते ते श्री दिलीप रानडे सरांची  ते श्री . प्रभाकर कोलते ह्यांच्या व्हिडीओ विझ्युअल ला उपस्थित असलेले पाहिले , त्यामुळे  आधीच्या  अनुभवाने शंका  निर्माण केली होती  निवळली  . आणि अर्ध्या  तासाच्या ब्रेक नंतर ते पूर्णपणे अनुभवायला मिळणार  उत्सुकता निर्माण झाली . खरंतर  रानडे  सरांना  मी म्युझिअम मधील नॅचरल हिस्टरी सेक्शन मधील म्युरल  प्रेझर्वेशन  च्या कामामुळे  एक संवेदनशील  कलाकार म्हणून  ओळखतो त्या.नंतर मी त्यांची कॅटलॉग आणि पुस्तकांमधून  चित्र, आणि स्कल्पचर पहिले  त्या मुळे  एक कि  त्यांची  त्यामागील विचारप्रक्रियेचि  उत्सुकता कुठेतरी  मनात होती किंबहुना त्यांच्या  सर्व कामांपेक्षा माझ्याकडे असणाऱ्या  श्री . सुधीर पटवर्धन ह्यांनी क्युरेट  केलेल्या  " विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला Expanding horizons  ह्या पुस्तकवजा   कॅटलॉग मधील  काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," ह्या बद्दल  उत्सुकता  रुजून  कुठेतरी होती .  मी काफका  वाचले नाही किंबहुना वाचेन  कि नाही हयाबद्दल  माहित नाही पण मध्ये मध्ये वाचनात येणारे कोट्स आणि एक फिलॉसॉफिकल लेखक म्हणोन  वेगळे स्थान  प्राप्त केलेला लेखक अशी थोटकी माहिती असली तरी त्याच्यासोबत येणारे metaphor  सारखा जड  शब्द  हि त्याच्याबदल्लची  जाणीव कुठेतरी स्वतःसाठी वेळ मागत   होती  .
  श्री . दिपक कन्नल आणि  श्री . दिलीप रानडे 


 कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल अशी जाणीव निर्माण झाली होती . अट्टहास नव्हता
चित्रामुळे निर्माण झालेली  उत्सुकता कुठेतरी रुजून हरवली होती .
  रानडे सरांसारख्या व्यक्तींचे public ally चित्रप्रवासाबद्दल सहजी  व्यक्त  होताना त्या  कुतूहल मिश्रित प्रश्नाचे  मिळालेले मला उत्तर हे अनपेक्षित असण्यापेक्षा  त्यांच्या  कलाप्रक्रियेच्या  प्रवासामधून असल्याने ते संयमित स्पष्टीकरणाद्वारे  सहज  असे होते.
 खरतर त्यांच्या बोलण्याने माझ्या  त्या रुजलेल्या प्रश्नाची अधोरेषा पुसून काढणारे होते .
 हे मला जाणवले . आणि निघालो



" विस्तारणारी क्षितिजे  समकालीन भारतीय दृश्यकला
 Expanding horizons  
ह्या पुस्तकवजा  कॅटलॉग मधील  
श्री . दिलीप रानडे  
यांचे काफ्का चे " फ्रान्झ काफ्काज्  फिक्शनल लॉजिक ," २०१३


