My Works are representational record of my thoughts,an expression of my observations. My goal is to express the beauty of feelings that I feel through my intuitiveness and to make a visual note of it in order to share it with all. The qualities of my works are variety of the subjects and the treatments.My method varies as per the requirement of the content. My works are a part of my philosophical and emotional exploration affected deeply by my day to day life.....
May 7, 2013
May 6, 2013
Apr 9, 2013
Apr 6, 2013
Apr 5, 2013
५ एप्रिल २०१३
समुद्राच्या लाटाच तर ठरवतात किनारा
लाटांना पाठबळ मिळतं ते वाऱ्याच
मऊ ओल्या वाळुत रूतणाऱ्या पायांनी
स्वतःला सांभाळत राहायचं.
समर्पण असं कराव तरी कसं ?
पुन्हा हि लाट शेवटी
मलाही किनारा च बनवणार
पण ठरवलं
जायचं तर ह्या समुद्रातच
हेनरीने जशी पळवणारी सातवी लाट ओळखली.
तशीच मलाही एखादी लाट शोधावी लागेल
आपल्यात सामावून घेणारी .
Apr 4, 2013
Mar 28, 2013
Mar 20, 2013
Mar 16, 2013
चिड
काय झाल का बलात्काराच मनोरंजन करून?
झाली ती खपली उघडून ?
नावांशी खेळत बसतात साले ,
टीवी आणि वेफर
रस्ता आणि रमणीय स्थळे
आकर्षित करणारे सोन्याचे भाव
आणि सकाळचा विनोद ठरणारे
कुपोषित मृत्यू,
फासावर चढलेला शेतकरी
आणि दौर्यावर आलेला अधिकारी
सारखाच ह्यांना
वाटत ज्यांनी गुलामी बघितली
त्यांच्यातच स्वाभिमान असेल शिल्लक
थडग्यात
आता संवेदनाच संपल्या पाहिजेत
शापित चवीच्या .
रणांगण पुन्हा झाल पाहिजे .
ह्यांच्याशीच
१६ मार्च २०१३
ती सोडून गेली तेव्हा .
नाही पाऊस पडत होता.
नाही काही संपायला आलेलं ,
आतून प्रचंड रागावलेलो त्या तुटल्या क्षणाला मानायला
श्वास तिचे संपलेले .
उद्ध्वस्त मी.
तिला मी अजूनही सोडू नाही शकलो .
आणि तिला वाटलं तिने स्वतःला मुक्त केल.
Mar 13, 2013
Mar 12, 2013
१२ मार्च २०१३
तिने त्याला थोडस रागावूनच विचारलं
तू इतका तीरसट पणे का वागतोस माझ्याशी ?
भेटल्यापासून नावही नाही घेतलस माझं तू .
का असं ?
त्याने तिच्याकडे पाहिलं
आणि क्षणाने तिला विचारलं
तू ह्या वाळवंटात अत्तर लावून आली आहेसं ?
तिला पुन्हा थोड अवघडल्यासारखं झालं
तिच्या प्रश्नार्थक नजरेकडे त्याने लक्ष न देता आपल बोलण चालू ठेवलं .
लहानपणापासून मला इतकच समजल आहे कि
माझ्यामध्ये दडलेल्या मी ने मला बरीच नाव दिली .
आणि त्या सर्व नावांनी मला स्वतःची एक ओळख दिली .
ती मला माझ्या आईवडिलांनी दिलेल्या नावापेक्षा नेहमीच उपयोगी पडत गेली .
मी आरशात उभ राहून बराच वेळ माझ्या दिलेल्या नावांशी खेळत बसायचो आणि स्वतःला पाहायचो हि तसं,
पण आई वडिलांनी दिलेले नावाची मला कधीच मदत नाही व्हायची.
फ़क़्त वर्तमानपत्रात भविष्य बघण्याखेरीज .
आणि जेव्हा मी ह्या डॉक्टरी पेशात येवून समाजसेवेत दाखल झालो .
तेव्हा माझ्या हातून बरा होणारा प्रत्येक जण मला जो शुभेच्छा द्यायचा .
त्याच त्याचं एक नाव देवून जायचा, त्यावेळेस मिळणार समाधान अनुभवण्यासाठी माझ्याकडे काही शिल्लकच नसायचं
कारण त्यांनी जे सोसल ते सोसण्याच धैर्य असण हेच मुळी आपल्या कल्पनातीत गोष्ट आहे .
