display: inline-block;

Aug 13, 2015

Preservation

Preservation

Preservation!
Dust on Indian postcard and transparent tape this was not a conceptual thought it was the action of my immediate response to collect that dust from the corner of the wall which was not possible to collect easily from my regular dustpan so like my natural reaction I took postcard which was nearby I kept and I was about to enter my creative space I almost started to proceed with cleaning I thought this I want to preserve.
as well as somewhere I am disturbing the way system is unaware (I doubt) or misbehaving with the all those important part of our history 
one day before my friend has been just curious and whats app me
 "how I get so many ideas to create?
and as an answer I was not so much able to describe because the way I work its more than natural thought and practical process I follow with my intuitive mind and the knowledge I have
The Flow i follow !





Aug 9, 2015

Untitled


Untitled
feather and iron mesh
I stopped myself to write the title 'letter "
 because its limitized the all visual i felt and practice to install  that in right place as i felt

It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change. ----Charles Darwin

माझी कला करण्याकडे /करण्यापलीकडे  माझा भर असतो तो त्यात  प्रवाही राहण्याचा   तसेच त्यासाठी  मी वापरत असलेल्या माध्यमांच्या कक्षा विषयांसोबत त्या अनुरूप  रुंदावण्याचा प्रयत्न माझ्यासाठी महत्वाचा असतो . 
सुरुवातीपासून ते आतापर्यंत जो काही प्रवास आहे तो चित्रकले पासून कला  ह्या जाणिवेपर्यंत होण्यास बरीच माध्यमे ,तसेच माझ्या दैनंदिन जीवनात घडलेल्या , घडणाऱ्या बदलांचा समावेश असला तरी ह्या सर्व प्रक्रियेतला स्वतः मधील प्रामाणिक  अद्वितीय पणा (uniqueness  ) पिंजून कायम ठेवण्याकरिता किंवा प्रसृत होण्याकरिता सहजज्ञानाची जाणीव (intuition) विकसित  होण्याच्या  क्रियेशी शारीरिक आणि मानसिक द्रुष्ट्या  सुसंगत राहणे . माध्यमांचा specifically  अंतर्भाव कसा होईल ह्याचा  विचार करता करता स्वतःची लय अभ्यासकाच्या पातळीवर  विकसित करणे आणि  वेळ आणि शक्ती यांचा समन्वय होताच  ती क्रिया करत राहणे . 
पूर्ण -अपूर्ण ह्या गोष्टी तशा प्रायोगिक तसेच त्याला अध्यात्मिक  आणि वास्तववादी विचारांदरम्यान स्वतःला व्यक्त कण्याचा एक प्रकारे अभ्यासच  माझ्या कलेद्वारे मी करण्याचा प्रयत्न करत असतो . 
ह्या सर्व प्रक्रियेसाठी लागणारा अनुभव मी मुख्यत्वे करून visual  दृश्य पातळीवर घेण्यास  भरअसतो . कारण  मला असे वाटते  कि कुठलाही लिखाण हे ठराविक निष्कर्षांवर आधारित असते आणि त्यामुळे तिथे स्वतःहून अनुभव मिळण्याचा संभव हा एका विशिष्ट पद्धतीने  रचला , बांधला गेला असतो . मला मर्यादा दिसतात तिथे मग , किंबहुना एक धोक्याची पातळीसुद्धा तयार होते अनामिक  ,कि आपण त्या लिखाणाद्वारे मिळणारा बोध हा अनुसरण करण्याची (उदाहरणार्थ - van gogh  हि वृत्ती)  त्याच्या चित्रकलेतील प्रगतीचे मला कौतुक आहे परंतु त्यासोबत समांतर असणार्या जीवनशैलीमध्ये   प्रक्टीकॅली  जे केले त्यात  तो बरच काही त्याच्या पत्रांद्वारे सांगतो जे    त्याच्या चित्रांपेक्षा मौल्यवान आहे . ( उदा.  त्याचे चर्च च्या विरोधात  जावून खाण  कामगारांमध्ये जाणे )परंतु, त्याच्या त्या महत्वाच्या गोष्टींपेक्षा त्याची स्वैर जीवनशैली (जी त्याच्या काही चित्र विनाकारण  प्रसिद्ध करत राहते माझ्यासमोर )  वाचून  तो बराच " "कु"प्रसिद्ध झाला आणि    असे माझे मत  ,, अर्थात त्याच्या  मानसिक अस्वस्थपणा मधून  घडून गेलेल्या प्रसंगाव्यातिरिक्त  घडलेल्या आणि लिहिलेल्या  visual  मध्ये माझ्याशी  होणारा संवाद हा निरपेक्ष , बहुआयामी असण्याचा संभव जास्त असतो . आणि तो  भिडण्याचा हि .  तो बऱ्याच स्तरांवर होत असतो आणि तो मला एका अभ्यासाला प्रवृत्त करतो . पण त्याच्या शैलीद्वारे तो  मर्यादितहि आहे  . 
हा प्रकार visual च्या बाबतीत paul klee  सोबत जास्त अभ्यासाच्या दृष्टीने जास्त केंद्रित असतो . 
असो . (klee  आणि gogh  हि नावे  नुसती उदाहरण म्हणून )
माझ्या अभ्यास प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा बदल हा मी माझ्या सुरवातीचा जर विचार केला तर तो  डार्विनच्या बदल स्वीकारण्याचा सिद्धांत माझ्या वाचनात आला तेव्हापासून , कारण माझ्या कामामध्ये आणि एकूणच प्रक्रियेमध्ये इतर सर्व आजूबाजूच्या गुंतागुंतीमधून एक दिशा देणारे ठरले. खरतर हा बदल वाचल्या वाचल्या न होता तो कुठेतरी  भिनत होता स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक घडामोडीनपासून   मिळणाऱ्या अनुभवांमध्ये 