Sep 20, 2016

द. भा . धामणस्करां सोबत एक संध्याकाळ


18/9/2016

काही जवळच्या मित्रांना मी सांगितलेले धामणस्करां नां माझ्या भेटण्याच्या माझ्या इच्छेबद्दल . कारणही तसे होते माझ्या अर्कासोबत माझ्या सुरु  असलेल्या प्रयत्नांसोबत त्याच्या स्वतःमधील स्पष्टतेसाठी त्याच्याच विचारप्रक्रियशी संबंधित मुळांचा  शोध घेण्यासंबंधी एक सुरु झालेला  शोध .
माणूस आणि निसर्ग  आणि त्याच्याशी निगडित विचारप्रकीयेने माझ्यात सतत एक कलात्मक जाणीव आणि त्यासंबधातून जाणवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे किंबहुना जास्त  प्रश्नच आणि त्यांची स्वतः द्वारे  उत्तरे मिळवण्यास   सतत एक दिशा उघडी करून दिली आहे . मग ती त्या संबधी असलेल्या माझ्या वाचनातून , संवादातून, पाहण्या  तसेच अनुभवण्यामधून असेल . ह्याच प्रक्रियेमध्ये धामणस्करांची मला भावलेली विचारप्रक्रिया आणि ती कवितेद्वारे व्यक्त होण्याची लय ह्यांची ओळख माझ्या जाणिवांच्या सतत जवळ असलेली जाणीव जेव्हा मी अर्कासोबत माझी चित्रे काढण्यास सुरुवात    केली त्यावेळी त्याचे   माझ्या मनात असणारे त्यांचे अस्तित्व त्यांचे स्वतःचे असे एक स्थान पक्के  करून विसावल्याची अनुभितीचं  :) झाल्याचे जाणवले . तेव्हापासूनच त्यांना भेटून त्यांना स्वतःची चित्रे दाखवण्याबद्दल मनात प्रवास सुरु झाला .
खरंतर कुठलीही व्यक्ती एक कलाकार म्हणून आवडीची झाल्यास त्याच्या अति खाजगी आयुष्यातील तपशिलांपेक्षा त्याची त्याच्या कामामधील विचारप्रक्रिया आवडल्याची ती  जाणीव असते , आणि स्वतंत्रपणे एखादे काम आवडणे हे त्या कामाशी आपले   अनुभवांमधून निर्माण झालेले त्याचे एक स्वतंत्र असे  स्थान म्हणून आपल्याशी एक खास अशी ओळख  असते .
  धामणस्करांची मला हि प्रक्रिया भावली .
त्यानुसार वर्षा दिड वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि त्यातच त्यांना झालेल्या हल्लीच्या अपघातानंतर एक अस्वस्थता निर्माण झाली होती  आणि त्या अस्वस्तथेपेक्षाही त्यांना भेटण्याच्या ओढुत्सुक्ततेने एक दिवस ठरवून चैतन्यला फोन करून भेटण्याबद्दल कळवलं .
 सुरु असलेल्या पावसाव्यतिरिक्त बाकी सर्व स्थिर होते . पण चित्रांची  सुरक्षा हि माझ्याकरिता सर्वात महत्वाची अशी बाब होती  , तरी सकाळी पाच पर्यंत मनात सुरु असलेल्या द्वंदासोबत पोर्टफोलिओ आणि  ठरवलेल्या  प्रमाणे त्यांना मला माझ्या विचारप्रक्रियेतून पूर्ण झालेलं एखादे चित्र फ्रेम न करता आणि त्यांच्यासोबत चा एक फोटो :) मला महत्वाचे होते .  सकाळी सुद्धा तो सुरूच होता  पण मी संयमाने एका छोट्या प्रकाशाची वाट बघत होतो  आणि त्याचा हा फसवा मूड माहित असूनही  तो मिळताच दुपारी निघालो  कदाचित अशा व्यक्तीला असे भेटणेच  माझ्यातील  त्यासंबंधी उत्सुकता वाढवत गेलं :)
त्यांना भेटल्यावर काय बोलायचे ? कसे बोलायचे ? ह्या गोष्टी माझ्याकरता फारसे महत्वाचे असे नव्हते किंबहुना माझी हि चित्र माझ्यावर हे दडपण येऊ  देत नाहीत  आणि मला सहज  भेटीचा अनुभव जास्त महत्वाचा होता  त्यामुळे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामध्ये आणि त्यांना त्याबद्दल कुठलाही पूर्वकल्पना न देता होणारी हि भेट म्हणजे माझ्यासाठी माझीच जबाबदारी होती .
 मी शून्य होऊन बसमध्ये बसलो  खरा चित्रांनीही माझ्यासोबत केलेला हा स्वतंत्र प्रवास होता कारण अशी हि पहिलिचं वेळ होती जेव्हा माझ्याकडून त्यांचे वेगळे लगेज  घेण्यात आले .
पूर्ण शून्य होऊन प्रवासाला सुरवात झाली खरी पण मनात त्यांच्या भेटीअगोदर त्यांचा माझ्या मनामधील शोध किंबहुना त्याची मुळे शोधण्याची जाणीव लिहून शोधावी  असे वाटले .  आणि  लिहू लागलो .