ती त्याच्याकडे पाह्त असते तिचे डोळे थोडेसे ओले पाहून तो हि मूळ मुद्यावर येतो.
आणि तिला सांगतो .
ह्या माझ्या कामा दरम्यान माझे बरेच मित्र झालेत अगदी जवळचे असे वाटणारे ,
पण आता ते सर्व गेले आणि माझ्याकडे फ़क़्त त्यांची नावेच राहिली आहेत.आणि ती नावे मला सतत आठवणीत ठेवावी लागतात.
तुलाही माहित आहे कि तू उद्या जाणार .आणि मला माझ काम तर पुढे नेल्याशिवाय दुसरा कुठला हि रस्ता दिसत नाही .
ते मला नेलेच पाहिजे .

Mar 11, 2013
Mar 10, 2013
रविवार १०मार्च २०१३
आशीर्वादांशी आता वाद होतात मनात
हे असतात तरी कोठे ?
पाठीवर,डोक्यावर कि कंपनांत.
हे असतात तरी कोठे ?
पाठीवर,डोक्यावर कि कंपनांत.
आशीर्वादांशी हा शीर वाद
सुरु राहतो .
मनात .
एकाकी अवेळी .
...................
सुरु राहतो .
मनात .
एकाकी अवेळी .
...................
ग्रहणात संपले दिव्यातले तेल
आणि पाहत बसलो
अंधाराच्या कडे वरील प्रकाश .
शोधत राहिलो मी
वेदांतील विश्वास माझ्यात
.............................
वेद न जाणता ही
पक्षी मात्र ,
उडत होते.
आत्मविश्वासाने .........
आशीर्वादांशिवाय
इतकं साधं .
................................
पक्षी मात्र होऊन जातो .
वेदांशिवायही
आणि माणूस मात्र आशीर्वाद
घेवूनही माणूस होण्यासाठी
झगडत असलेला
.... अभिजित २०१३
आणि माणूस मात्र आशीर्वाद
घेवूनही माणूस होण्यासाठी
झगडत असलेला
.... अभिजित २०१३
Mar 5, 2013
कन्फेशन (अपराध स्वीकृति )
ते येतात ...................... ते जातात
मध्ये बसतात काहीतरी विचार करत ,
शांत असतो मी त्यावेळी ,
वाटलं तर चहा विचारतो ,
पाणी मात्र नेहमी पितात .
स्वतः हून
मध्ये बसतात काहीतरी विचार करत ,
शांत असतो मी त्यावेळी ,
वाटलं तर चहा विचारतो ,
पाणी मात्र नेहमी पितात .
स्वतः हून
...............
...............
...............
...............
...............
त्यांना कळत असेल
मी जिवंत आहे
मला कळत ते
इतकच.
आता कधी कधी माझ्याही तोंडून येतेच .
आयुष्याबद्दल खंत करत बसलेल्यांना
जिवंत आहेस ना म्म बस
...............
...............
...............
...............
त्यांना कळत असेल
मी जिवंत आहे
मला कळत ते
इतकच.
आता कधी कधी माझ्याही तोंडून येतेच .
आयुष्याबद्दल खंत करत बसलेल्यांना
जिवंत आहेस ना म्म बस
------------ ५ मार्च २०१३
Mar 4, 2013
४ मार्च २०१३ (३)
अचानक भाषांतर होऊ लागलं
आणि भावनांशी गुंता वाढत चालला ,
शब्दाचे अवघडलेपण ,त्यांच्या मर्यादा वाढू लागल्या
वाटलं अशीच एक ओळ रिकामी सोडली तर ,
समजतील का लोक ?
मला काय म्हणायचं आहे ते .
बसतील का त्या रिकाम्या ओळीच्या वेळी
दिलासेचा हात खांद्यावर ठेवून मित्रासारखा
कोणी आलिंगन देईल का प्रियकर समजून
उभे राहतील का शांत शेजाऱ्या सारखे
आपल्या घरातीलच माणूस गेल्यासारखे
चालेल एखाद्या शिकारी सारखे सुद्धा
आपला सावज टिपायला बसलेले .