It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent that survives. It is the one that is most adaptable to change.
 ह्या एका वाक्याने आतूनच जगण्याचे एक बळ मिळते आणि ते कालातीत सत्य  मला ह्या एका वाक्याने माझे मार्ग  चित्रकले कडून कलेकडे विस्तारित होत  गेले .
लय ,निसर्गातील वास्तव,भावना,संवेदना(emotions ), संकल्पना (ideas ) , माणसं ह्यांच्यापासून मला  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कलेसाठी प्रोत्साहन मिळते . तसच ज्या ठाम जाणिवेची  एक भावना आणि निश्चिती मला माझ्या क्रियेसाठी प्रोत्साहन देतो तो  म्हणजे माझा अवकाश , माझा space  .ज्यामधून मला एक अलिप्तता जपण्याचे आणि  ठेवण्याचेहि  एक भान मिळत गेले.  स्वतःची कला जोपासण्यासाठी  मला माझ्या चाळीमधल्या वास्तव्यात माझ्यामध्ये त्याची जाण विकसित करतान काही अंशी संगीताचीहि  महत्वपूर्ण साथ मिळाली .





माझ्यासाठी एक   चांगला कलावंत हा कधीही  आपल्या सर्व अवगत असलेल्या कलेच्या  प्रक्रीयेपुढे  जावून  निखळ  दृश्य  संवाद न साधता  एक स्व तंत्रा  च्या  दिशेने विचार  आणि  क्रिया करण्यास प्रवृत्त करत असतो . . 






Aug 3, 2015

Arrangement



  




, Eggshell, live installation, flower extract, tools i use to get flower extract, mirror, water,dry leaf
Tissue paper .2015
Today's work!.... "Arrangement " While working on specifically wanted to give importance each and every part which helps me equally to create inside outside! Rearranging my work procedure! It's not only for this work its a study of arranging my whole display of practical process while working and to take experiences adding more material from elsewhere which are suitable and thoughtfully merge with whole and every  practice 
!my whole display of practical process is a study of arranging and experimenting the possibilities  of some old works in a new way. too








Aug 2, 2015

How..... Turned the light when I added heat digitally

How..... Turned the light when I added heat digitally
Emotionally connected to the past And, in motion, is stays always with me!
light needs blood always ,
or its collaboration for upcoming fruit which neutralize farmer when he tastes his own blood,
what he had grown in the field .The all tiredness sucks,The joy of all process.... He knows only rain,
 He knows only his daughters marriage.
Happy Birthday  बाबा !





   

Jul 6, 2015

Existence of snake सापाचे अस्तित्व !

