"भारतीय संस्कृती " ह्या जाणिवेमागे खपल्या चढवून वागणारे फेसबुक लाईक मध्ये अडकून आणि गुंतवून ठेवलेले , बसलेले अडथळे इतके खोलवर समाजात पसरले आहेत .
कि साधे ऍप्रिसिएशन म्हणूनही
गानसरस्वती किशोरी आमोणकर
ह्यांच्या
"हयातीत "
"हि आपली भारतीय संस्कृती"
^^^^^^^^^
ह्या तीव्रतेने
त्यांच्या गायनाची एकही क्लिप माझ्या रनिंग वॉल वर नाही .
थोडी निसटती आठवण ओळख - कधीतरी मयुरेश नामक मित्राकडून झाली असावी पण ,इतकी कि खरंतर तिला अंतर आहे जाणीव म्हणून शब्दात रूपांतर करण्यास पण ,
असो .. पण त्याच्या आवाजात त्याला सुरांचा गंध असल्याचे आपण ऐकू शकतो.
त्याही अगोदर थोटकी माहिती वर्तमानपत्र , नेट अशा माध्यमांमधून झाली असल्याची जाणीव आहे .. कदाचित तो क्षण टिपायला मीच कमी पडलो असेनही .........
पं . कुमार गंधर्व , पं . भीमसेन जोशी काहीप्रमाणात ऐकले , माहितीपटातून पाहिलेही . पण , जेव्हा मला कुठेतरी समजले कि त्या संपूर्ण गायनाची प्रक्रिया हि कुठेतरी त्या दिग्गजांच्याहि स्वतःच्या शोधाची एक समांतररित्या रित्या एक सुरु असलेली प्रक्रीया असते . तेव्हा, त्यामधील त्यांनी गाठलेल्या दिव्यत्वाची जाणीव जाणवूनही माझा ^ त्यांच्यामधील रुचि थोडी कमी झाली .
कारण ,माझा स्वतःचा व्यावहारिक गुंतागुंत आणि स्वतःचा चित्रप्रवास, प्रक्रिया ह्यामधील स्वत्व शोधणे आणि त्यामधील झगडा
^ हा वर्तमानाशी होता आणि आहे .
असेलही .
असच ,आणखी एक म्हणजे श्री . विजय तेंडुलकर हे मराठीमधील मानांकित लेखक . त्यांची काही पुस्तके, नाटकं ^ वाचण्यापाह्ण्यात हि आली पण ,
त्यांचे " कन्यादान " नाटक पाहिले
खूप खूप आवडले .......
श्री तेंडुलकर हे एक व्यक्ती म्हणून त्यांचे लेखनामागील स्वत्व जेव्हा मला जाणवले किंबहुना त्यांच्या कदाचित पाहिलेल्या मुलाखतीमधून जाणण्यासही मिळाले.
^ तेव्हा
त्यांना न भेटता आल्याची हळहळ सतत मनात असते .
असेलही .
ते स्वत्व माझ्या बौद्धिक कौशल्या चा परीघ विस्तारत
जाणिवेत आहे .
" त्यांचे सामान्य माणूस आणि त्याच्या दैनंदिन आयुश्यानुभवातून नैसर्गिकपणे भिनणारी संघर्षवृत्ती ह्याबद्दल असणारी आणि ती समजून घेऊन त्याबद्दल येणारी आत्मीयता आणि आदरयुक्त जाणीव "
हि त्यांच्या ग्रीक राजासदृश्य गोऱ्या चेहऱ्यावरील भारदस्त दरारा
पण ,
त्यास तोंड न देता त्यांच्या त्यांना वाटणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल असणाऱ्या जाणिवेस
माझ्या मनात रुजवत
^ वर
न भेटता येण्याची खंत सतत
^ वर राहते .
सद्य परिस्थितीत .
भारतीय / पाश्चात्य असा वरवर फरक करू पाहणारे तोंडघाशी पडतील .
जेव्हा त्या भेदाच्या असलेल्या मुळ शोधण्याची गरज पडेल .
मला हा भेद आवडत नाही .
भेदाने वरचढ चढू पाहणारी संस्कृती
आपली संस्कृती
एकाधिकारी आहे का?
कि सर्वाना सामावून विनम्रतेने व्यापून समृद्ध करणारी आहे?
ह्यात वाद/ प्रतिवाद
प्रतिवाद
मला काही त्यात रुची नाही
.
किंबहुना माझा तो मार्ग नाही.
माझा प्रेरणास्थान
"निसर्ग "
आणि
ह्या तत्त्वावरच
भारतीय संस्कृतीची मुळे खणून काढण्यापेक्षा पाश्चात्यांनी येऊन रोवलेले हे virtual रोप त्याची मुळे खोलवर आधीच गेलेली असताना ते तोडण्यापेक्षा त्यातूनच हे आव्हान आता माझ्यासोबत आहे .