..................................................... अभिजित ४ मार्च २०१३

४ मार्च २०१३ (२)
वाटलं फिरायला जाऊ या रस्त्यावर जरा मोकळं वाटेल,
तर दिसला
उड्डाणपुला वरील होर्डिंग्ज च्या मागे एक अस्ताव्यस्त झालेला माणूस
काही वेश्या आणि त्यांच्या आजूबाजूला घुटमळणारी गिऱ्हाईक
संध्याकाळचा अख्खा लोंढा होताच घराकडे परतणारा ,
चूकच केली बाहेर जाऊन ,
खरतर खरतर स्वतःमध्येच जायला पाहिजे होत.
कुठेतरी शांत बसून ,
आपल्यासारखीच माणसच शोधत बसतो आपण ,
रस्त्यांवर
मागे एकदा
चाप्लीन पाहून हस हस हसलो ,
आणि एकदा वाचलं त्याच आत्मचरित्र
तर बघितलं त्याच दुःख सापडत का ते चित्रपटात
छे हरलो साफ ,
अशी का माणसं नाहीत हि रस्त्यावरची होत माझ्यासाठी
...............................................................
माझं हसू हि मीच शोधाव आणि लोकांचं हि .
माझं दुःख फ़क़्त मलाच दिसावं आणि लोकांचं हि
४ मार्च २०१३
खूप अस्ताव्यस्तपणा आहे ...
माणसाच्या मनाला काही अर्थ आहे का?
माहिती असूनही प्रवास मरणाकडे जात असताना
माणसाची ओढ प्रत्येक क्षण
जगण्याकडे आकर्षित झालेला दिसते .
माणसे माणसांशी वागतात ,बोलतात,
त्यांचे संपर्क कधी वाढतात तर कधी ते स्थिर राहतात आहेत तिथे .
कधी असून नसल्यागत ..
जाणिवांच्या संपर्कात एक नात तयार होऊ पाहत
कसंही लांबच ,दूरच, वाढउ असंहि वाटणारं किंवा आहे त्या ठिकाणीच स्थिर रहाव अस वाटणार,
ताणली ही जातात काही त्यात अवास्तव पण
ते तडे ही एका कच्च्या रस्त्यांसारखे आपल्या वाटेचे असतात .
ज्यावरून आपण इथपर्यंत आलो असतो .
फ़क़्त त्यावरून आता पुन्हा चालायचं नसत इतकच .
तरीही एका आर्त हाकेसाठी मनाचा एक कोपरा उघडा असतोच
आणि त्या कोपऱ्यात अस वाटत आपले संपूर्ण अस्तित्व आहे.
हे दिवसाचे चोवीस तास ,प्रहर सर्व आडव येत ,
असं वाटत अक्ख आयुष्य सलग का नसत?
हे दिवस ,रात्र मनावर होणाऱ्या परिणामांना नाचवत असतात .
का?
ते प्रभुत्व करत असतात आपल्यावर .
माहित नाही कधी पिऊन टाकलं विष ,
का माहित नव्हत तिला आयुष्य फ़क़्त मेल्यावरच संपत नसत ,
का माहित नव्हत तिला ते शरीरा बाहेरही भिनत जात
आपल्याच्या आयुष्यातही
का माहित नव्हत तिला सुगंध जरी असला तरी
सुगंधाही कोणाची गरज असू शकते .
कि तिला सुटकाच करायची होती स्वतःची ,
कि तिच्या नजरेला ती तडा हि दरीत रुपांतर झाली .
कि वाटत होत तिला ती दरी ओलांडूनही
ती सामना नाही करू शकणार नजरेचा .
का माहित नव्हत तिला ती नजरेआड झाल्यावर ,
तिथे तिला शोधत ताट कळणारा तिथून
नंतर कधीच ,
मागे फिरू शकणार नाही ती खंत घेऊन .
............................................................
अभिजित ४ मार्च २०१३

Mar 2, 2013
Mar 1, 2013
१ मार्च २०१३
बऱ्याच दिवसांनी कि वर्षांनी काहीच आठवत नाही शेवटच वाचन कधी केलं कदाचित परवाच केलही असेल .पण आठवणीत नाही ,
काय फरक पडतो त्यांनी ?