मी का चित्र काढतो ????? खरतर मी एकदा  माझ्या मित्रासामोरच बोलताना बोललो होतो ते हे कि  चित्रकला  हि तशी एक प्रकारे selfish क्रिया आहे .
असा प्रश्न मी स्वतःला कधीच विचारला नाही आणि तशी ती  महत्वाच्या बाबींमध्ये अधोरेखित हि नाही , ती क्रिया हि माझा भाग आहे आणि ती मला माझा स्वतःचा भाग वाटते कारण त्या पुर्वी अस काही नव्हत किंवा नंतर काही नसेलही ज्यावर मी माझ्या जन्मदात्या आईवडिलांचा चा हक्क हि नाकारेन , हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच कि नेमकंच   असते जे आपल्याला आपल्या स्वतःच्या श्वासोच्छवा साची जाणीव करून देत असते .   कारण  चित्र कला हि तशी माझ्या स्वतःच्या नसण्यातूनच  (म्हणजे मी कधीही ठरवलं नव्हते कि मला चित्र काढायची आहेत किंबहुना  हाच ठराविक उदॆश घेवून  मी जन्माला आलोय अस मानून ……. )  विकसित होताना मी खरतर अनुभवली ,आणि अनुभवत आहे  आणि ……… आणि हे अनुभवणच ह्या इथे  विविध आणि  कदाचित अनंतही आहे. ,पण त्या क्रियेमागचा तपशील,  जाणीव  , उगम ,  आणि प्रत्यक्ष क्रिया ह्या प्रत्येकामध्ये माझा "शोध" हा element मुख्यत्वे दडलेला असतो . तो शोध एकच असाही नसतो  ती त्यावेळी  घडणाऱ्या प्रत्येक  क्षणाला  स्वतःशी  स्वतःचा सुरु असणारा   विविध पातळीवरचा  द्वंद्व  एका vanishing point कडे नेवून ठेवतो .
ह्यात अंतिम क्षण निवडण्याचा हक्क हि मी त्या द्वंद्वामध्ये विविध पातळीवर सुरु असणार्या क्षमतेवर..... असतोही आणि नसतोही कारण त्यानंतर होणारी वातावरणातील बदल आणि माझे दृश्य ह्यांच्या द्वंद्वामध्ये मी स्वतः कुठेही  नसतो आणि   माझ्यासाठी  तितकेच महत्वाचे …   
 ह्या विचारांमदरम्यान  झालेली हि क्रिया .
Snakes Existence
14 1/2 by 19 1/2 inch.
Flower extract ,Gold powder and fertilizer  , soil , water on card paper 

Jul 4, 2015

Returning Home on indian postcard

Returning Home

Flower Extract on Indian post card

Jul 3, 2015

Untitled

Untitled 2015
8 1/4 by 11 1/2 inch
indigo, , turmeric ,, flower extract on paper

Jun 22, 2015

असचं पत्र !


असचं पत्र !
"photoshop"

Jun 19, 2015

My new tool "Earthen Lamp" And instant Experiment

Earthen Lamp, Flower Extract, Smug , Steel Plate ,camphor

Jun 15, 2015

Untitled

Untitled
 water, Ink, Photo graph y, Eggshell, envelop 


Jun 9, 2015

'Flower"


'Flower"
Flower Dye (फुलांचा अर्क) ,Gum Arabic, indigo 

Jun 3, 2015

कुठल्याही क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या कलाकाराच्या अनुभवांतून आलेल्या शब्दांवर आपण कलाकार म्हणून.....