चांगले - वाईट असे वर्गीकरण करण्यापेक्षा काही अनुभव असे असतात जे स्वतःला जसे फांदीवर बसलेला पक्षी आकाशात झेप घेण्यासाठी जेव्हा सरसावतो त्यावेळेस फांदीची वर खाली होणारी कंपने हि आपल्यात कुठेतरी एक महत्वाकांक्षा  , विचार स्वप्ने निर्माण करतात तर काही अनुभव हे त्याच क्षणी त्या उभ्या असलेल्या झाडाची मुळे  खोलवर जात आपल्यामध्ये आपल्याच विचारगर्भाकडे जाणाऱ्या नासाचा शोध घेण्यास उद्युक्त करत असतात .  
खरंतर या दोन्ही एकमेकास पूरक असलेल्या क्रियांचा परिणाम माणसाच्या त्याच्या   जडणघडणीतील  एक महत्वाचा असा प्रवास समजून देऊन त्याचे व्यक्तिमत्व अधोरेखित करत असतात परंतु ह्या दोन्ही जाणिवांपैकी कुठलीतरी एक जाणीव हि अनुभव घेण्याची एक जाणीव मनात  निर्माण  करून आपले स्थान पक्के करत असते . 
मला माझ्या ह्या दोन्ही जाणिवांमध्ये दुसऱ्या  जाणीवेने प्रवास करण्यास स्वतःच्या अनुभवानी आणि सोबत  निसर्गाने मनात निर्माण केलेल्या ओढीने प्रवृत्त केले असले तरी त्याच जाणिवेने पहिल्या जाणिवेची जबाबदारी आणि त्याद्वारे पूर्णत्वास पोहचण्यास लागणाऱ्या क्षमतेची ओळख करून दिली  आणि देत आहे . 


 शून्य होऊन "धामणस्करांकडे जाताना" अशा रीतीने  वहीत केले ली ह्याची शेवट
हि एका अनामिक आणि विस्मयचकीत करणाऱ्या त्यांच्याच  तोंडून ऐकलेल्या  मी निघता  निघत च्या  आवडत्या निसर्गकवी बद्दल विचारले असता विचारलेल्या  त्यांनी  करून दाखवलेले नलेश  पाटील  ह्यांच्या अविर्भावात नलेश पाटीलां यां च्याच काही ओळी म्हणून  दाखवल्या त्याचबरोबर   बोरकर, यशवंत पाटील ,  किरण येळी , सुरेश भट अशांसारख्या कवींच्या कवितेच्या काही ओळी म्हणवून दाखवताना  ते  माझेही    आजोबाच वाटू लागले आणि निघत निघता नवीन प्रकाशित होणा रा  त्यांचा कविता संग्रह घ्यायला  मी स्वतः पुन्हा येण्याचे निम्मित मागून  त्यांनी  तुकारामाच्या शब्दाचे सामर्थ्य हे मला मीच लिहिलेल्या बसमधील संपूर्ण लिखाणाच्या  सारामध्ये  जाणवून दिले  आणि भिजून आलो :)

"सिंचन करीता मुळ |
  वृक्ष ओलांवे  सकळ।।





त्यांना दिलेले दिवस/ रात्र (DAY/ NIGHT)  हे माझे चित्र  मी गेरूने रंगव ले ल्या  माउंटिंग मध्ये  




Sep 12, 2016

Dead Movement !