स्वतःच आणि इतरांचं अस्तित्व मान्य करण्यासाठी . आपल्या स्वतःला पूर्ण कल्पना असते आपल्यात असणाऱ्या कमकुवतपणा ची आणि आपण पूर्णपणे एक पाऊल अंधारात असतो आपल्या सामर्थ्यपणापासून .तो नेहमी चकित करणारा असतो .अशी कुठली गोष्ट अनुभवास आली कि आपल्यात पुढची जाणीव निर्माण होते.आणि अशी गोष्टच वारंवार होत नसल्याने त्याचं आकर्षण आपल्यात निर्माण होत असत आणि त्यामुळे आपण समृद्ध होता होता आपण अधोगत हि होत असतो , फक्त तो आपल्या इगोमध्ये परावर्तीत होत असतो.
थोडं हलवणार ,हेलावणार आणि वर सांगितलं न तस आपल्यातल अपराधत्व आपल्या समोर ठेवणार . मनाच्या लैंगिक पणाला निरोध लावण्याचं काम हे प्रभावी लेखनच करू शकत (ह्यामध्ये कुठेही इतर गोष्टीचं सामर्थ्य कमी करण्याच कुठलही कारण नाही फक्त इथे तो लिहिला नाही कारण लेखन ह्या विषयावर इथे लिहायचं आहे इतकंच म्हणूनच )
आजूबाजूच्या वास्तव घटना आणि त्यासोबत त्याच्याशी मिळतेजुळते संदर्भ असणार्या भूतकाळातील परिस्थितीच एखाद पुस्तक वाचताना ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवत जातात . फरक कुठे करता येत नाही आणि
प्राणी हा मानवाचा जिव्हाळ्याचा विषय असतो . प्राण्यात माणुसकी सापडली नाही तरी त्यावर माणसाने जनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही ......
त्यामुळे एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून विचार करण्यापेक्षा माणूस म्हणून विचार करण्याने त्या दोन्ही नात्यात जितका मानवीपणा कसा येऊ शकतो ह्याचाच विचार होतोय .........
पुरुष स्त्री ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी आणि एकमेकांव्यतिरिक्त काहीतरी संबंध असेल किंबहुना आहे आणि ते समजण्यात कुठेतरी कमी पडत असू त्यामुळेच तर हा अपराधी पणा आहे ना ?
आणि ह्या गोष्टींचा सर्वात नाजूक क्षण सापडत असेल तर तो कदाचित त्यांच्या स्पर्श सहवासात........
विश्वास हि केवढी मोठी गोष्ट असू शकते ह्याच जाणीव त्यावेळी होत असेल .
माणूस जन्मतःच छोट्यामोठ्या ध्येयात गुंतला जातो,आणि त्याच्या गरजा ह्या मानसिक होऊन जातात .आणि ज्यावेळी मन आणि बुद्धीच्या निर्णय क्षमतेचा क्रम बदलतो तेव्हा गोंधळाचा क्षण निर्माण होतो .
हा क्रम माणसाच्या नात्यात सतत कुठल्याना कुठल्या क्रमाने गरजेचा असतो आणि तो असतोच क्रम बदलला कि माणूस बदलतो .
तो मान्य न करण्याचा अपराधीपणाही मग माझ व्यक्तिमत्व ठरवत जातं जे फ़क़्त माझं मलाच माहिती असत .
१ मार्च २०१३
धन्यवाद तस्लिमा नसरीन तुमच्या "उधाण वारा" ह्या पुस्तकाबद्दल

Feb 25, 2013
कल जब घर बेचने का ख्याल आया ।
तो सोचा यादों से पहले बात कर लूँ |
कुछ मान गयी ।
कुछ कह न पायी ।
कुछ दिवार पर ही रहना चाहती है ।
और
कुछ खुश थी मेरे जाने पर ।
.......................................
जब घर खाली करने का समय आया तब,
आहिस्ते आहिस्ते उस सामान का बोझ बढता चला गया
लगा और कुछ यादे अगर तैयार होजाए तो पुछलू ।
वो तैयार तो नहि लगी पर
फिरभी मैने दिवार के उखडे हुए रंग का तुकडा अपने साथ ले लिया
और
कुछ चित्र दिवार से फिर टांग दि ।
कुछ पौधे भी बरामदे मे रख दिये ।
और एक घडी जिसने सारा बोझ उतार दिया ।
जिस्ने सारा वकत समा रखा था।
अभिजीत 24/02/2013
Feb 21, 2013
Feb 9, 2013
Feb 7, 2013
..................