कुठल्याही क्षेत्रात महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या कलाकाराच्या अनुभवांतून आलेल्या शब्दांवर आपण कलाकार म्हणून आपल्या मतांद्वारे भाष्य करतो आणि मुख्यत्वे जेव्हा त्याचा टोन हा नकारार्थी असतो त्यावेळेस प्रत्यक्ष  प्रयोगाद्वारे मिळालेल्या  अनुभवातून  केलेले लेखन हे आपल्याला जाणवणाऱ्या बर्याच  सकारात्मक शक्यता कमीसुद्धा करू शकते किंबहुना ते सर्व बारकावे त्या प्रक्रियेसोबत लागू करणे कधी कधी अनावश्यक आणि प्रक्रीयेचा  गुंता वाढवणारे  होऊ शकते हे कुठेतरी आपण विसरतो . 
विचारांमध्ये असणारी स्पष्टता प्रायोगिक प्रतलावर बरेच बदलही घडवते किंवा बदल करण्यास भाग पाडते . ह्याची त्याबद्दल आपल्यामध्ये भिनलेली जाणीवच आपला एखादा बदल किंवा बर्याचवेळा तो गैरसमज  आणि आपला अहं काबूत ठेवण्यास कारणीभूत ठरते आणि प्रत्यक्ष कृतिचे आपल्यामधून जाणवणारे त्याबद्दलचे महत्व अधोरेखित करते . 
विचारांद्वारे जेव्हा आपण बोलतो किंवा लिहितो तेव्हा आपल्याला बरेच बारकावे नमूद करणे सहजशक्य असते परंतु प्रायोगिक अनुभवांद्वारे आलेली स्पष्टता  त्यातील बारकावे हे आपल्या कलेचे पूर्णत्व जपणारे असते . आणि एका ठरविक पातळीवर आपले अपूर्णत्व अधोरेखित करणारे असते . 
"त्यातील अपवादात्मक उदाहरणांमध्ये माझ्या लेखी सत्यजित रे येतात. हे त्यांच्यावरील मूळ बंगाली चिदानंद दासगुप्ता यांचे मराठी सुधीर नांदगावकर अनुवादित "अभिजात" या पुस्तकाद्वारे  तसेच त्यांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या काही चित्रपटांद्वारे मला जाणवू लागले .) खरतर हा पूर्ण विचार प्रसृत करण्यामागे ह्या पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे . तसेच ह्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्द्यावरून मित्रासोबत झालेल्या संभाषणातून ह्याचे बीज पेरले गेले मनात  ३\६\२०१५ 

"ती" गेली ...

"ती" गेली ...
आता फक्त तिला स्वतःमध्ये 
शोधणं च उरलं.
"ती" गेली ..
आता फ़क़्त ह्या पाचोळ्या चे ,
नवीन बियांसाठी खत
म्हणून वापरण उमजल .

May 28, 2015

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -

अलंकरण आणि अविष्कार हे परस्परांपासून भिन्न असता कामा नये हे भारतीय कलेचे सूत्र -
"अभिजात" सत्यजित  रे यांची चित्रसंपदा (चिदानंद दासगुप्ताhttp://en.wikipedia.org/wiki/Chidananda_Dasgupta अनुवाद सुधीर नांदगावकर) खूप छोट पुस्तक पण अतिशय आशयपूर्ण आणि मह त्वाचे पुस्तक सत्यजित रे यांच्या समकालीन चिदानंद दासगुप्ता यांचे  कुठलीही तडजोड न करता  सत्यजित  रे यांच्या कामाचा आणि त्यातील विविध पैलूंचा  वेध घेतलेले सुंदर पुस्तक 
खरतर ह्या दोन शब्दांच्या आधाराने स्वतःचे परीक्षण करण्याचे ठरवले त्याच वेळेस स्वतःच्या प्रचंड मर्यादा जाणवू लागल्या 