Dead Movement !
Marker ink,  ink , water, plastic and  gum arabic on glass broken glass 




Detail of  
Dead Movement !


Sep 10, 2016

Unusual story time


Unusual story time 

Marker ink , water, plastic and gum Arabic on glass 



Detail of 
unusual story time 


Glass as a media came in front of me to broke my visual attachment with dead reality , glass is the media where i don't detach with my all surrounding and its own happenings but at the same time its engage and challenge me to continue my path .
its occupy its own space and let engage the nature 


 its makes clear statement of what i think or visualize also  what going in my mind .



Sep 9, 2016

तपकिरी परिपूर्ती

 मी अजूनही पुढे नाही गेलो त्यानंतर ,
ते वाचल्यानंतर ,
त्याचे कव्हर पेज 
मुखपृष्ठ अगदी साधे 
''तपकिरी'' 



मध्ये फक्त शीर्षक आणि खाली नाव 
हे असेच असावे .
ह्या असे असण्यामागे एक स्पष्टता /अस्पष्टता नसते . 
हे फक्त असते ते साधे असते . 

पुस्तक 
 १९४९ ते १९९० पर्यंत २५ रुपयाचे झाले . 
आता १०० आहे . 
आता मुखपृष्ठ रंगीत आहे . 
आत , मात्र बरेच रंग आहेत 
बर्याच छ टा आहेत .
परिपूर्ती 




.............

"शब्दात नि:शब्द सारे"

सेल्फ ए स्केप

सुकत चाललेल्या वीर्याचा वास जेव्हा आठवणींचे तळ  गाठतो . त्यावेळेस त्याच्या स्वतःमधील माझ्या अस्तित्वाची जाणीव जाळून टाकते आशा, अपेक्षांचा बराच हिस्सा ,
 मी माझ्या हिश्शयाचा  तेवढा उरतो 
सुका .... आणि 
स्वतःला समजावत  राहतो 
 धामणस्करांच्या कवितेतील ओळी  .... 
गळून पडलेली रंगीबेरंगी फुले ,
ती  पूरती विवर्ण झाल्याखेरीज 
मातीही त्यांना सामावून  घेत नाही.




Aug 29, 2016

असंच ............

तुझे असणे तसे खासच असणार . 
नसणे माहित नाही . 
तुझे असणे माझ्यातून मलाही कमी करणार काहीसे ,
नसणे ? माहित नाही . 
तुझे फक्त असणे  माझे असणार 
नसणे ..... फक्त तुझे 
तिथे मी नसणार
किंवा , माहित नाही 

Jul 11, 2016

Butterfly ~~~~~~


Butterfly
incense stick ash, flower extract, indigo on color card-paper
 red pigment  25.5x 35.5in





Detail 1



Detail 2

Jul 5, 2016

Impression of extract !23 by 40 + 2 flower extract on cardpaper


Impression Of Extract

!23 by 40 + 2 flower extract on card paper 




Detail
My materials to express myself 
They were not enough strong to be carried the burden of all, 
They fell in front of me and lie in a roll position.
They looked relaxed as me,
 No,

They taught me to relax .
With, the vibes they created in me like nothing is going to change from the past and what was the present in front of me.
My limitations of thinking have great power 
To surprise me, 
To teach me and,
To mold me
Inside.