भूक लागण आता सवयीच झालंय
नाही मिळाल कि
शरीर मात्र खायला सुरवात करत स्वत :हून स्व:तहाला
नैसर्गिक रित्या अगदी व्यवस्थित
अभिजित ७/२/१३
खरतर तारीख काही खरी नाही .
तारीख शेवट दर्शवते.
महत्व तर त्या दिवसच
जेव्हा कळेल
सुरवात कधी झाली ..
नाही मिळाल कि
शरीर मात्र खायला सुरवात करत स्वत :हून स्व:तहाला
नैसर्गिक रित्या अगदी व्यवस्थित
अभिजित ७/२/१३
खरतर तारीख काही खरी नाही .
तारीख शेवट दर्शवते.
महत्व तर त्या दिवसच
जेव्हा कळेल
सुरवात कधी झाली ..
Jan 21, 2013
बर्याच गोष्टी राहून गेल्या
मी काल बऱ्याच महत्वाच्या गोष्टी बोलावयच्या विचारायच्याच विसरलो .
बरेच प्रश्न ही राहिले
बलात्कार होत आहेत ना ...
कारण
बलात्कारच आता तोंडानी करायचा ठरवलाय .
त्यातलेच प्रश्न होते
भास आहोत का आपण ?
सध्याच्या आपल्या चित्रपटांमध्ये संवादच मला का सापडत नाही ?
का काही चित्र संवादामधून जास्त स्पष्ट होतात?
का कधी कधी व्यक्त होण्याची प्रक्रियाच हि खूप लांबवते आपल्यास व्यक्त होण्यास ?
का मूर ची स्कल्प्चरस पुन्हयांदा आनद देवून गेली ,
अतिश ने सुचवलेला दनिएल लुइस मला देर विल बी ब्लड मध्ये भन्नाट आवडला .

21/01/2013
Simple things stop me to create or react
sometimes cause just they are simple as they are .and that time acceptance
and patience is the only choice for me .
Jan 19, 2013
Jan 18, 2013
एक चूक
संध्याकाळ ...
उडणाऱ्या पक्ष्यांची रांग .
त्यातल्या प्रत्येकाची एक स्वतःची अशी आर्त हाक .
संध्याहाक
असं वाटते आता
त्या घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांना
आकाशाने गिळून तर नाही टाकलं .
हा माझाच मूर्खपणा
त्यांच्या त्या हाकेचा पाठलाग करणं
कधी जमलंचं नाही मला .
आर्ततेची ती हाक आकाशात विरून कधी जायची ,
कळायचंच नाही ..
खरतरं लक्षच निघून जायचे .
माणसांच्या थव्यात .
मी आधीच हरवलेलो
आधी हरवलेलेच दिसणार ......
अभिजित १८/०१/२०१३

भास
भास हा माणसाच्या समोर असणार एक सत्यच
सर्व पाहत असतात ते सत्य जाणण्यासाठी
तरी सर्वांचे निराळे अनुभव .
अभिजित १८/०१/२०१३
सर्व पाहत असतात ते सत्य जाणण्यासाठी
तरी सर्वांचे निराळे अनुभव .
अभिजित १८/०१/२०१३
Jan 17, 2013
Jan 13, 2013
मी भटकतो......
मी भटकतो .
शोधण्यासाठी नाही,
चकित होण्यासाठी.
चकित होतो ,होण्यासाठी नाही,
सामावण्यासाठी .
सामावत ही नाही पूर्ण,
समजण्यासाठी .
तिथपर्यंतच जोवर पाय राहतात समेवर .
मी भटकतो ,
काहीतरी घेवून काहीतरी होवून ,
जोडण्यासाठी .
तुट तेही ,
मनाच्या समाधानासाठी .
क्षणाच्या सोबत बसलेलो असतो ,
झोपलेलो ,
मेलेलोही असतो.
जिवंत आहे कशास हे जाणण्यासाठी ,
हेवा वाटतो
कधीतरी इतरांचा ,
माझ्या मलाच पडलेल्या '
प्रश्नांच्या उत्तरांसाठी.
ठीक आहे ..
मी भटकतो , ते
सापडलही उत्तर .