अविष्कार आणि अभिव्यक्ती ज्या माध्यमांद्वारे मी करत आलो त्यात त्यांचा एकमेकांशी समन्वय कसा होत आला आणि ते  माझ्या अनुभवांद्वारे  कसे घडत गेले यांचा पाठपुरावा करावा अस वाटलं .  पण ह्या गोष्टी जरी मी आता लिहित असलो तरी ह्यांचा विचार माझ्यात सतत उद्दीपित होत होता एकमेकांसोबत आणि तो वेगळा करण माझ्य्साठी तसे  सहजशक्य नाही , कारण स्वतःचे कितीही म्हटलं तरी परखड परीक्षण करणे हे शक्य नाही , तसे कठीणच . बरेच संघर्ष होऊ लागतात स्वतःशीच , त्यामध्ये स्वतःशीच परीक्षण , निरीक्षण करणं तसं कठीणच होऊन बसतं , मग त्याचा सुवर्णमध्य म्हणजे त्या सर्व गोष्टीच प्रवाहीपण प्रामाणिकपणे जपणे आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू जोखणे.
तसेच  त्या प्रसृत होऊ देऊन त्यांच्यात असणार्या नैसर्गिकपणाने ते  उत्क्रांत होऊ देणे . त्याची जाणीव राहणे , खरतर माझ्या मनात हल्ली हे पुस्तक वाचल्यापासून माझ्या कलेचा भारीत्य संस्कृतीशी समन्वय कसा साधावा ह्याचा विचार  रुजत आहे . पण  त्याचवेळेस माझ्यामधील एक विचित्र असा गुंता माझ्यासमोर येतो . आणि तो थोडासा ह्या विचाराच्या अगतिक पणाला मारक  ठरतो तो म्हणजे "सहजता" पण हि सहजता कालाविष्कारादरम्यान  मिळवण्यापेक्षा तो  बर्याच वेगवेगळ्या क्षणी स्वतः मध्ये जाणवतो . त्या वेळी मन एका विशिष्ट क्रियाशीलतेच्या पातळीवर "conscious " असणे आणि त्याची जाण  कुठल्याही तडजोडीशिवाय स्विकारून  विचार आणि क्रियेच्या प्रक्रियेशी पूर्णपणे एकजूट होणे , तसेच तिला आतून मान्यता मिळणे आणि ह्या सर्व गोष्टी त्या एका क्षणात होत असतात आपल्यामध्ये  तसेच हा क्षण आपण साधला हे कामातून अट्टाहासाने  दाखवण्यापेक्षा तो अशाप्रकारे त्या प्रक्रियेचा भाग व्हावा कि त्याचे वेगळेपण दिसुन न येत तो त्या सर्व प्रक्रियेचाच भाग म्हणून परावर्तीत व्हावा . 
असा विचार सध्या सुरु आहे . 
खरी कसोटी असते ती अविष्कार होत असल्या  प्रसंगी घेतल्या जाणार्या  निर्णयांची  . त्याची साधने,माध्यमे   ह्यांची निवड  संवेदनशील असण्यासोबतच ते त्या ठिकाणी कसे अपरिहार्य असू शकेल हे हि  जास्त महत्वाचे होऊन जाते , माझा सर्व  प्रयास हा सह्जतेशी सलग्न असावा हा माझा नेहमीच प्रयत्न असतो . माझ्या प्रक्रियेचे मूळ प्रवाहात जरी असले तरी त्याचा प्रभाव , त्याचे परिणाम  हे बरेच गुंतागुंतीचे आहेत आणि ते तसे असण्यामागे  मानसिक आणि शारीरिक  जडण घडण आहे , आणि ह्यात आता आपल्या संस्कृतीचा समन्वय कसा साधावा तोही अपरिहार्य पणे ह्या जाणीवेच्या शोधात शांत आहे मी अट्टाहास नाही कुठला . 
नाद…  नादी नादी .
 समोर बीभत्स बीज . 
मनाच्या अट्टाहासाचे ,
संगम, संगत 
परावलंबी 
संपले ,
थिजले सर्व 
श्वासावाचुनी जिवंत . 

May 22, 2015

माझा कावळा , माझा सूर्य , माझी फुलं .


माझा कावळा , माझा सूर्य , माझी फुलं 
flower dye, pigment , gum Arabic ,

एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?

प्रिय ,
एकमेकांची मते जुळणे ह्यातला धोका लक्षात येत आहे का तुला?
दोन समान्तर रेषां चा प्रवास काहीसा विरसपणा  कडे झुकणारा जाणवतोय . पण ह्या विरस पणा पुढील  खूप महत्वाची पायरी सुद्धा  मला जाणवतेय ह्या क्षणी  खरतर तेही तुला सांगावस वाटते .  ह्या विरस पणा ला  लागुनच  एकमेकांकडे तटस्थ पणे बघण्याचा अमर्यादित दृष्टीकोन देण्याच सामर्थ्य हे त्यामध्येच दडलेलं मला जाणवलं, ज्याने एक आशा जागृत राहते आपल्यामधील समांतर प्रवासात   .
जन्माला आल्यानंतर प्रत्येक मनुष्य"प्राणी" स्वतंत्रपणे विकसित होत असतो , त्याला ठराविक मर्यादेनंतर कोणीच इतर मनुष्य प्राणी  कारणीभूत उरत नाही .
शोध हा सतत सुरु असतो आणि त्या शोधाची प्रेरणा हि कुठेही असू शकते . परंतु , शोधाचे आपल्या आर्थिक , मानसिक, आणि वास्तवाशी  संबध असणे आणि आपल्या मनात त्या शोधाशी नात जोडणारे  बांडगुळ उगवणे ह्यातली तफावत फार संवेदनशील वळणावर संघर्ष करीत असते आपल्या  अहंशी.