 


2


3


4











Feb 22, 2016

"अमलताश "

अमलताश

कै . प्रकाश नारायण संत …
कवियत्री इंदिरा संत ह्यांची आई , तसे मला नावावरून ह्या व्यक्ती नावा पर्यंतच  माहिती होते .आता राई इतकी भर पडली इतकच . जरा , नाखुशीनेच वाचनालयातून हे  पुस्तक आणले गेले कारण खरतर आत्मचरित्रात्मक पुस्तकांविषयी माझ्या मनात एक निश्चित स्पष्टता नाही आहे , आणि खरखर म्हणजे इरावती कर्वे ह्यांचे "परिपूर्ती" वाचल्यावर मला युगांत हवे होते , परंतु माझ्याआधीच ते अगोदर कोणीतरी घेवून गेले होते त्यामुळे निराशाच झाली त्यामुळे वाचनालयात बरीच पुस्तकांची उलथापालथ केल्यानंतर "अमलताश" हे सुप्रिया दीक्षित ह्यांचे पुस्तकच घेवून जावे हे ठरवले . असे मी का ठरवले ह्यामागे माझी माझे स्वतःचे स्वतःविषयी असणारे नियम तपासून पाहण्याची एक वृत्ती सतत मागे असते . आणि की होईल जास्तीत जास्त नाही आवडले तर दुसर्या दिवशी पुन्हा "युगांत आले असेल का य्हाची चोकशी कार्याला म्हणून पुस्तक परत  करून आलो असतो असे माझे बर्याच वेळा झाले आहे आणि बरीच चांगली पुस्तके मला भेटत गेली ,
प्रकाश नारायण संत ह्यांच्या लेखनाबद्दल मला आमच्या माणिक madam  नि काही वर्षापूर्वी सांगितल्याचे आठवले .
खरतर मी कोणी एखादे पुस्तक सुचवल्यावर वाचणाऱ्या तला नाही recommendation म्हणून वाचण्यापेक्षा स्वतःचे पुस्तक तास-दीड तास कधी कधी पंधरा मिनिटे सर्व कपाटे पाहत पाहत निवड करण्याबद्दल मी आग्रही असतो . आणि मनापासून असे कि स्वतः पुस्तक शोधून वाणाची आवड वाढवण्यात माझा स्वतःचा आनंद मला सापडतो . ह… म्हणून कोणी सुचवलेले पुस्तक अथवा लेखक माझ्यासाठी महत्वाचे नाही असे नाही तो योग जर तसा जुळून आला तर माझ्या मनात सुचवणाऱ्या बद्दलचा आदर मात्र वाढतो त्याचाही आनंद वेगळाच .
तर अस हे "अमलताश" मला माझ्या हल्लीच्या मानसिक तणावाच्या काळात एक नकळत एक सकारात्मक आणि जीवनाविषयी जीवनाबद्दलच्या विचारांचे असणारे एक आनंद देवून गेले .

अमलताश - सुप्रिया दीक्षित

माझ्या छोट्या ताईला वाचण्याबद्दल मला आग्रही मताचे करून गेले . …… २१/२/२०१६

Feb 5, 2016

कोकणातील घरे आणि ....

कोकणातील घरे  आणि त्यामधील निरव , थंड कौलारू शांतता  खासकरून  मध्यान्हाच्या वेळी जाणवणारी अशी ....... ती  भरभरून तृप्ती देते .
जी शांतता कदाचित मंदिरांमध्ये सुद्धा अचानक होणाऱ्या  घंटानादाने दुभंगली जाते . त्यापेक्षा कितीतरी सखोल ,खरतर प्रगाढ अशी शांतता घरात अनुभवायला मिळते . त्या शांततेत अविचल (Motionless)  हि अवस्था काय असते ह्याची  जाणीव झाल्याशिवाय राहत नाही ,किंबहुना ……… 
ती जाणीव संपूर्ण  शरीराचे अस्तित्व व्यापून टाकते , आणि त्यामधून बाहेर आल्यावरसुद्धा जे वातावरण (झाडे , गावातील जेष्ठ  माणसे ,विहीर, दाणे  टिपणाऱ्या कोंबड्या, ताईच्या नारळाच्या झाडाखाली ठेवलेली मोडलेली खुर्ची  )  असते त्यामधील त्याचे पडसाद दिसल्याशिवाय राहत नाही . ४\२\२०१६