पण ते जगण्यास पुरेस के नाही ,
हे काळत नाही .
मी भटकतो
एकच खर आनंदी
राहण्यासाठी ..
मी लिहिलेही हे अशाचसाठी ,
काहीतरी ओझं कमी करण्यासाठी
............................................
अभिजित १३ जानेवारी २०१३
Jan 7, 2013
भूक
भूक लागते ,
पण
अन्न कुठेतरी साठवावास
वाटत .
भूक लागते , आणि
अन्न खावंसं हि वाटत नाही .
भूक लागते,
अन्न ,खाल्लं हि जाते ,
भूक शमते ,
विचार
वास्तव विसरून कल्पनेशी
खेळू लागतात ...
अभिजित ७ जानेवारी २०१३
Dec 31, 2012
हर दर्द की पहचान नहीं होती
दर्द न हो तो तनहाई भी बोर हो जाती है
ये सब वो तनहा इंसान है जो चल पड़े
अपने ही दर्द मै अपनों लिए ,
के कुछ पल अगर राहत मिले रास्तो पर तो हम भी
खुशिया लायेंगे
इस धरती पर
......................
.....................
.....................
वो तो सो गयी,
दर्द तो जिंदा है अबतक
दवा के इंतज़ार मै ..
.......................... अभिजित्स 31स्ट 2012
ये सब वो तनहा इंसान है जो चल पड़े
अपने ही दर्द मै अपनों लिए ,
के कुछ पल अगर राहत मिले रास्तो पर तो हम भी
खुशिया लायेंगे
इस धरती पर
......................
.....................
.....................
वो तो सो गयी,
दर्द तो जिंदा है अबतक
दवा के इंतज़ार मै ..
..........................
Dec 29, 2012
Dec 23, 2012
वाळूही जिवंत ठेवते
हातातून वाळू निसटत असते
खरतर समुद्रावर आलेलो असतो .
दूरवरचा अस्त पाहायला ,
पण जवळच्या जाणीवा
ह्या वाळूतच सापडत जातात ,
रंग भिडत जातात पण
वाळूचं निसटण आत कुठेतरी जाणवून देते .
त्या खर्या शब्द,भावनांचे स्पर्श
तासांचे क्षण होतात ह्यातच
आणि
संध्याकाळ हि आठवणीसाठी असते .
हि जाणीव पुन्हा करून देतो ,
अस्ताचा अंधार....
आणि हाच अस्ताचा अंधार
दुसरीकडे कुठेतरी
पहाट करत आहे
हि जाणीव जोपर्यंत असेल ,
तो पर्यंत त्या वाळूचा स्पर्शही .
अभिजित २३ डिसेंबर
Dec 5, 2012
स्वतःला समजून घेताना .
कधी कधी मी बघतो ,वाचतो,शोषतोसुद्धा माझ्या नकळत
नकळत,
अनुभव हे असेच असतात का हा प्रश्न पडतो तेव्हा,
अटी तटीच्या प्रसंगी कस लागतो जेव्हा त्यांचा,
त्या प्रसंगातून बाहेर आल्यावर खरतर सुटल्यावरच
कळत ,
ते सांडले होते आत कुठेतरी एकावर एक कसेतरी..
ओळीने लावायला वेळ हि नाही मिळाला इतके भराभर आले असतील
अभिजित २०१२

Oct 22, 2012
Oct 17, 2012
"सफर "
दो दायरो के बीच का फासला हे ये जिंदगी ।
हमारे अपने अपने होने से रहे ।
भीड बढती ही गयी ।
इन्ही दो दायरो में भी कही अन्गीनात मोड आये ,
आते रहेंगे ।
ये सभी,एहसास हें जिने का,मजा भी हे इन ,
दायरो के बीच फसे रहने का ।
जुलम तो सिर्फ वक़्त करता है ।
उसे दवा भी ,
जिस्म तो वही ठिकाना है ।
जहा वो समाया रहता है ।
...................................
............................