विचार रुजण्यास लागलेला काळ आणि तो प्रत्यक्षात येई पर्यंतचा  क्षण त्याची परिपक्वता निश्चित करते आपल्यामधील सहजतेची  .

ते क्षमता ठेवते मला ,
मृत्युच्या अलीकडील पायरीवर बसून पाय बुडवून बसवण्याची ,
बसल्या जागी जरी मीच असलो , तरी 
माझ्यातील मीपण नाहीस करून 
प्रतीबिम्बाशी  नवीन ओळख करू देण्याची ,
माझा मीच उरत नाही तर आपल्या जुळणाऱ्या  मतांचं 
कसलं  ओझं ?
जिथे संपते सर्व .    

May 4, 2015

Untitled


Untitled
Water, Flower Dye And pigments 

The Visual and the Ego "दृश्य आणि अहंकार"

तल्लूर ल एन यांचे  "the melting men " हे हल्लीचे मला सहज पणे आवडलेले  एक काम ,
त्यासमोर मी उभा ते न्याहळत आणि त्याचवेळी माझा  मित्र माझ त्याबद्दलचे  माझे एप्रिसिअशन ऐकत असताना अचानक प्रश्न विचारू लागतो . की
 काय आहे यात एवढ ?,
का ह्या कामासाठी हेच माध्यम योग्य ?
                                      मला तर नाही वाटतआणि तसं  इतकं  भिडत  हि नाही 
ठीकच आहे 
तो  कुत्सितपणे आपले हसू लपवून ते पाहत राहतो नंतर मी निर्विकारपणे  ते स्कल्प्चर  माझ्या पुढे फुटत 
 ,आणि तेही अनपेक्षितपणे स्फोट व्हावा तसे फुटतं .
                                                  जमीन रक्ताशिवाय बम्बाळ  होते 
आणि  मग, मी विचारतो त्याला 
कशासाठी होते ते ?
                     
                         आणि 

                                    आता काय? 

                                                 काय राहिलं ?

.................................................. .................................................. ………………. 
ज्ञान हे प्रश्नांच्या उत्तराने  मिळत नाही तर ,ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रक्रियेमधून आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नांमधील आपल्या बदलांमधून प्रतिबिंबित होत राहते -  ------ ४ मे २०१५ 





                                                                     
                                   

                                    




Apr 28, 2015

DayNight

DayNight

Pigment , Water, Flower Extract on paper
part of the concept with letters to nature


Apr 25, 2015

फुलपाखराचे रक्त (butterflies blood )

 फुलपाखराचे रक्त (butterflies blood )
flower dye, water, and red pigment

फुलपाखराचे रक्तत्याचे,
 फुलाचा अर्क
अन,
त्याच्या शरीरातील मध
.


Apr 24, 2015

while i was working on फुलपाखराचे रक्त (butterflies blood ) found the dead insect probably honeybee


while i was working on फुलपाखराचे रक्त (butterflies blood ) found the dead insect probably honeybee

(butterflies blood )
water , flower dye, indigo black, chrome yellow pigments


Apr 23, 2015

Random self scape

Keep your eyes on stars
to feel the earth.
keep your hands ,legs on earth
to feel your exist 
in the world

the air,
the noises,
the joy
someones action towards weeping tears,
the liveliness of happenings
tells me
don't return your home now.,
you just need these things enough

then , .which things force me to return?
 my tea. (myt)
the shower,
the internet
my blog.
i don't remember i ever return to my place
to paint, to sketch,
maybe ,those things exist where i stand
not maybe, of course. 
no matter the sun is over me
or the moon
even when they intimate .
....






Apr 22, 2015

कदाचित .

माझ हे  पुन्हापुन्हाचे रुजणे
म्हणजेच
 असेल 
कधीतरी माझे माझ्यातून च 
मरणे . 

