कधी कधी प्रकर्षाने वाटत आता barter system पुन्हा कशीतरी सुरु व्हावी
लोकशाही ,भांडवलशाही फ़क़्त ह्या कॉमापुर्तेच वेगळे असेतर ते वेगळे कधी होण्याची शक्यताच कमी जोपर्यंत पैसा असणार . कदाचित योग्य होईल अस म्हटलं तर ते एकमेकांचा हात हातात घेउन राहिलेल्या हाताने मूल्यांच्या ,मुद्यांच्या वादांचे भांडवल आपल्यापुढे करतच राहणार
थोडासा श्वास इथून ,थोडासा तिथुन.
थोडा संघर्ष इथून,थोडा,तिथुन.
थोडी करमणूक इथून,थोडी तिथुन.
थोडी फसवणूक इथून,थोडी तिथुन.
थोड स्वतःच झीझण इथून,थोड तिथून .
मरण मात्र आपल स्वतःच
त्यातून इतरांना
इंटरेस्ट मिळण्याची शक्यताच कमी
लोकशाही भांडवलशाही
यांचा एक एक हात जो
एका हातात आहे .
No comments:
Post a Comment