Feb 1, 2016

" श्वासोच्छ......वास " Breathing

" श्वासोच्छ …… वास "
Breathing

१/२/२०१६

Jan 31, 2016

चहा -समोसा


   its is not art its just i found interesting   to kept them with each other

चहा -समोसा
Tea - samosa
tea cup broke and its my dads cup which i have been using since i came to stay at his  place after
tea is never tasty as before as i felt after  the cup broke and i started to drink it in with normal steel glass


and the plate is once i went with my friend outside that day we ordered samosas and the plate of samosa stricken me with its

fluorescent shade so i bring with me.



३१/०१/२०१६

जिवंत माणसांचा , मित्रांचा बराच भूतकाळ मागे ठेवावा  लागतो  "जाणीवपूर्वक ".
तो आठवतोही  सहज  अनुभवांच्या आणि  प्रतिमेच्या स्वरूपात कोरल्या गेलेल्या  अवस्थतेत .
बराचसा  फोल असतो आणि बराच फेक सुद्धा
हा  खरतर वेळेचा बदल असतो आपल्यातला. 
 नवीन अनुभव तोल सावरत असतो 
दोन वेळेमधील.
आपण आपल्यावर "करत" असणार्या संस्काराचा   भास होत जातो.
आणि बरेच ए क टे
होत
चालल्याची
सा
पे
क्ष
जा
णी
व 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
३१/०१/२०१६



Jan 27, 2016

Today I forgot (happened second time in last 4 days).........

Today I forgot (happened second time in last 4 days) my every penny and all rupees at home (after I realized when I reached the place I wanted to ... not much far, but without money I was not able to drink my tea ((OK... that's not important)) so when I realized first minute I was helpless.... but after i went and sat my one of daily spot of tea stall... sometimes tea stalls are so helpful for me to write or generate my thoughts.
I have done.... roughly* complete my final year thesis on subject "आकार" (form) at the tea stall.
when I am on my way back to my* home I (suddenly) one thought stroked my mind  about art progress, "No its not progress.. Art don't know even any progress .Art evaluate, art /creations journey don't know anything about progress or next step, it's evaluate from us and there is no beauty exist
There is only evolution, which is our pure self reflection.
These things makes me strong being an artist because, when I think about my last effort for my art ...now almost 26 and more days I didn't' took any effort. because of various common reasons. but ,when I think about number of days I don't feel nervous or detach from anything.
 Simply the time I don't work most of time I have very common reasons but this patience of observing survival lessons from life motivates and gives me or i could say time takes advantage from me to evaluate the path of creation...and to stretch my horizon s which is  beyond thoughts... 27/1/2016

Dec 31, 2015

2015

2015
Creative achievements with my complete dedication for organic colors. (noncommercial)
Regrets,
Special visits and great experience with specially the writer Ms.Kavita Mahajan, who gave me her precious (almost 3 hours) to understand my process, fast meet with Shri Jayant Joshi,while i went to visited handmade paper factory and a few moments with MR. Subodh kerkar at MOG 
special disappointments from Dumb clients,
get together  with school buddies 
Financial problems,


Distance from habits,

Feeling of Patience,

Physical growth/lost,

Fears,

No tears,

Some special happiness i felt on my "little "sisters face.
my word to my sis 
i am gonna make a will for my artwork
Joy with nieces and in my hometown.
First ever practice execution with nature (at my sisters place)
News about my commercial work which is finally going to release in Marathi movie called "Athang" <  in upcoming year.

and the whole Me.......
who thinks constantly and as much as with the sense of intuitive experiences i feel about the life & the real process and there complications .(avoiding / neglecting all others personal interest)
honestly now i avoid thinking much because none of anyone's personal opinions i keep in mind ......specially for my creative JOURNEY.