धुके / fog

माहित असलेले आणि नसलेले  ह्यात असं बरच असेल जे  अजून 
i ( डोक्यावर सूर्य बिंदू असलेली हि रेघ  जणू मीच  ) 
 i always experience the moment when my improvement at some point  find many other ways open towards मी but, they all are always foggy, and by my nature
The fog is the complex excitement about a new experience, which is attracting me to accept every time, 
When i go through ,i found that fogginess always so close to nature of myself to me, i  have been going through so many lonely moments.
ते ती मेल्यानंतर चे अंतर आणि मला माझ्या स्वतःच्या गवसण्या च्या आभासा दरम्यानचे द्वंद्व
it's like अ fog
 And, i kept myself believable  
No, i didn't kept
 i tried to absorb that fog within me.
मी आणि मीच उरतो 
जेव्हा माझ्यातील मीसुद्धा  संपतो . 
मी तरीही उरतो . 
मी पुन्हा रुजतो . 




Skull

"Skull"
Water ,Indigo and flower dye , Crimson ink 


Apr 20, 2015

Flowerspot

Flowers
Indigo, water, and crimson ink , and gum arabic

Apr 18, 2015

Flower pot

 Flower dye, water ,Turmeric, Indigo ,Black and Crimson ink
on Paper

Apr 17, 2015

"we are flowers from roots"


Flower dye,water, crimson ,Cobalt Blue Hue,and black ink
On Hahnmuhle Bamboo paper
"We Are Flowers from roots "
Its not the title what you want see here 
its the title of that moment the work gave me the feeling while working .


Apr 16, 2015

Flower ball and experiment of colour

Flower ball after squashed all the dye 

Enjoyed watching the mattnes shine of paper


Study with  dye and ink

हा शब्द जरी क्षेत्रात एका ठरीव आणि महत्वाच्या प्रसंगी ....

हा शब्द जरी  क्षेत्रात एका ठरीव आणि महत्वाच्या प्रसंगी  रुजवला गेला  असला तरी इम्म्प्रेशानिझम(प्रभाववाद )हा शब्द  पूर्णपणे त्या अगोदरही कलेच्या आतून बाहेरून त्याचे मर्म व्यापून होता आणि सदैव असेलही .
 तो कलेतील अथवा कुठलाही  अवस्थेतिल   एक  सहजधर्म आहे ,
 इतर इझम्स अथवा  स्टाईल  सारखा मर्यादितही नाही कि  विचार आला /केला आणि वस्तुस्तिथी मध्ये प्रवर्तित केला  ,  आणि मागे पडलं त्याचा संबंध हा बराचसा मानसिक घडामोडींशी निगडीत किंबहुना तो जवळजवळ  पूर्णपणेच आहे त्यात , म्हणजे ९९. ९९ %   हा मानसिक आणि .१ इतका प्रक्टीकल ,
पण तो प्रंचंड उर्जा असलेला असा  म्हणजे तो त्या पूर्णपणे मानसिक  घडामोडीला नियंत्रित ठेवतो , करतो . स्वल्प्विरामासारखा 
. 
पुन्हा नवीन ,त्यातीलच आणि त्याहून वेगळाही  .  
 १६/०४/०१५ 

Apr 13, 2015

My Profile ......Incomplete

It's now hard to think how I feel sometimes about my sufferings, because most of them became spring or offered me the inferior peace, 
you will not understand my one eye if you try to understand me from my profile ,Now often the gum comes into my tea, maybe you will lose my whole half thoughts, maybe they will come to you broken. My one breath, my half lips, which is  impossible to say something even if they are its going to be completely different language My one and a half hands My five complete fingers
My one and a half nipple my almost complete backbone, which will never bend your mind towards the earth,I often did for the respect and to keep calm my little heart, my complete belly ,my half of hunger which confirmed my gender , my one and a half legs so almost my whole journey you could hardly find the way I took 
but i am sure you will find the one thing undoubtedly
     My contour  ..............

Apr 11, 2015

self scape

Selfscape
Greyash pigment, Gum arabic Crimson and Black ink with dye water, 

Apr 10, 2015

PEACOCK tRAPPED bY RAIN !

PEACOCK tRAPPED bY RAIN !

wATER, cRIMSON INK, , dYE WATER, INK

BEFORE DRYING

 THE MOMENT I WANTED TO BE A FOREVER 

कले...च्या … च्या... यला

कले...च्या … 
                       च्या... यला  
                   सांभाळून जर  घेता  आले तर , बऱ्याच बाबींचा समावेश होऊन जातो स्वतःमध्ये ..........
त्यातले म्हत्वाचे म्हणजे सृजन  ,
जे आपला स्वतःच स्वतः असण्याचा एक पायाच . 