आज वो छुट रही ही राहे,
जिन्हे कदम कदम चाहा ,कूछ नयी समा रही है ,
जुदा तो सब होना है ।
हमसे हमारी परछाई भी ।
.............................. अभिजित २०१२
Oct 12, 2012
आठवणींचे रांजण
मुंबईच्या धावपळीच्या कि धक्काधाक्कीच्या ते माहित नाही दिनांक १६ ओक्टोम्बर ला कसातरी मी एकदाचा पोहोचलो , माझ रिझर्वेषन तिकीट बरोबर वैटींग लिस्ट वर १ वर येवून अडकल्च ... पण पोहोचलो ....
गाडीतून पाय कुडाळ फलाटावर वर पडताच सर्व क्षीण नाहीसा झाला आणि डोळ्यासमोर सर्व काही शांत झाल
...
आता अचानक झालेल्या बदलांचे अनुभव घेणे हे काही जाणीवपूर्वक नसत ,पण ह्या जाणिवांच रुपांतर अखेर
अनुभवताच होत हे हि तितकच खर ,
आता हे अनुभव लिखित स्वरुपात येतात जेव्हा प्रकाशाला जास्त वेळ पाहिल्यावर कस थोडा वेळ डोळ्यांसमोर अंधारी येते .तसा हा परतीचा प्रवास माझ्यासाठी....
मस्तपैकी गणपतीच्या पहिल्याच दिवशी सकाळी कोणाची उठवण्यासाठी हाक येण्या अगोदरच मोर आपल्या कूजनाने मला उठवायचे .मग छानपैकी चहा घेवून बाहेर पायरीवर बसून गडबडीत असणारे फुलपाखरू पाहून आपल्या त्या अवस्थेबद्दल गर्वित व्हायचे ;) मग अचानक लक्ष गेल ते आमच्या माडांच्या झाडाखालून तुरुतुरु पळणार मुंगूस .ते हि माझ्याकडेच बघत होत ..
दुपारी मला त्या मुंगुसाच्या सकाळी पाळण्याचे कारण हि भेटले जेव्हा मी आमच्या घराकडे येणाऱ्या छोट्या वाटेवर च अगदी मी खालून आता उचलीन कि काय इतक्या अंतरावर असणारा एक साप पहिला मस्तपैकी वादळाने आडव्या केलेल्या गवतावर पहुडला होता तो कुठे काही गडबड नाही सर्व काही निसर्गात .
एकट्याचा माझा आवडता उद्योग तो म्हणजे धरणाच्या पायऱ्यावर बसून 'फिश पेडीक्युर" ते हि फक्त काही चुरमुरे किंवा शेव टाकताच ...:)
आमची सर्व छोटी मंडळी घरासमोरच बांधलेल्या मंदिरात दर सोमवारी शंकराची आरती करतात मी तिथे जातो कारण मोबाईल फोने ची रेंज हे तिथे मिळते म्हणूनही . :)
पण अचानक दुसऱ्या दिवसापासून कोकणाने आपला खरा रुद्र अवतार दाखवायला सुरु केला तो नंतर अगदी गणपती च्या शेवटच्या दिवसात दिवसभर असणारा सूर्याचा लक्ख प्रकाश पण दुप्पार झाली कि जो की ढगांचा "गडगडाट "सुरु व्हायचा ...घर अगदी मुळा पासून हादरवून टाकणारे आवाज ते त्यात मी वेड्यासारखा एकदा दारावर बसून आमच्या हलणाऱ्या माडां कडे पाहत बसलो होतो आणि विचार करत होतो कि जर ते माड घरावर पडले तर आपण घरच्यान्सकट कसा पळ काढायचा इतक्यातच ती वीजजजजज आमच्या अंगणात असणाऱ्या लोखन्डीने पारई ने आपल्यावर घेतली आणि त्याच वेळेला माझी ताई जी मला सावध करायला आलेली तिने त्या विजेमुळे मी टुणकन मारलेली उडी पाहून हसायलाच लागली आणि त्यानंतर मीही स्वतःच्या जिवंत असण्यावर ..

Sep 4, 2012
"डिप्रेशन "
आता काही असले तरी ,ते असल्याविना जे आहे ते हि महत्वाचे .
जेव्हा सर्व पणाला लागते तेव्हा एका क्षणाला ते संपलेले हि परके वाटू लागते .
निराश मनाच्या पोकळीला कुठलाही देह नसल्याचे जाणवते तेव्हा त्यावेळेस राग , लोभ, पैसा ,स्वप्नांपासून हरवला जातो मी ,
हवसे असे काही नाही राहत ,
डोळे मिटून येणारी झोपहि कुठेतरी हरवून सोडून देते .