ह्याचा कोण आनंद :)
गानसरस्वती किशोरी आमोणकर
ह्यांच्या गायकीतला भाव
हाच
"भारतीय संस्कृती"
कारण ,
आता माझ्या आईची सोबत .
शेवटी राहून जे टिकेल
ह्या मानसिकतेपेक्षा ..
जे वटवृक्षासारखं वाढतं राहिलं
ज्याच्या छायेखाली आपण वाढत आहोत .
त्याचे एक पान साधं शेअर करता येत नाहि आलंय मला
अभिमानाने ?
ह्याची खंत मला जशी इतरांबाबतीत होते तशी आपल्याबाबतीत आता न होत असल्याची
थोडी खंत ..
लॉरी बेकर , टागोर , क्ली , फ्रिदा , andy goldsworthy , jane goodall , अजिंठा / एलोरा , भारतीय लघुचित्र आणि ते कलाकार , सत्यजित रे , मूळ वारली ,
इ.. असे बरंच आवडतात मला
का?
आणि,नवीन आलेला प्रत्येक movie सुद्धा पाहायचा असतो मला .
अर्ध्यावर सोडून जावा लागला तरीही ..
तार्कोव्हस्की , बर्गमन , चॅप्लिन , स्पीलबर्ग
सर्व सर्व आवडतात .
कारण, माझ्या जाणिवेत ह्यांनी त्यांच्या संस्कृतीशी नाळ जोडणारी आणि त्यातील बारकावे दाखवत राहून केलेली कामे हि त्या सर्वात राहूनच केली असतात ,
त्याच्या लेव्हल्स वेगळ्या असतीलही पण,
त्यात कुठल्याही संस्कृतीला कमी लेखून ते काम नसते .
कारण , त्यांत एक साम्य नक्कीच आहे.
" भाव "
गानसरस्वती किशोरी आमोणकर
ह्यां
कुठेतरी एक ग्लोबल परिणाम दाखवून देण्याचे सामर्थ्य
आता मला गानसरस्वती किशोरी आमोणकर ह्यांच्याबद्दल मुखत्वे इतकी तीव्रता का जाणवली ?
कारण, माझ्या चित्रकलेतील भावविश्वाशी
गानसरस्वती किशोरी आमोणकरांचा .
विचारध्यास
ह्याशी
भावबंध जुळण्याचे
vibrations .
हा भारतीय संस्कृती चा
गाभा
ह्याबाबतीत
(पॉली ) च्या चित्रांसंबंधीत माझ्या जाणिवेत महत्वाची बाब आणि त्याबद्दलची ओढ
ह्याचा एक तीव्र धागा म्हणजे ,
che...............
चित्र हे त्याने निश्चित केलेल्या पृष्ठभागावर स्वतःचे अबाधित्व स्वतः प्रवास करीत असते . आणि त्या प्रक्रियेतील
त्याचा नम्रपणा , त्याची ऋजुता स्पष्ट करीत घडवणारा/ घडणारा
ठामपणा .
सुरांमागील भाव , सुरांचा भाव , भावार्थ
जे शब्दांमधील किंवा शब्दसही व्यापून उरतील अशा गाभ्यापर्यंत जाणारा आणि
प्रेक्षकांस त्या व्याप्ती चा अनुभव करून देण्याचा आत्मविश्वास .
त्याची विविध आवर्तने , पोत ह्यांद्वारे उमलणारा भावार्थ .
जो तितकाच विनम्र
पण ,
ठाम
पुन्हा
गानसरस्वती किशोरी आमोणकर
हा इशाराही द्यायला विसरत नाहीत .
जो मला स्पर्श करून गेला
किंबहुना ह्यास सहज सिद्ध हि करता येऊ शकेल गरज पडल्यास
तो म्हणजे पाश्चात्य लोकांच्या चिवटपणाबद्दल
जर का त्यांना ह्या स्वरभाषेतला हा गाभा समजला तर तो मिळवल्याशिवाय
( जो कोणाची खरतर मालकी नाही)
ते राहणार नाहीत . ( हे आव्हानच माझ्याकरिता आता खरतर नाहीच )
हे असे . . . . . . . . . .
उद्या माझ्या ताईचा वाढदिवस खरतर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे
(त्यांना मनापासून वंदन )
हा एकमेव वाढदिवस माझ्या लक्षात असतो .
अजरामरच आहे माझी ताई
असो ......... :)
(वाचल्यास काही चूक असेल तर क्षमस्व )