सृजन .......हे नेहमीच संवेदनशील तेच्या सलंग्न असते , म्हणजे खरतर संवेदनशीलता  हि सृजनशीलतेचा गाभा   किंवा तीच म्हत्वाचे मूळ आणि
 ते जितक खोलवर असेल तितक ते आपल्या शरीराबाहेरहि विस्तारित होत अस ते
 त्यामध्ये असणारे बारकाव्यांची  आपल्या स्वतःला  जाणीव करून देत असते,
मग ते कशाशीही आणि कशासाठीही असो .
त्याचे ना क्षेत्र मर्यदित नाही त्यास कुठला विषय . 
कला हा शब्दच कशाशीही मर्यादित नाही अगदी
परिवर्तित होणर्या कलेशीही ,
कारण 
कलेचे परिवर्तन हे नंतर अगणित अनुभवांशी होते .
 मी स्वतः कलेला एक कंप मानतो
इंग्रजीत चांगला शब्द आहे
vibration .  
एक दृश्य /अदृश्य  कंपन
 जे सतत काहीतरी परावर्तीत करीत असत . 
आणि त्याच्या शी  त्या त्या कलेच्या माध्यमानुसार त्यांची तत्व जोडली  जातात . दृश्य, नाद , चव, अशी…
 जे त्यामधून आपल्या स्वतःशी स्वतःचा आणि आपल्या अनुभव घेण्याच्या आणि त्या विस्तारित होऊ देण्याच्या क्षमतेचा अंतर्र  बाह्य असा एक संवाद साधून देत असतो .  
आणि
आपण त्या संवादामधून अभिव्यक्ती साठी जे "भाषा"
 जे मधयम निवडतो ते कला  म्हणून येते . 
म्हणजे साध बोलण
आणि
मौन होत जाणं
  असंही … १०/४/२०१५
    

Apr 9, 2015

The unwanted truth!

water, dye water, crimson and black  ink,pencil

The unwanted truth
 about 
Suicide of petals 
can't accept the mind.
but, there is no complaint about 
breathing the  
fragrance for memories
 of flower!
because roots are strong!


Apr 6, 2015

Most of time....

Most of time
I feel my tongue will be convert into those all visible words ,
which I could easily and very precisely write
to conquer your mind struggle about me.

Todays effort TITLE > After start..... thought to develop as a butterfly wing

after start..... thought to develop as a butterfly wing
Ink, pigment,water, white acrylic

Apr 5, 2015

सेल्फ "ए" स्केप

असे खूप प्रसंग ,गोष्टी आहेत
 ज्यांचा मी लगेच एकतर  तर्क लावून 
अथवा ,
हृदयाने विचार करून ,
 निर्णय नाही घेऊ शकत .
 तिथे फक्त मी वेळ घेऊ शकतो .
अक्षरशः वेळ वाया 
घालवू शकतो ,
स्वतःचा 
कधी कधी दुसर्यांचा हि 
अर्धवट हि राहू शकतो . 
आणि सर्व काही यथोचितच आहे . अस न समजता.  
समजून घेण्याचा प्रयत्न न करता 
पुढे जावू शकतो . 
किंवा, आहे  तिथेच काहीतरी 
पूर्णपणे मला स्वतःला आरसा दिसेल .
तो दिसतोच .
आणि तो असतोच,
जसा असतो. तसाच ,
स्वतःच्या मर्यादा . 
स्वतःबद्दल समोरच्याचा काय ग्रह होईल .
ह्याचा किंचितही विचार न करता, करता  शांत बसू शकतो . 
तसा ह्यातून मला काही फरक पडतो ,नाही पडत अस काही दाखवण्यापेक्षा . 
आणि,
आपण आहो तसे आहोत 
अस प्रामाणिकपणे स्वतःची समजूत न घालत बसता .
 एक अनिच्छित फ्लो असतो.  
त्यासोबत स्वतःचा काही आत्मसात केलेला मार्ग ,
 त्या दोघांची सांगड घालत 
जे आहे त्याची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न मात्र सतत सुरु असतो .






Apr 4, 2015

Animal Death don't know any form




Death dont know any form.
Water, Ink, pigment, acrylic white on card paper