आपले सर्वच आपले नसते हे जेव्हा प्रकर्षाने जाणवते तेव्हा असलेल्यांपासून हि लांब जातो ,
मग एकच प्रश्न उरतो ,
मी आहे तरी कशाला इथे ? --------- अभिजित २०१२

Jun 27, 2012
पाळीव माणसाने लिहिलेली कविता .
----------------------------------------
----------------------------------
-------------------------
------------------------------
--------------------
------------
------------
------------------------------
-----------------------------
-------------------------
-----------------------
-------------------------
----------
--------------------
-------
----------------
-------------
-----------आदेशावरून .
-------
पाळीव माणूस
Jun 18, 2012
उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा
उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा बघायला मिळणे हा एक आनंद असतो ,
तसाच आनंद अगोदर एकटा पक्षी दिसल्यावरही व्हायचा ,
पण .
एके दिवशी जेव्हा जाणवलं कि ,
जर तो पक्षी आपले घरटे शोधत असेल तर , जर तो आपले साथीदार शोधत असेल तर ...
तेव्हापासून जेव्हा जेव्हा असा पक्षी दिसतो तेव्हा आपणही त्यासोबत असाव असे वाटते .
पण,
उडण्याच स्वातंत्र्य त्याच्या इतके आपल्याकडे नसते आणि त्याच्या इतका उडण्यासाठी लागणारा एकटे पणाही ---------18 जून 2012 अभिजित

Jun 11, 2012
Jun 10, 2012
May 16, 2012
May 9, 2012
Jan 21, 2012
माझे प्रत्येक चित्र
माझे प्रत्येक चित्र खुल असावं,
त्याच स्वतःची एक योग्य जागा असावी,
न बदलणारी ,
ह्यापलीकडे एका चित्राला तरी काय हवं असतं?
स्वप्नांन्च्या राज्यात जाण्यासाठी लागणारी जादुई चटई होण्याअगोदरच,
आईच्या मृत्युनंतर माझे सर्व अश्रू स्वतःचे मानणारी,मला सावरणारी माझी उशी,
सकाळी उठण्याचे बळ देणारी माझी उशी
स्वतः बराच काही सोसले हिने माझ्यासाठी ,
सकाळी उठण्याचे बळ देणारी माझी उशी
स्वतः बराच काही सोसले हिने माझ्यासाठी ,
अशी हि माझी सुद्धा फाटकी उशी ही तर माझ्या आईच्या दुखाची साठवण घेउन श्रीमंत झालेली,
हिच्या शिवाय दुसर्या कोणासमोर आता आईसाठी अश्रू येतहि नाहीत ......२१ जानेवारी २०१२ २:३८ रात्र
Dec 16, 2011
Dec 15, 2011
स्वतःला जे
स्वतःला जे जीवनात करावयाचे आहे ते करण्यासाठी जगयाचे म्हटले तर "संघर्ष "हा वेगळा म्हणून काही उरत नाही,किंवा वेगळा म्हणून कोणाशी करावा हि लागत नाही < अभिजित १८/१२/२०११
प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट !
सामान्य माणसासाठी चित्र म्हणजे काहीतरी महाग ,काही तरी पलीकडले ........
श्रीमंताला चैनी गुंतवणूक ,
संग्रहालयात एक कलेचा ठेवा म्हणून '
आणि सरकार ला एक जबाबदारी म्हणून, कारण ते सतत बदलत असते ,
(अर्थात अपवाद आहेतही पण ते अपवाद ह्या शब्दा इतकेच मर्यादित असतील ह्याची खात्री )
कलाकार महाग म्हणून स्वतःची कला विकसत नाही करत तर मुग ती एक गुंतवणूक कशी होते हा मुद्दा नक्कीच गंभीर आणि मजेशीर हि असेल,आणि ऐतिहासिक गोष्ठीमध्ये सुद्धा प्रचंड गुंतागुंत असते ,कला हि राष्ट्रीय सम्पती पेक्षा एकतर वैश्विक तरी असते किंवा वैय्यक्तिक तरी असली पाहिजे ,
प्रत्यकशाहून प्रतिमा उत्कट १८/१२/2011

Subscribe to:
Posts (Atom)