MY every years ultimate struggle is just to find sufficient space to make money with / without my own creative practice .
i have no balance otherwise,
because......
An artist's career always begins tomorrow. 
James Whistler





Dec 30, 2015

जितक्या वेळा मी कलेचा सहजतेने ............... ३०/१२/२०१५

जितक्या वेळा मी कलेचा सहजतेने विचार करून पूर्ण विचारातच पूर्ण झालेले जाणीव करतो 
.तितकाच त्याच्या प्रात्यक्षिकाचा माझा (न होणारा) प्रयत्न गुंतागुंतीचा जाणवू लागतो .
हे कदाचित विचाराने प्रगल्भ आणि कृतीने शुन्य असे काहीसे निष्क्रिय भासू लागते . आणि सहजतेचा मग मी दुसरा पर्यायाने सोपा परंतु कृतीने आणि त्याच्या
विकसित करता येणाऱ्या शक्यतांचा असा न संपणारा मार्ग निवडतो.
सुरु करतो
आणि पूर्ण होणे आता ह्या होण्यातच माझा असा सहभाग जवळजवळ निघून जातो.
कलेतून काही सांगणे , दाखवणे, व्यक्त करणे ह्यापेक्षा किंवा ह्याव्यतिरिक्त तिथे ती असणे माझ्यासाठी महत्वाचे होऊन जाते मला म्हणून .
सहजप्रेरणा हा माझ्यासाठी माझ्या स्वतःचा म्हणून कलेच्या जाणीवे पासून ते व्यक्त होण्यापर्यंत  एकमेव असा महत्वाचा किंबहुना माझ्या सोबत  संपूर्ण वातावरणाची जाणीव स्वतः मध्ये तेवत ठेवण्याचा एकप्रकारे प्रयोगच असतो .
आणि ह्या सर्व प्रयोगांत मी बराच वेळा बहुतान्व्शी अपूर्णच राहतो .
आणि इतके समजत गेले कि ,
अपूर्ण ता  हे काही पूर्ण होण्यासाठी लागणारा एक विस्तार नाही .
पूर्णता हि एका प्रक्रियेचा 
अपूर्ण राहण्या  इतकाच समज ,
 साध्य असते.
  ३०/१२/२०१५  

 

Dec 10, 2015

"Teasing Nature " outdoor instant reactions with creative understanding of disciplined mind







I just spent lovely days at my sisters Home allocated in Kudal (pawashi) and her home is completely surrounded by raw nature

Every morning front of the door she have a very wildly bloomed hibiscus tree plant. in village these trees have so much importance in their daily routine the day starts with collected flowers for the worship of Ganesha (Elephant God).
Afternoon I sat at the door-stairs to relaxed after routine lunch.
There were many flowers naturally fallen on the muddy dried clay ground. on the ocherish ground  those hibiscus red was stricken my attention. and I started to explored there possibilities.
I felt these petals were teasing me and, easily I got an idea of face and i named "teasing nature " with the other attachments from nature like wood (its broken Indian roti (bread) maker wooden sphere) and dried leaves of random flowers plant and stone after  i started to arranged 
all those elements I found. and I made this and as much as I was involved with work I equally played I came to conclusion about the nature don't have one specific face so, I took out all those leaves and stone created eyes and nose and decided to keep only teasing tongue on the plate.



Teasing Nature





the other attachments from nature like wood (its broken Indian roti (bread) maker wooden sphere) and dried leaves of random flowers plant and stone after  i started to arranged 
all those elements I found. and I made this and as much as I was involved with work I equally played I came to conclusion about the nature don't have one specific face so, I took out all those leaves and stone created eyes and nose and decided to keep only teasing tongue on the plate





the other attachments from nature like wood (its broken Indian roti (bread) maker wooden sphere) and dried leaves of random flowers plant and stone after  i started to arranged 
all those elements I found. and I made this and as much as I was involved with work I equally played I came to conclusion about the nature don't have one specific face so, I took out all those leaves and stone created eyes and nose and decided to keep only teasing tongue on the plate.